मुलाखत नमुना - मुलाखत - शब्द - शिल्प

मुलाखत नमुना - कोरोना या भीषण आजारात रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांची मुलाखत घ्या .

मुलाखत नमुना - मुलाखत - शब्द - शिल्प


मुलाखतकार : नमस्कार डॉक्टर साहेब.
मुलाखतदाता : नमस्कार.

मुलाखतकार : कोरोना या जागतिक पातळीवरील भीषण आजारात तुम्ही अहोरात्र लोकांची सेवा केली, याबद्दल सर्वप्रथम सर्वांच्या वतीने, डॉक्टर, तुम्हांला खूप खूप धन्यवाद।
मुलाखतदाता : धन्यवाद.

मुलाखतकार : कोरोना हा आजार ओळखायचा कसा?
मुलाखतदाता : कोरोना या आजाराची लक्षणे साधारण सर्दीखोकल्याची असल्याने आजाराचे गांभीर्य प्रथमदर्शनी लक्षात येत नाही. परंतु दवाखान्यात चाचणी केल्यावर या आजाराचे निदान करता येते. रोगप्रतिकारकशक्ती आणि औषधे यांच्या साहाय्याने रुग्ण बरा होऊ शकतो.

मुलाखतकार : कोरोना या आजारादरम्यान लोकांनी कोणती सतर्कता बाळगली पाहिजे, असे आपणास वाटते?
मुलाखतदाता : कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. शिंकणे, खोकणे याद्वारे कोरोनाबाधित रुग्णाच्या नाकातून-तोंडातून बाहेर पडणाऱ्या शितोंड्यांमार्फत हा आजार पसरतो. त्यामुळे खोकताना, शिंकताना रुमालाचा वापर केला पाहिजे. तसेच कुठल्याही वस्तूला स्पर्श केल्यास हात स्वच्छ धुणे महत्त्वाचे आहे. बाधित रुग्णांनी लोकांशी संपर्क टाळणे हे अत्यंत गरजेचे आहे.

मुलाखतकार : कोरोना या आजारात उपचार करताना तुम्हांला ठळकपणे कोणत्या बाबी जाणवल्या?
मुलाखतदाता : या आजाराचे गांभीर्य सुरुवातीला लोकांमध्ये दिसले नाही; परंतु जसजशी बाधितांची संख्या वाढू लागली तसतसे लोक सतर्क होऊ लागले. दवाखान्यात येणारे कोरोनाबाधित रुग्ण डॉक्टरांच्या आणि नर्सच्या उपचारांना योग्य प्रतिसाद देत होते. त्यामुळे रुग्णाची प्रकृती सुधारण्यास निश्चितच मदत झाली.

मुलाखतकार : मानवी जीवनावर ओढवलेल्या या भीषण आरोग्य समस्येत दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी काय करता येऊ शकते?
मुलाखतदाता : फार चांगला प्रश्न आहे. दवाखान्यात येणाऱ्या लोकांना औषधे, योग्य आहार दिला पाहिजे. तसेच, मानसिक दृष्टीने सबळ करणे फार आवश्यक असते. आजारात रुग्ण शारीरिकदृष्ट्या खचलेला असतो. अशा वेळी मानसिक आधार देऊन रुग्णांना आजाराशी लढण्याचे बळ नक्कीच देता येते. करीत असताना

मुलाखतकार : दवाखान्यात दिवसरात्र मेहनत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाले का?
मुलाखतदाता : दवाखान्यात मेहनत करीत होतो; परंतु थकवा कधी जाणवला नाही. याचे कारण असे की, लोकांना आम्हां डॉक्टरांची नितांत आवश्यकता होती. रुग्ण फार आशेने डॉक्टरांकडे येत असतात. आमच्या व्यवसायात सेवावृत्ती फार महत्त्वाची आहे. स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते. अशा कठीण प्रसंगी जमेल तसे स्वतःची काळजी घेत होतो.

मुलाखतकार : या व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या नव्या पिढीला काय मार्गदर्शन कराल?
मुलाखतदाता : आरोग्यक्षेत्र हे फार आव्हानात्मक क्षेत्र आहे. रोज नवनवीन संकटे समोर असतात. परंतु लोक अंतिमतः विश्वास डॉक्टरांवर ठेवतात. या एका विश्वासाने संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळते. उपचार करीत असताना आम्ही प्राण वाचवत असतो, यापेक्षा मोठे मानवतेचे कार्य कुठले असेल! सेवाभावीवृत्ती आणि सकारात्मक विचार घेऊन नव्या पिढीने या क्षेत्रात पदार्पण करावे.

मुलाखतकार : मुलाखतीच्या समारोपात आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. नमस्कार.
मुलाखतदाता : नमस्कार.

मुलाखत नमुना - मुलाखत - शब्द - शिल्प

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post