मुलाखतीचे स्वरूप
• मुलाखत म्हणजे संवाद. मात्र हा संवाद पूर्वनियोजित असतो. या संवादात संवाद साधणारी व्यक्ती, संवादाला उत्तर देणारी व्यक्ती आणि संवाद ऐकणारे, पाहणारे वा वाचणारे लोक अशा तीन पातळ्यांवर 'मुलाखत' हे भाषिक कौशल्य साकार होत असते.
• एखादी व्यक्ती, संस्था यांच्या महत्त्वपूर्ण कामाचा आढावा क्रमबद्ध प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून घेतला जातो. थोडक्यात, दोन व्यक्तींमध्ये नियोजनपूर्वक, हेतुपुरस्सर केलेला भावनिक, वैचारिक संवाद म्हणजे मुलाखत होय.
मुलाखत - शब्द - शिल्प ( Interview tips ) उपयोजित मराठी
• मुलाखतीसाठी व्यक्ती, विषय, दिवस, वेळ, ठिकाण, कालावधी, मुलाखतीचे उद्दिष्ट, मुलाखत ऐकणारा, पाहणारा रसिक वर्ग इत्यादी गोष्टी पूर्वनियोजनात विचारात घेतल्या जातात.
• लिखित, मौखिक, ध्वनिमुद्रित, प्रकट अशा विविध स्वरूपात मुलाखत घेतली जाऊ शकते.
• सांगण्यासारखे आणि ऐकण्यासारखे ज्या व्यक्तींजवळ काहीतरी आहे, अशा व्यक्तींना बोलते करण्याचे काम मुलाखतीत असते. लोकप्रतिनिधी, लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू, शास्त्रज्ञ, गायक, वकील, उदयोजक, शिक्षक, डॉक्टर, संपादक, गिर्यारोहक, कामगार, शेतकरी, सैनिक, पुरस्कार विजेते, अगदी गृहिणी, विदयार्थी असे कोणीही आपल्या क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावणारे असामान्य लोक मुलाखतीच्या केंद्रभागी येऊ शकतात. मुलाखत हा शब्द मुलाकात या अरबी शब्दावरून मराठीत आलेला शब्द आहे.
भेट, गाठ, बोलचाली, विचारपूस हे 'मुलाखत' या शब्दाचे अर्थ आहेत. मुलाखतीचे तीन प्रमुख घटक पुढीलप्रमाणे : मुलाखतदाता (Interviewer) असामान्य कर्तृत्वाने ठसा उमटवणारी, प्रश्नांना उत्तरे देणारी म्हणजेच मुलाखत देणारी व्यक्ती मुलाखतकार (Interviewee) प्रश्न विचारणारी म्हणजेच मुलाखत घेणारी व्यक्ती मुलाखतीचे वाचक, श्रोते व प्रेक्षक (Audience) मुलाखत प्रक्रियेत मुलाखतदाता हे शिखर वाचक, प्रेक्षक पाया तर मुलाखतकार हा या प्रक्रियेचा सुवर्णमध्य मानला जातो.
मुलाखतीचा हेतू : उपयोजित मराठी
• सामान्यांचा असामान्यपर्यंतचा प्रवास जाणून घेणे, हे मुलाखतीचे मुख्य कार्य असते.
• मुलाखतदात्याच्या व्यक्तिमत्त्वाचे निरनिराळे पैलू मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेता येतात.
• एखादी व्यक्ती अनेक व्यक्तींसाठी किंवा समूहासाठी आदर्श असते. अशा व्यक्तींचा कार्यप्रवास उलगडण्यासाठी मुलाखत साहाय्यभव ठरते.
• 'जया अंगी मोठेपण तया यातना कठीण' ही ओळ काही व्यक्तींच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. अशा व्यक्तींचा जीवनप्रवास संघर्षमय असतो. तो जाणून घेण्याची इच्छा जनसामान्यांच्या मनात असते. त्यांचा असा खडतर जीवनप्रवास मुलाखतीतून जाणून घेता येतो. मुलाखतीच्या माध्यमातून जनसामान्यांची ही जिज्ञासा पूर्ण होते.
एखादया घटनेवरील विचारवंतांची मते, अनुभव, दिशा जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीशी मुलाखतीच्या माध्यमातून केलेला संवाद निश्चितच समाज प्रबोधनासाठी, जनजागृतीसाठी उपयुक्त ठरू शकतो. कोणताही विषय, घटना, त्याची सांगोपांग उकल करून समजून घेण्यासाठी मुलाखतीचे आयोजन केले जाते.
मुलाखतीचे प्रकार : उपयोजित मराठी
- मुलाखत (Personal Interview)
- नोकरीसाठी मुलाखत (Job Interview)
- गट मुलाखत (Group Interview)
- जन मुलाखत (Mass Interview)
- प्रकट मुलाखत (Open Interview)
मुलाखतीची पूर्वतयारी : उपयोजित मराठी
* मुलाखत प्रभावी होण्यासाठी पूर्वतयारी आवश्यक असते. अभ्यासपूर्ण पूर्वतयारी हा यशस्वी मुलाखतीचा पाया असतो.
• ज्यांची मुलाखत घ्यायची त्यांची संपूर्ण माहिती मुलाखतकाराकडे असावी लागते. मुलाखतदात्याचे नाव, वय, जन्मदिनांक, जन्मस्थळ, शिक्षण, कौटुंबिक माहिती इत्यादी प्राथमिक माहिती मुलाखतकाराकडे असणे आवश्यक आहे. तसेच मुलाखतदात्याचा हुद्दा, कर्तृत्व, मानसन्मान, पुरस्कार, लेखनकार्य, वैचारिक पार्श्वभूमी इत्यादींची विस्तृत माहितीही मुलाखतकाराकडे असणे महत्त्वाचे असते.
मुलाखतीचा विषय, उद्दिष्ट, मुलाखत ऐकणारा, बघणारा, वाचणारा वर्ग आणि मुलाखतीचा कालावधी यांचाही अभ्यास मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला करावा लागतो. मुलाखतीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलाखतीच्या विषयाच्या अनुषंगाने बनवलेली प्रश्नावली. मुलाखतीचा उद्देश लक्षात घेऊन मुलाखतकाराला अपेक्षित आणि समर्पक प्रश्नावली बनवावी लागते. मुलाखतीचा अवधी लक्षात घेऊन प्रश्नांची निवड व क्रम यांचेही नियोजन पूर्वतयारीत गरजेचे असते.
* मुलाखतकाराचे वाचन चौफेर असावे. केवळ मुलाखतीच्या विषयानुरूप केलेले वाचन पुरेसे नसते, तर व्यापक वाचनाचा व्यासंग असला पाहिजे. मुलाखतीचे माध्यम कोणते आहे याचाही विचार मुलाखतकाराने करणे अगत्याचे ठरते.
उदा., मुलाखत वर्तमानपत्रासाठी, नियतकालिकासाठी म्हणजेच लिखित स्वरूपाची आहे की आकाशवाणी, दूरदर्शनसारख्या दृक-श्राव्य माध्यमांसाठी याची माहिती घेणे आवश्यक असते.
• लिखित मुलाखतीसाठी मुलाखतकाराला लेखनकौशल्य अवगत असणे आवश्यक आहे. आकाशवाणी, दूरदर्शन आणि प्रकट मुलाखतीसाठी मुलाखतकाराला भाषण-संभाषण कौशल्याचा अभ्यास असावा लागतो.
• मुलाखतीसाठी असलेली बैठक व्यवस्था, ध्वनिक्षेपण व्यवस्था, संदर्भ ग्रंथ, चित्रे, वादधे इत्यादी गोष्टीही मुलाखतीच्या पूर्वनियोजनात तपासून घेणे योग्य असते.
• मुलाखतदाता आणि मुलाखतकार यांची मुलाखतीपूर्वी भेट झाल्यास मुलाखत अतिशय मनमोकळी, सुकर व सुलभ होण्यास मदत होते. मुलाखतीची विविध माध्यमे :
मुलाखतीची माध्यमे
- वृत्तपत्रीय - मुलाखत
- ग्रंथीय मुलाखत
- दूरदर्शनवरील मुलाखत
- आकाशवाणीवरील मुलाखत
प्रत्यक्ष मुलाखत घेताना :
अलीकडच्या काळात 'मुलाखत' हे क्षेत्र बलयांकित क्षेत्र मानले जाते. प्रथितयश व्यक्तीचा कार्यप्रवास व्याख्यान रूपाऐवजी मुलाखतीच्या माध्यमातून संवादरूपाने ऐकायला अधिक पसंती मिळू लागली आहे. आयोजकही बऱ्याचदा अशाच प्रयत्नात असतात.
मुलाखतकाराला योग्य मानधन, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळते. त्यामुळे 'मुलाखत घेणे' या गोष्टीला मोठ्या प्रमाणात व्यावसायिक महत्त्व प्राप्त होत आहे. मुलाखतकाराला मुलाखतीदरम्यान मुलाखतदात्याच्या कर्तृत्वाचा परिचय करून देण्यासोबतच लोकांच्या मनातील प्रश्नांची, कुतूहलाची पूर्तता करणे गरजेचे असते.
अशा कौशल्यपूर्ण कामाचे तीन टप्पे लक्षात घेणे आवश्यक आहे.
तीन टप्पे पुढीलप्रमाणे :
प्रत्यक्ष मुलाखत :
मुलाखतीचा आरंभ
१. मुलाखतीचा आरंभ आकर्षक, सहज शैलीतील परंतु रसिकांच्या वाचकांच्या मनाला भिडणारा असावा.
२. मुलाखतीच्या आरंभीच प्रश्न विचारू नये. मुलाखतदात्याचा परिचय, आवडीनिवडी अशा अनौपचारिक गप्पांनी सुरुवात करावी.
३. मुलाखतीच्या आरंभी कृत्रिम बोलण्याचा जराही स्पर्श नसावा, मुलाखतदात्याशी संवाद साधताना आवश्यक संदर्भ देऊन विषय प्रस्तावना करावी.
४. मुलाखतदात्याच्या जीवनातील एखादा अनुभव, किस्सा सांगून मुलाखतीच्या विषयावर नेमकेपणाने यावे. वातावरण हलकेफुलके करावे.
५. मुलाखतीचा आरंभ, संपूर्ण मुलाखतीचा सूर ठरवत असते. त्यामुळे मुलाखतीची सुरुवात जेवढी श्रवणीय होईल तेवढा पुढील कार्यक्रम रंगत जातो.
६. मुलाखतीत श्रोते रमू लागलेत हे लक्षात आल्यावर मुख्य विषयाकडे चर्चा वळवावी. लहान परंतु नेमक्या प्रश्नांची पेरणी या टप्प्यावर महत्त्वाची असते.
उदा., कवी अशोक नायगावकर यांची मुलाखत घेताना अशोक नायगावकरांच्या कवितेचे वाचन : करून ‘पहिली कविता कशी सुचली?' अशा प्रश्नांनी मुलाखतदात्याला बोलते करता येऊ , शकते.
मुलाखतीचा मध्य
१. मुलाखतीच्या मध्य भागात मुलाखत रंगत आलेली असते. श्रोत्यांना गुंतवून ठेवण्याची
जबाबदारी इथे जास्त असते.
२. नियोजित प्रश्नावली मुलाखतकारासमोर असते; परंतु आधीच्या प्रश्नातून मुलाखतदात्याचे आलेले उत्तर हा धागा पुढील प्रश्नांच्या निर्मितीत मुलाखतकाराला सांभाळावा लागतो.
३. प्रश्नावली जरी तयार असली तरी गप्पांच्या ओघात प्रश्नांच्या निवडीचे कौशल्य मुलाखतकाराकडे असणे आवश्यक आहे. केवळ प्रश्न-उत्तर असे स्वरूप असले; तर मुलाखतीत एकसुरीपणा येण्याची शक्यता असते.
४. मुलाखतकाराच्या प्रश्नांतून मुलाखतदात्याचे व्यक्तिमत्त्व, कार्यकर्तृत्व उलगडून दाखवता येते. मुलाखतदात्याचे विचार चर्चेतून मुलाखतीच्या मध्य टप्प्यात अधिकाधिक जाणून घेता येतात.
मुलाखतीच्या या टप्प्यावर मुलाखत
५ अधिकाधिक रंजक होत असते. संवादाच्या ओघात मुलाखतीचा मुख्य उद्देश मागे पडणार नाही याची काळजी मुलाखतकाराला घ्यावी लागते.
६. विषयाशी थेट संबंधित प्रश्न याच टप्प्यावर विचारणे आवश्यक असते. मुलाखतदात्याला अधिकाधिक वेळ मुलाखतीच्या मध्यावर बोलता येते. मुलाखतदात्याचा उत्साह या टप्प्यावर वाढत गेला पाहिजे, याची काळजी मुलाखतकाराला प्रश्नांच्या ओघात घ्यावी लागते.
उदा., कवी अशोक नायगावकर यांच्या मुलाखतीदरम्यान अशोक नायगावकरांचा २ काव्यप्रवास तसेच कवितेची प्रेरणा, प्रश्नांच्या ऐ अनुषंगाने जाणून घेता येऊ शकते.
मुलाखतीचा समारोप
१. मुलाखतीच्या समारोपात प्रश्नांऐवजी परिणामकारक वक्तव्य आवश्यक असते.
२. मुलाखतीचा कालावधी मुलाखतकाराला या रेंगाळली जाऊ नये हे समारोपावेळी कटाक्षाने सांभाळावे लागते.
३. समारोपात मुलाखतीचा अर्क मुलाखतकाराला थोडक्यात रसिकांसमोर ठेवता यायला हवा.
४. मुलाखत योग्य वेळी, योग्य ठिकाणी संपवावी. मुलाखत कोणत्या वेळी संपेल याची किंचितही कल्पना रसिकांना येऊ नये. 'गोडी अपूर्णतेची' या सूत्रावर मुलाखत संपणे हे मुलाखतीच्या यशाचे श्रेय मानले जाते.
५. मुलाखतीच्या या टप्प्यावर उपस्थित रसिकश्रोत्यांना मुलाखतीत सहभागी करून घेता येऊ शकते. मुलाखतीच्या समारोपाच्या काही मिनिटांसाठी मुलाखतदाता आणि रसिक यांच्यात खुला संवाद मुलाखतकार घडवून आणू शकतो.
६. मुलाखतीच्या उद्दिष्टाचे साफल्य या टप्प्यावर दिसून येते. मुलाखतकाराने या टप्प्यावर निवेदनासाठी थोडासा वेळ घेतला तरी चालू शकते. रण्यावर मुलाखतकाराचा रसिकांसोबत झालेला संवाद अविस्मरणीय ठरला पाहिजे. या
उदा., कवी अशोक नायगावकर यांच्या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात अशोक नायगावकरांची कविता ऐकवून रसिकांशी संवाद करता येऊ शकतो. 'केवळ कवी म्हणूनच नाही तर संवेदनशील माणूस म्हणून एका कवीचा प्रवास आपण जाणून घेतला. याच माणूसपणाच्या सकारात्मक सूत्रावर या मुलाखतीला पूर्णविराम देऊया.'
मुलाखतीसाठी महत्त्वाचे :
•मुलाखतकाराने मुलाखतीसाठी प्रश्नावली तयार करावी. प्रश्नावलीचे
• मुलाखतकाराने मर्यादांची जाणीव ठेवून प्रश्न विचारावेत. प्रश्नांबाबत मुलाखतदात्याचे स्वातंत्र्य अबाधित राहील याची काळजी
• मुलाखतीचे सादरीकरण ओघवते, श्रवणीय, उत्स्फूर्त असावे. प्रत्येक मुलाखतदाता भरभरून बोलेलच असे नाही. अशा वेळी
• मुलाखतकाराला उत्स्फूर्तपणे काही किस्से, आठवणी सांगून विषय सकारात्मक वातावरण निर्माण करावे. मुलाखतकाराने घ्यावी.
• मुलाखतीतील प्रश्नांची पुनरावृत्ती टाळावी.
• कधी कधी मुलाखतकार प्रश्नाच्या अनुषंगाने बराच वेळ अनुभवकथन करीत असतात. अशा वेळी मुलाखतदात्याला योग्य वेळी नव्या मुद्द्यावर वळवणे हे कौशल्याचे काम मुलाखतकाराने करणे अपेक्षित असते. प्रसंगावधान मुलाखतकाराकडे असावे.
• संयम, विवेक आणि नैतिकतेचे पालन यांना खुसखुशीतपणाची जोड देकन मुलाखतीत रंग भरावेत. मुलाखत घेताना लक्षात ठेवायच्या बाबी :
• प्रश्नावली मुलाखतीच्या विषयाला अनुसरून असावी.
• अप्रस्तुत, विषयवाय प्रश्न टाळावेत.
• मुलाखतदात्याचा अवमान होईल असे प्रश्न विचारू नयेत.
• ताणतणाव, संघर्ष निर्माण होईल असे प्रश्न मुलाखतीत विचारू नयेत.
• भावना दुखावतील असे प्रश्न मुलाखतीत नसावेत. मुलाखत घेताना पूर्वतयारी आणि पूर्वाभ्यास आवश्यक आहे. 'मुलाखतकाराचा आत्मविश्वास मुलाखतीत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. 'मुलाखतीदरम्यान असणारे मुलाखतकाराचे निवेदन प्रभावी आणि प्रवाही असावे.
• मुलाखतीदरम्यान अनावश्यक हालचाल, हातवारे टाळावेत. मुलाखतदात्यापेक्षा मुलाखतकाराने अनावश्यक बोलणे टाळावे. 'मुलाखत नियोजित वेळेत पूर्ण करावी.मुलाखतीदरम्यान रसिकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन मुलाखतीची दिशा मुलाखतकाराने ठरवणे आवश्यक असते.
• प्रश्नांतून प्रश्न निर्माण करीत जास्तीतजास्त मुद्यांना स्पर्श करावा. नोकरी, प्रवेशासाठीची मुलाखत :
• आज स्पर्धेच्या युगात नोकरीसाठी तसेच अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुलाखत हा घटक अनिवार्य मानला जातो.
• उमेदवाराची बुद्धिमत्ता, गुणवत्ता, ज्ञानपातळी, कौशल्ये, कल यांचे मापन या मुलाखतीत केले जाते.
• उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्व मूल्यमापनावर अशा मुलाखतीत अधिक भर दिला जातो.
• नोकरीसाठी मुलाखत घेताना उमेदवाराचे विषयज्ञान, पदवी, सामान्यज्ञान, आकलन क्षमता, तांत्रिक हुशारी, भाषेवरील प्रभुत्व हे आजपर्यंत प्राधान्याने विचारात घेतले जात असे. बदलत्या काळात याचे स्वरूप बदलू लागले आहे.
• उमेदवार बोलतो कसा, पोशाख कसा आहे यापेक्षा स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आवश्यक कौशल्ये उमेदवाराजवळ आहेत का याची चाचपणी केली जाते.
• आज विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये अपेक्षित उद्दिष्ट साध्य करणे, गटप्रमुख म्हणून गटकार्य करून घेणे, कमी वेळेत कामांची विभागणी करून पूर्तता करणे, अडचणींना तोंड देणे, कामाचे श्रेय वाटून घेणे,
नियोजित वेळेत गटबैठकांचे आयोजन करून कामाचा आढावा घेणे, गटसदस्यांच्या समस्यांचे निवारण करून मार्गदर्शन करणे, प्रसंगी समुपदेशन करणे अशा प्रकारच्या कामांचे स्वरूप नजरेसमोर ठेवून उमेदवाराची मुलाखत घेतली जाते.
• सहकाऱ्यांच्या भावना, विचार, सूचना, समस्या यांबद्दल उमेदवाराकडे असलेली स्वीकारार्हता आणि मार्ग काढण्याची तत्परता, विवेकबुद्धी, प्रसंगावधान अशा गोष्टींना मुलाखतीत महत्त्व दिले जाते.
• माहिती आणि ज्ञान यांतील भेद उमेदवार जाणू शकतो का, याचे मूल्यमापन आज मुलाखतीत सर्वप्रथम केले जाते. त्यामुळे केवळ पदवी हा निकष आज मागे पडला असून, यासोबत जीवनकौशल्ये मुलाखतीत तपासली जातात.
• मुलाखतीत पाल्हाळ, थापा, भपकेबाजपणा टाळावा.
• उमेदवाराचे 'बायरंग' कसे आहेत, यापेक्षा 'अंतरंग' कितपत विकसित झाले आहेत, हे जाणून घेणे अशा मुलाखतीचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य झाले आहे.
मुलाखत - शब्द - शिल्प ( Interview tips ) उपयोजित मराठी
Tags:
मराठी व्याकरण