समास व समासाचे प्रकार - मराठी व्याकरण

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण समाज आणि समासाचे प्रकार या विषयी माहिती घेणार आहोत हा विषय मराठी व्याकरण मधील अत्यंत महत्वाचा असा विषय आहेत समाज आणि त्याचे प्रकार यावर तुम्हाला परीक्षेसाठी एक किंवा दोन प्रश्न नक्की असतील त्यासाठी या घटकाचा अभ्यास करणं ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहेत म्हणून आम्ही तुमच्यासाठी समाज आणि समासाचे प्रकार काय असतात यावर सविस्तर विश्लेषण या पोस्टमध्ये घेऊन आलो आहेत ही पोस्ट तुम्ही लक्षपूर्वक वाचा आणि तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा चला तर पाहूया समाज आणि समासाचे प्रकार मराठी व्याकरण

•पुढील वाक्ये वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष दद्या :

(1) प्रत्येकाने प्रतिक्षण सतर्क असावे.
(२) स्वातंत्र्यवीरांनी आपले तन-मन राष्ट्रार्पण केले.
(३) सज्जन माणूस योग्यायोग्यतेचा निवाडा करतो.
(४) लंबोदर विदयेची देवता आहे.

• कृती - अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले दोन शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा :

(१) प्रतिक्षण - प्रति - क्षण
(२) राष्ट्रार्पण -  राष्ट्र - अर्पण
(३) योग्यायोग्य -योग्य - अयोग्य
(४) लंबोदर - लांब - उदर

(१) प्रतिक्षण → प्रति (प्रत्येक) व क्षण या दोन शब्दांचा एक शब्द केला आहे.
(२) राष्ट्रार्पण → राष्ट्र व अर्पण या दोन शब्दांचा एक शब्द केला आहे.
(३) योग्यायोग्य  → योग्य व अयोग्य या दोन शब्दांचा एक शब्द केला आहे.
(४) लंबोदर → लंब व उदर या दोन शब्दांचा एक शब्द केला आहे.

समास व समासाचे प्रकार - मराठी व्याकरण


• वरील प्रत्येकी दोन शब्दांतील मधले काही शब्द व विभक्ती प्रत्यय गाळून जोडशब्द तयार केले आहेत.  कमीत कमी दोन शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात.
एकत्रीकरणाने जो नवीन जोडशब्द तयार होतो, त्याला सामासिक शब्द म्हणतात आणि तयार झालेला सामासिक शब्द फोड करून सांगण्याच्या प्रक्रियेला समासाचा विग्रह असे म्हणतात. 

सामासिक शब्द विग्रह
(१) प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला
(३) योग्यायोग्य योग्य किंवा अयोग्य
(४) लंबोदर  लंब आहे उदर (पोट) असा तो

• समासात कमीत कमी दोन शब्द असतात. समासातील शब्दांना पद म्हणतात. पहिला शब्द म्हणजे पहिले पद. दुसरा शब्द म्हणजे दुसरे पद. समासातील कोणते पद महत्त्वाचे किंवा प्रधान आहे, यावरून mसमासाचे प्रकार ठरतात. 

महत्त्वाचे पद म्हणजे प्रधान पद (+)
कमी महत्त्वाचे पद म्हणजे गौण पद (-)
पहिले पद दुसरे पद समासाचा प्रकार

(१) प्रधान गौण अव्ययीभाव समास (+-) (प्रतिक्षण)
(२) गौण प्रधान (-+) (राष्ट्रार्पण)
(३) प्रधान प्रधान वंद्व समास (++) (योग्यायोग्य)
(४) गौण गौण बहुव्रीही समास (--) (लंबोदर)

१ अव्ययीभाव समास

* • कृती - पुढील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा:

(१) वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही.
(२) नागरिकांनी गरजू विदयार्थ्यांना यथाशक्ती मदत केली.
(३) रस्त्याने चालताना जाहिरातींचे फलक सध्या पावलोपावली दिसतात.

वरील वाक्यांतील अधोरेखित शब्द हे सामासिक शब्द आहेत.
सामासिकशब्द 
(१) गैरहजर 
(२) यथाशक्ती 
(२) पावलोपावली.

• या सामासिक शब्दांतील पहिले पद हे महत्त्वाचे आहे व संपूर्ण शब्द वाक्यात क्रियाविशेषण अव्ययाचे कार्य करतो. ज्या समासातील पहिले पद महत्त्वाचे असते व जो सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाचे कार्य करतो, त्या समासाला अव्ययीभाव समास म्हणतात.

आ, प्रति, यथा इत्यादी संस्कृत उपसर्ग आणि दर, बिन, ने यांसारखे फारशी उपसर्ग यांच्या साहाय्याने अव्ययीभाव समासातले सामासिक शब्द तयार होतात. तसेच, काही मराठी शब्दांची द्विरुक्ती होऊनही काही सामासिक शब्द तयार होतात. उदा., पुढील शब्द पाहा.

२ तत्पुरुष समास

• कृती - पुढील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा:
(१) मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा थाटामाटात पार पडला.
(२) सुप्रभाती तलावात नीलकमल उमललेले दिसले.
(३) शिक्षण प्रक्रियेत पालक, शिक्षक आणि विदयार्थी हा आदर्श त्रिकोण असतो.

वरील वाक्यांतील अधोरेखित शब्द हे सामासिक शब्द आहेत.
सामासिक शब्द → 
(१) लोकार्पण 
(२) नीलकमल
(३) त्रिकोण.

या सामासिक शब्दांतील दुसरे पद हे महत्त्वाचे आहे. ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्तिप्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो, त्यास तत्पुरुष समास म्हणतात. म्हणून,

तत्पुरुष समासाच्या तीन उपप्रकारांचा अभ्यास करू या :
(१) विभक्ती तत्पुरुष 
(२) कर्मधारय 
(३) द्विगू.

(१) विभक्ती तत्पुरुष :

विभक्ती तत्पुरुष समासातील सामासिक शब्दात विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय गाळलेले असते.
उदा., 
१) क्रीडेसाठी अंगण
(२) विदयेचे आलय
→ विद्यालय
वरील पहिल्या उदाहरणात 'साठी' हे शब्दयोगी अव्यय तर
दुसऱ्या उदाहरणात 'चे' हा विभक्तिप्रत्यय गाळला आहे.
→ क्रीडांगणPost a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post