कंप्यूटर्सचे प्रकार मराठी - types of computer in marathi

मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये कॉम्प्युटर चे किती प्रकार आहेत म्हणजे संगणकाचे एकूण किती प्रकार त्याच प्रमाणे माने इनपुट आऊटपुट डिव्हाइसेस सॉफ्टवेअर कॉम्प्युटर मध्ये कम्युनिकेशन चे साधन अशा अनेक बाबी बघणार आहोत तरी तुम्ही ही पोस्ट लक्षपूर्वक वाचावी व समजून घ्या सर्वप्रथम आपण कॉम्प्युटरचे प्रकार किती हे जाणून घेऊया

कंप्यूटर्सचे प्रकार मराठी - 

कम्प्युटरच्या मुख्यतः चार प्रकार आहेत ते आपण खाल्ली बघूया

  1. पर्सनल कंप्यूटर्स 
  2. सुपर कंप्यूटर्स 
  3. मेनफ्रेम कंप्यूटर्स 
  4. मिडरेंज कंप्यूटर्स 

पर्सनल कंप्यूटर्स

आयबीएमद्वारे तयार केलेले प्रथम सामान्य-रचना, कार्यक्षम वैयक्तिक संगणकाचा आयबीएम पीसी किंवा “पर्सनल संगणक” असे म्हणतात हे संगणक कमी शक्तिशाली असतात , पण ते सर्वाधिक वापरले जाणारे व सर्वात जलद वृद्धि होत असलेले कंप्यूटर्स आहेत . 

पर्सनल कंप्यूटर्सचे पाच प्रकार असतात   

  1. डेस्कटॉप 
  2. लॅपटॉप 
  3. टॅबलेट 
  4. स्मार्टफोन 
  5. वियरेबल 

1)  डेस्कटॉप कॉम्प्युटर म्हणजे काय

डेस्कटॉप कॉम्प्युटर म्हणजे आपण घरामध्ये वापरत असलेले कॉम्प्युटर जे कम्प्युटर आपण कोणत्याही ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही त्याला एक एक मॉनिटर व मोठा सीपीयू असतो त्याला आपण डेस्कटॉप कॉम्प्युटर असे म्हणू शकतो

डेस्कटॉप कंप्यूटर्स एखाद्या टेबलावर ठेवले जाऊ शकतात , पण सोबत घेऊन जाण्याएवढे लहान नसतात .
कंप्यूटर्सचे प्रकार मराठी - types of computer in marathi


2) लॅपटॉप कम्प्युटर म्हणजे काय

लॅपटॉप कॉम्प्युटर म्हणजे असा कॉम्प्युटर ज्याला आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय नाही सहज रित्या घेऊन जाऊ शकतो या लॅपटॉप हलका व एका बॅगमध्ये बसेल इतका असतो याचे अनेक फायदे आहेत अशा कॉम्प्युटरला आपण लॅपटॉप कॉम्प्युटर कसे म्हणतो
लॅपटॉप कंप्यूटर्स , ज्यांना नोटबुक कंप्यूटर्स देखील म्हटले जाते , सोबत घेऊन जाण्यासारखे असतात . ते कमी वजनाचे आणि ब्रीफकेसमध्ये मावणाऱ्या आकाराचे असतात . 

3) टॅबलेट्स कंप्यूटर्स म्हणजे काय -


टॅबलेट्स , ज्यांना टॅबलेट कंप्यूटर्स देखील म्हटले जाते , लॅपटॉपपेक्षा लहान व हल्के , आणि सामान्यतः कमी शक्तिशाली असतात लॅपटॉपप्रमाणेच यांची देखील फ्लॅट स्क्रीन असते , पण सामान्यतः त्यांचा स्टँडर्ड कीबोर्ड नसतो . त्याऐवजी टॅबलेट्समध्ये व्हर्चुअल कीबोर्ड असतो जो स्क्रीनवर दिसतो आणि टच - सेन्सिटिव्ह असतो .
कंप्यूटर्सचे प्रकार मराठी - types of computer in marathi


4) स्मार्टफोन्स कंप्यूटर्स म्हणजे काय - 

 स्मार्टफोन्स सर्वाधिक वापरले जाणारे हँडहेल्ड कंप्यूटर्स आहेत . स्मार्टफोन्स म्हणजे वायरलेस इंटरनेट कनेक्शन असणारे व प्रोसेसिंग क्षमता असणारे सेल फोन्स . इतर मोबाईल कंप्यूटर्समध्ये स्मार्ट घड्याळासारख्या विअरेबल डिव्हायसेसचा समावेश होतो .

कंप्यूटर्सचे प्रकार मराठी - types of computer in marathi


5) सुपर कंप्यूटर्स म्हणजे काय -


सुपरकंप्यूटर्स हा कंप्यूटर्सचा सर्वात शक्तिशाली प्रकार असतो . ह्या मशिन्स स्पेशल , उच्च क्षमतेच्या असतात ज्या अतिशय मोठ्या संघटनांद्वारे वापरल्या जातात . सुपरकंप्यूटर्स मुख्यतः विशालकाय डेटावर प्रक्रिया करण्यासाठी वापरले जातात . उदाहरणार्थ , वैश्विक हवामानाच्या विश्लेषणासाठी व त्याच्या भविष्यवाणीसाठी त्यांचा वापर केला जातो . आयबीएमचा ब्ल्यु जीन सुपरकप्यूटर्स जगातील सर्वात जलद कंप्यूटर्सपैकी एक आहे .

कंप्यूटर्सचे प्रकार मराठी - types of computer in marathi


मेनफ्रेम कंप्यूटर्स - 


• मेनफ्रेम कंप्यूटर्स विशेष वायरिंग केलेल्या आणि वातानुकूलित खोल्यांमध्ये ठेवले जातात . ते सुपरकंप्यूटर्स एवढे शक्तिशाली नसले , तरीही त्यांची प्रोसेसिंग स्पीड आणि डेटा स्टोअरेज क्षमता खूप मोठी असते . उदाहरणार्थ , इंशुरंस कंपनीज त्यांच्या लाखो ग्राहकांच्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी मेनफ्रेम कंप्यूटर्स वापरतात .

कंप्यूटर्सचे प्रकार मराठी - types of computer in marathi


मिडरेंज कंप्यूटर्स - 


 • मिडरेंज कंप्यूटर्स , ज्यांना सर्व्हर्स देखील म्हटले जाते , ची प्रोसेसिंग क्षमता मेनफ्रेम कंप्यूटर्सपेक्षा कमी , पण पर्सनल कंप्यूटर्सपेक्षा जास्त असते . हे मूळत : मध्यम आकाराच्या कंपनीजद्वारे किंवा मोठ्या कंपनीजच्या विभागांद्वारे वापरले जायचे आणि आज मिडरेंज कंप्यूटर्सचा सर्वाधिक वापर अंतिम वापरकर्त्याद्वारे विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी केला जात आहे , जसे डेटाबेसमधून डेटा रीट्रीव्हलसाठी किंवा अॅप्लिकेशन सॉफ्टवेअरपर्यंत अॅक्सेस मिळवण्यासाठी ,

कंप्यूटर्सचे प्रकार मराठी - types of computer in marathi


पर्सनल कंप्यूटर हार्डवेअर पर्सनल कंप्यूटर सिस्टमच्या हार्डवेअरमध्ये विभिन्न प्रकारचे डिव्हायसेस सामील असतात . 
ही भौतिक उपकरणे चार बेसिक श्रेणींमध्ये विभागली जाऊ शकतातः 

  1. सिस्टम युनिट 
  2. इनपुट / आउटपुट 
  3. सेकंडरी स्टोअरेज 
  4. कम्यूनिकेशन

आपण हार्डवेअरवर विस्तृत चर्चा  पुढे करणार आहोत . इथे चार बेसिक श्रेणींचा केवळ एक जलद आढावा घेतला गेला आहे .

 1)  सिस्टम युनिट


 सिस्टम युनिट एका डब्यासारखे असते ज्यात कंप्यूटर सिस्टमचे अधिकांश इलेक्ट्रॉनिक घटक ठेवले जातात . सिस्टम युनिटचे दोन महत्त्वाचे घटक असतात मायक्रोप्रोसेसर आणि मेमरी . ( पहा चित्र 1-15 ) . मायक्रोप्रोसेसर डेटा नियंत्रित व प्रोसेस करुन माहिती तयार करतो . मेमरी म्हणजे डेटा , सूचना आणि माहिती ठेवण्याचे क्षेत्र . याचा एक प्रकार , रँडम अॅक्सेस मेमरी ( रॅम ) . 

वर्तमानात प्रक्रिया केला जाणारा प्रोग्रॅम व डेटा होल्ड करते . मेमरीच्या ह्या प्रकाराला कधी - कधी टेंपररी स्टोअरेज देखील म्हटले जाते कारण कंप्यूटरचा वीज पुरवठा बंद झाल्यास यातील कन्टेट हरवते . दुसरा प्रकार , रीड - ओन्ली मेमरी ( रॉम ) म्हणजे कंप्यूटर मेमरी जिथे डेटा प्रीरेकॉर्डेड असतो , कंप्यूटर बंद केल्यावर देखील रॉमवर सामग्री टिकवली जाते .

कंप्यूटर्सचे प्रकार मराठी - types of computer in marathi


2) इनपुट इनपुट / आउटपुटः


 डिव्हायसेस डेटा आणि प्रोग्रॅम्सला मानवी भाषेतून कंप्यूटरला समजणाऱ्या भाषेत अनुवादित करतात . कीबोर्ड आणि माउस आणि टच स्क्रिन ही सर्वात कॉमन इनपुट डिव्हायसेस आहेत . आउटपुट डिव्हायसेस प्रक्रिया केलेल्या माहितीला कंप्यूटरच्या भाषेतून मानवी भाषेत अनुवादित करतात . सर्वात कॉमन आउटपुट डिव्हाइस आहे डिस्प्ले , ज्याला मॉनिटर पण म्हणतात , 

सेकंडरी स्टोअरेजः मेमरीच्या विपरीत , कंप्यूटरचा वीज पुरवठा बंद झाल्यावर देखील सेकंडरी स्टोअरेजमध्ये डेटा व प्रोग्रॅम्स टिकवले जातात . हार्ड डिस्क , पेन ड्राईव्ह , रिमुव्हेबल हार्ड डिस्क , सॉलिड स्टेट स्टोअरेज आणि ऑप्टिकल डिस्क हे सर्वात महत्त्वाचे सेकंडरी मीडिया प्रकार आहेत . 

कंप्यूटर्सचे प्रकार मराठी - types of computer in marathi


3) हार्ड डिस्क्स सामान्यतः 


प्रोग्रॅम्स आणि अत्यंत मोठ्या डेटा फाइल्स स्टोर करण्यासाठी वापरल्या जातात . कठोर धातुचे प्लॅटर्स आणि प्लॅटर्सवर फिरु शकणारे रीड / राइट हेड्स वापरुन डिस्कच्या पृष्ठभागावर चुंबकीय चार्जेसच्या सहाय्याने डेटा आणि माहिती स्टोर केली जाते . याचया विपरीत , सॉलिड स्टेट स्टोअरेजमध्ये कोणतेही हलणारे भाग नसतात , ते अधिक जबाबदारीचे असते व त्यासाठी कमी पॉवर लागते . त्यात डेटा व माहिती इलेक्ट्रॉनिक रुपे रॅमसारखेच जतन केले जातात केवळ ते हरवत नाहीत . ( पहा चित्र 1-16 ) , 

ऑप्टिकल डिस्क लेसर तंत्रज्ञानाद्वारे डेटा आणि प्रोग्रॅम्स स्टोर करते . ऑप्टिकल डिस्कचे तीन सामान्य प्रकार आहेत काँपॅक्ट डिस्क ( सीडी ) , डिजीटल व्हर्सेटाइल ( किंवा व्हीडिओ ) डिस्क डीव्हीडी ) आणि ब्लू - रे डिस्क ( बीडी ) .

कंप्यूटर्सचे प्रकार मराठी - types of computer in marathi


4) कम्यूनिकेशनः 


एके काळी , एका पर्सनल कंप्यूटरद्वारे दुसऱ्या कंप्यूटर सिस्टमशी कम्यूनिकेट करणे मुळीच कॉमन नव्हते . आता कम्यूनिकेशन डिव्हायसेसचा वापर करुन इंटरनेटच्या सहाय्याने एक पर्सनल कंप्यूटर दुसऱ्या कंप्यूटर सिस्टमशी सहज कम्यूनिकेट करु शकतो , मग ती दुसरी सिस्टम अगदी जवळच्या खोलीत असो किंवा जगाच्या दुसऱ्या टोकावर . मॉडेम हे सर्वाधिक वापरले जाणारे कम्यूनिकेशन डिव्हाइस आहे जे ऑडिओ , व्हीडिओ आणि इतर प्रकारच्या डेटाचे रुपांतरण करुन त्याला इंटरनेटवर पाठवले जाणे शक्य करते .

हे नक्की वाचा

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post