अहिराणी बोली | Ahirani Boli
साखरपुडा, नारळ ऱ्हावो तात्या
पायजेच. कोना वाटा पाडाना ऱ्हावोत, तात्या पायजेच. सायखडं घी जावाले तात्याना नंबर
पयला, वावरातल्या बांधवरथून कज्या ऱ्हावोत मिटाडाले तात्या पायजेच. पंगतम्हानभी बसा
मंडळी अासे म्हनालेभी तात्याज पायजे. म्हंजे मरनदार ऱ्हाव का तोरनदार ऱ्हाव, तात्यासवाई
पान्टं हालानं नही. तात्यानीभी भू सिफरत व्हती.
सग्ळी जागावर तात्या हजर ऱ्हायना नही
आसे कदीज जये नही. सकाळीजना पाऱ्हे तात्या जस्या दखावाना तस्याज ताजावताना
रातलेभी दखावाना. याळम्हान कव्हळज तोंडवरथून पानी फिरावाना नही, तरी तात्यानी तोंड
आत्तेज धुयेल व्हयी आसे दखावानं. तात्याना कप्डा धुवळाफूल ऱ्हावाना. टोपीले टार्च
दियेल ऱ्हावानी. आठोडाभर तात्या त्याज कप्डा वापराना, पन कधी मळेल दखावाना नहीत.
अहिराणी बोली | Ahirani Boli
- अहिराणी बोली इयत्ता सातवी
- अहिराणी गाणे
- अहिराणी कथा
- अहिराणी शब्दकोश
- अहिराणी साहित्य संमेलन
- महाराष्ट्रातील बोली भाषांची यादी
- खानदेश नकाशा