माहिती तंत्रज्ञान इंटरनेट आणि तुम्ही

कंप्यूटर्सचा प्रभावी आणि कार्यकुशल वापर करण्यासाठी तुम्हाला माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित विविध भागांची जाण असणे आवश्यक आहे . लोक , प्रक्रिया , सॉफ्टवेअर . हार्डवेअर , डेटा , आणि इंटरनेट , तुम्हाला वायरलेस क्रांति , मोबाईल इंटरनेट आणि वेब समजून घेणे आणि तुमच्या खाजगी आणि व्यावसायिक जीवनामध्ये माहिती तंत्रज्ञानाची भूमिका ओळखणे देखील आवश्यक आहे . ( माहिती तंत्रज्ञान )

कंप्यूटर्सचा प्रभावी आणि कार्यकुशल वापर करण्यासाठी तुम्हाला माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित विविध भागांची जाण असणे आवश्यक आहे . लोक , प्रक्रिया , सॉफ्टवेअर , हार्डवेअर , डेटा , आणि इंटरनेट , तुम्हाला वायरलेस क्रांति आणि तिचे परिणाम , मोबाईल इंटरनेट आणि वेब समजून घेणे आणि तुमच्या खाजगी आणि व्यावसायिक जीवनामध्ये माहिती तंत्रज्ञानाची भूमिका ओळखणे देखील आवश्यक आहे .

माहिती तंत्रज्ञान इंटरनेट


माहिती तंत्रज्ञान इंटरनेट आणि तुम्ही


 तुम्ही पर्सनल कंप्यूटरचा विचार करता , तेव्हा बहुतेक वेळा तुम्ही त्या उपकरणाचाच विचार करता . म्हणजे , स्क्रीन किंवा कीबोर्डचा विचार करता . पण त्यात याशिवाय इतर बरेच काही असते . पर्सनल कंप्यूटरचा विचार करताना त्याचा माहिती तंत्रज्ञानाचा एक भाग म्हणून विचार करावा . माहिती तंत्रज्ञानाचे अनेक भाग असतातः लोक , प्रक्रिया , सॉफ्टवेअर , हार्डवेअर , डेटा , आणि इंटरनेट . ( पहा चित्र 1-1 ) 

 1. लोकः माहिती तंत्रज्ञानाचा एक भाग म्हणून लोकांकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते . पण पर्सनल कंप्यूटर्स तर तेवढ्यासाठीच बनवले गेले आहेत – लोकांना , तुमच्यासारख्या अंतिम वापरकर्त्यांना , अधिक उत्पादक करण्यासाठी . 

2. प्रक्रियाः  सॉफ्टवेअर , हार्डवेअर आणि डेटा वापरताना लोकांनी पालन करण्याचे नियम किंवा दिशानिर्देश म्हणजेच प्रक्रिया ह्या प्रक्रिया मुख्यत्वे कंप्यूटर तज्ञांने मॅन्युअल्समध्ये लिहिलेल्या असतात . सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचे निर्मात त्यांच्या उत्पादनांच्या सोबत मॅन्युअल्स पुरवतात . मॅन्युअल्स छापील किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरुपात असतात . 

3. सॉफ्टवेअरः  एका प्रोग्राममध्ये चरणबद्ध सूचना असतात ज्या कंप्यूटरला सांगतात की काम कसे करायचे . प्रोग्रॅम किंवा प्रोग्रॅम्सला सॉफ्टवेअर असे देखील नाव आहे . सॉफ्टवेअरचे उद्दिष्ट असते डेटा ( प्रक्रिया न केलेले तथ्य ) चे माहिती ( प्रक्रिया केलेले तथ्य ) मध्ये रूपांतरण करणे . उदाहरण गार्थ , एका पेरोल प्रोग्रॅममध्ये कंप्यूटरसाठी सूचना असतील की तुम्ही एका आठवड्यात केलेल्या कामाला ( डेटा ) तुमच्या पे रेट ( डेटा ) ने गुणायचे आणि तुमच्या आठवड्याच्या पगाराची गणना करायची ( माहिती ) . 

4. हार्डवेअरः  डेटावर प्रक्रिया करून माहिती तयार करणाऱ्या उपकरणाला हार्डवेअर म्हणतात . यात स्मार्टफोन , टॅबलेट , कीबोर्ड , माउस , डिस्प्ले , सिस्टम युनिट्स व इतर उपकरणांचा समावेश होतो . हार्डवेअरला सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित केले जाते . 

5. डेटाः  लेख , संख्या , चित्र आणि ध्वनि इत्यादिसह कच्च्या , प्रक्रिया न केलेल्या तथ्यांना डेटा म्हटले जाते . 
प्रक्रिया केलेल्या डेटापासून माहिती तयार होते . आधी दिलेल्या पेरोल प्रोग्रॅमच्या उदाहरणात , डेटा ( कामाचे तास आणि पे रेट ) वापरून माहिती ( आठवड्याचा पगार ) तयार केली गेली आहे . 

6. इंटरनेट : जवळपास सर्वच इन्फर्मेशन सिस्टम्स लोकांशी आणि कंप्यूटर्सना कनेक्ट करण्याची सुविधा देतात ज्यासाठी अधिकांश वेळ इंटरनेटचा वापर केला जातो . हि कनेक्टिव्हिटी इन्फर्मेशन सिस्टम्सच्या क्षमतेमध्ये आणि उपयोगितेमध्ये मोठी वाढ करते .

लोक म्हणजे काय : 

कोणत्याही माहिती यंत्रणेचा महत्त्वाचा भाग असतात . आपले जीवन कंप्यूटर्स आणि माहिती यंत्रणेशी दररोज संपर्कात येत असते . अनेकदा संपर्क हा प्रत्यक्ष आणि निश्चित असतो . जसे आपण वर्ड प्रोसेसिंग प्रोग्राम वापरून डॉक्यूमेंट तयार करतो किंवा आपण इंटरनेटला जोडले जातो . ( चित्र 1-2 पहा ) इतर बाबतीत , संपर्क निश्चित नसतो . 

या संपूर्ण पुस्तकात विविध फीचर्स दिले आहेत जे तुम्हाला एक कार्यकुशल आणि प्रभावी अंतिम वापरकर्ता बनण्यात मदत करतील . या फीचर्समध्ये सामील आहेत तंत्रज्ञानचा वापर कसा करावा , टीपा , ' प्रायव्हसी ' , ' वातावरण ' , ' नैतिकता ' , आणि ' तंत्रज्ञानामध्ये करिअर्स ' . 

• मेकिंग आयटी वर्क फॉर यु . या पुस्तकामध्ये सगळीकडे तुम्हाला मेकिंग आयटी वर्क फॉर यु हे वैशिष्ट्य आढळेल , ज्यामध्ये असंख्य मनोरंजक आणि प्रात्यक्षिक आयटी अॅप्लिकेशन्स सादर केलेली आहेत . चित्र 1-3 मेकिंग आयटी वर्क फॉर यु अंतर्गत येणारे काही अॅप्लिकेशन्स दर्शवेल .

सॉफ्टवेअर  म्हणजे काय : 

आधी सांगितल्याप्रमाणे , सॉफ्टवेअर हे प्रोग्रॅमचेच दुसरे नाव आहे . प्रोग्रॅम ह्या सूचना असतात ज्या | कंप्यूटरला सांगतात की डेटा वर प्रक्रिया करुन तुम्हाला पाहिजे त्या स्वरुपात कसे आणायचे अधिकांश वेळी सॉफ्टवेअर आणि प्रोग्रॅम हे शब्द आपसांत बदलले जाऊ शकतात . सॉफ्टवेअरचे दोन मुख्य प्रकार असतातः सिस्टम सॉफ्टवेअर आणि अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर . अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे तुम्ही वापरता ते सॉफ्टवेअर आणि सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे कंप्यूटर वापरतो ते सॉफ्टवेअर .

सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे काय :

 वापरकर्ते प्रामुख्याने अॅप्लिकेशन सॉफ्टवेअरसह काम करतात . सिस्टम सॉफ्टवेअर कंप्यूटर हार्डवेअरशी अंतर्गत क्रिया करण्यासाठी आप्लिकेशन सॉफ्टवेअरला सक्षम करते . सिस्टम सॉफ्टवेअर हे “ पार्श्वभूमि " सॉफ्टवेअर असते जे कंप्यूटरला त्याची स्वतःची आंतरिक संसाधने प्रबंधित करण्यात मदत करते . सिस्टम सॉफ्टवेअर हा एकच प्रोग्रॅम नसतो . तो प्रोगॅम्सचा एक संच असतो ज्यात पुढील गोष्टी सामील असतातः 

ऑपरेटिंग सिस्टम्स म्हणजे काय   :

  असे प्रोग्रॅम्स असतात जे कंप्यूटर संसाधनांना कोऑर्डिनेट करतात , वापरकर्ता व कप्यूटरच्या मध्ये इंटरफेस पुरवतात आणि अॅप्लिकेशन्स संचालित करतात . स्मार्टफोन्स , टॅबलेट्स आणि इतर अनेक मोबाईल डिव्हायसेस एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टम्स वापरतात , ज्यांना रियल - टाइम ऑपरेटिंग सिस्टम्स ( आरटीओएस ) देखील म्हटले जाते . डेस्कटॉप कंप्यूटर्स स्टैंड - अलोन ऑपरेटिंग सिस्टम्स , जसे विन्डोज 7 किंवा मॅक ओएस किंवा लायनक्स वापरतात . ( चित्र 1-5 आणि 1-6 पहा ) , नेटवर्क्स नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम्स ( एनओएस ) वापरतात .

युटिलिटीज कंप्यूटर म्हणजे काय  :

 संसाधनाच्या प्रबंधनाशी संबंधित विशिष्ट कामे करतात . प्रत्येक कंप्यूटरसाठी अत्यंत महत्वाचा असा युटिलिटी प्रोग्रॅम म्हणजे अँटीव्हायरस प्रोग्रॅम . हे प्रोग्रॅम्स तुमच्या कंप्यूटरचे व्हायरस किंवा वाईट प्रोग्रॅम्स पासून संरक्षण करतात , जे तुमच्या कंप्यूटरमध्ये इंटरनेटमार्गे येतात . हे वाईट प्रोग्रॅम्स सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचे नुकसान करु शकतात , तसेच तुमच्या खाजगी डेटाची सुरक्षितता व प्रायव्हसी नष्ट करु शकतात . तुमच्या कंप्यूटरमध्ये अँटीव्हायरस प्रोग्रॅम इंस्टॉल नसल्यास तो करुन घेणे गरजेचे आहे . 

डिव्हाईस ड्रायव्हर्स :  हे खास प्रोग्रॅम किंवा आउटपुट डिव्हायसेसना इतर कंप्युटर सिस्टमसोबत संवाद साधण्याची परवानगी देण्यासाठी तयार केलेले आहेत . 

अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर   : 

अॅप्लिकेशन सॉफ्टवेअरला अंतिम वापरकर्ता सॉफ्टवेअर असे देखील म्हटले जाते . जनरल - पर्पझ , स्पेशलाइझ्ड आणि अॅप्स हे अॅप्स हे तीन प्रकार असतात , जनरल - पर्पझ अॅप्लिकेशन्स जवळपास सर्व करिअर क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात . जर तुम्हाला एक कार्यकुशल व प्रभावी अंतिम वापरकर्ता म्हणवून घ्यायचे असले , तर तुम्ही हे प्रोग्रॅम्स जाणून घेणे आवश्यक आहे . 

काही प्रसिद्ध प्रोग्रॅम्स चित्र 1-7 मध्ये दर्शवले आहेत . स्पेशलाइझ्ड अॅप्लिकेशन्स मध्ये हजारो इतर प्रोग्रॅम्स सामील असतात जे ठराविक विषय आणि व्यवसायांशी संबंधित कामांवर केंद्रित असतात . याची सर्वाधिक प्रसिद्ध अशी दोन उदाहरणे आहेत ग्राफिक्स आणि वेब ऑथरिंग प्रोग्रॅम्स . 

मोबाईल अॅप्स , ज्यांना मोबाईल अॅप्लिकेशन्स किंवा केवळ अॅप्स ( चित्र 1-8 पहा ) असे ही म्हणतात , हे स्मार्टफोन्स आणि टॅबलेट कंप्यूटर्ससारख्या मोबाईल डिव्हायसेससाठी डिझाईन केलेले लहान प्रोग्रॅम्स असतात . अॅप्सची संख्या पाच लाखांच्या वर आहे . सोशल नेटवर्किंग , गेम्स , व्हिडीओ आणि संगीत डाउनलोड करण्यासाठीचे अॅप्स सर्वात लोकप्रिय आहेत .

  1. ब्राउझर्स  - वेब साईट्सला कनेक्ट व्हा आणि वेब पेजेस दर्शवा 
  2. वर्ड प्रोसेसर्स - लेखी डॉक्युमेंट्स तयार करणे 
  3. स्प्रेडशीट्स - संख्यात्मक डेटाचे विश्लेषण आणि संक्षिप्त प्रस्तुतीकरण करणे 
  4. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम्स - डेटा आणि माहिती व्यवस्थित आणि प्रबंधित करणे 
  5. प्रेझेन्टेशन ग्राफिक्स - संदेश पाठवणे किंवा लोकांना तुमचे म्हणणे पटवून देणे

 माहिती तंत्रज्ञान कायदा 2021

माहिती तंत्रज्ञान कायदा 2021


 भारतात वर्ष 1978 पासून  इलेक्ट्रॉनिक विभागामध्ये माहिती तंत्रज्ञान हा विभाग कार्यरत आहेत परंतु त्या अंतर्गत सायबर बाबी सामायिक नव्हत्या म्हणून त्यासाठी 16 डिसेंबर 1998 स*** संसदेत एक बिल आणून त्यावर चर्चा करण्यात आली आणि  त्या चर्चेचा अंतर्गत फलित म्हणजे त्यानंतर दीड वर्षाने माहिती तंत्रज्ञान मंडळाची स्थापना  झाली आणि  मंत्रालय यांनी माहिती-तंत्रज्ञानाचा कायदा  तयार करण्याकरिता प्रयत्न करण्यात आले

 त्यानंतर परत एकदा एक बिल तयार करण्यात आले व ते बिल तयार करून  स्थायी समिती पुढे ठेवण्यात आली  त्या बिलामध्ये काही दुरुस्ती करून त्यानंतर ते बिल संसदेत मांडण्यात आले

1. १३ मे २००० रोजी मंत्रीमंडळ मंजुरी प्राप्त झाली .

2. १७ मे २००० रोजी लोकसभा व राज्यसभा मध्ये बहुमताने बिल मंजूर झाले .

3. जून २००० ला राष्ट्रपती द्वारे अद्यादेश वर स्वाक्षरी करून मंजुरी प्रदान करण्यात आली .

4. १७ ऑक्टोबर २००० रोजी संपूर्ण भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा २००० म्हणून अमल सुरु झाला .

 आपण वरील याच कायद्यांना सायबर सेक्युरिटी कायदा आयटी कायदा असे म्हणत असतो या कायद्यांमध्ये एकूण 13 भाग असून 94 पोट भाग आहे

 माहिती तंत्रज्ञान कायदा 2021 भागानुसार तरतुदी


भाग २
घटनेशी संबधित व्यक्ती , कोणीही घटना ची चौकशी करू शकते

भाग ३
घटनेशी संबधित कागदपत्रे, प्रिंट केलेले साहित्य ,अशा प्रकारची माहिती उपलब्ध होऊ शकते .तसेच यामध्ये डिजिटल सिन्गेन्च्र्र ग्राह्य असेल .

भाग ४
डिजिटल सर्टिफिकेट देणा-या अधिका-याची नियमावली असेल

भाग ७
जे व्यक्ती या कायद्याचा वापर करतील त्यांची कर्त्यव्य या भागात नमूद केलेली आहे.

भाग ८
या भागात काही गैरव्यवहार झाले असे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर दोषारोप ठेवून शिक्षा करण्याची तरतूद आहे .

भाग ९
या भागात सायबर क्राईम हकिंग , डेटा चोरणे , फिशिंग , व्हायरस सोडणारे स्पायवेअर याबाबत तरतूद केलेली आहे.

भाग १०
या भागात सायबर चे फायदे , तसेच एखाद्या व्यक्तीला अपील करायचे असल्यास त्याची तरतूद केलेली आहे.


माहिती तंत्रज्ञान आणि ग्रामीण विकास


आपणा सर्वांना माहीतच आहे माहिती तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागामध्ये किती विकास होता येईल ग्रामीण भागांमधील विद्यार्थ्यांना  तंत्रज्ञानाची ओळख चांगल्याप्रकारे होताना आपणा सर्वांना दिसत आहेत तसेच माहिती तंत्रज्ञानामुळे शहरी भागांमध्ये अनेक ोकर्‍यांच्या संधी ही 

ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांना उपलब्ध झालेल्या आहेत माहिती तंत्रज्ञानामुळे अनेक बदल आपल्याला ग्रामीण विभागांमध्ये दिसून येतात ग्रामीण विभागांमधील लोकांनाही सर्व जगामध्ये काय चालू आहेत याची माहिती माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे ही मिळत आहे

 याकरिता भारत सरकार चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत व गावोगावी ग्रामीण विभागांमध्ये माहिती-तंत्रज्ञान जास्तीत जास्त कसे वापरता येईल यावर त्यांचे लक्ष आहेत

 आपण बघत असतो आत्ताच्या पिढीमध्ये मोबाईल कॉम्प्युटर संगणक हे सर्व घरोघरी आहेत पण हे वापरत असताना खूप काळजी घ्यावी लागते वरती आणि तुम्हाला काही माहिती तंत्रज्ञानाचे काही सांगितलेले आहेत ती तुम्ही लक्षपूर्वक वाचा व समजून घ्या जेणेकरून तुम्ही माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कोणत्याही प्रकारची  कायद्याचे उल्लंघन करणार नाही

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post