रस्त्याची कैफियत मराठी निबंध
रस्त्याची कैफियत मराठी निबंध
मी आहे म्हणून जग तग धरून आहे . कल्पना करा , मी नसतो तर ? मी नसतो तर यातले काही घडलेच नसते ! माणूस आपले व्यवहार करू शकला नसता ! किती तहेत - हेची माणसे पाहिली आहेत मी ! काहीजण स्वतःशीच , मनातल्या मनात बोलत बोलत चालत असतात . काहीजण एकटेच स्वत : शी बडबडत जातात . काहीजण चालता चालता मजेत गप्पा मारतात . काहीजण आपल्या सुखदुःखांच्या गोष्टी सांगतात ; अडी - अडचणी मांडतात , त्यांना पुढचा मार्ग कळत नाही . ते व्याकूळ होऊन मित्रांकडे सल्ला मागत असतात . काहीजण रस्त्यावरच उभ्याउभ्याने कडाडून भांडतात .
खरे तर मी सर्वसाक्षी परमेश्वरासारखाच आहे . हजारो वर्षांपासून मी माणसांचे जीवन पाहत आलोय , अगदी त्याच्या पायाशी राहून माणूस पूर्वी कसा होता व आता किती बदलला आहे , हे मला ठाऊक आहे . मानवजातीचा आजवरचा सर्व इतिहासच माझ्या डोळ्यांसमोर घडलेला आहे . असे असूनही , माणसांना माझी खरी किंमत कळलेलीच नाही . माझ्याशी माणसे नीट वागत नाहीत . मला विद्रूप करतात . माझ्या अंगावर कचरा टाकतात , थुकतात . कित्येकठिकाणी तर रस्ता की गटार , अशी शंका येण्यासारखी माझी दयनीय स्थिती असते . मला स्वच्छ ठेवता येत नसेल , तर ठेवू नका .
पण निदान घाण तरी करू नका ! माणसे स्वतः तहेत - हेचे पोशाख करून , नटून थटून माझ्या अंगावरूनच ऐटीत चालत असतात . पण माझ्या रूपाबद्दल विचार करीत नाहीत . माझी नीट निगा राखली तर काय होईल ? सर्व खड्डे बुजवावेत , घाण दूर करावी . माझ्या कडेने मोठमोठी झाडे लावावीत . मी जातो तिथपर्यंत दोन्ही अंगांनी हिरवळ लावली तर ? कोणाचा फायदा होईल , माणसांचाच ना ? पण माणसे इतकी स्वार्थी बनली आहेत की , त्यांना थोडासुद्धा विचार करता येत नाही . जाऊ दया . काय करणार ? माणसांना त्यांच्या कर्माची फळे मिळतीलच
रस्त्याची कैफियत मराठी निबंध
रस्त्याची कैफियत मराठी निबंध |
Tags:
मराठी निबंध लेखन