मी चंद्रावर गेलो तर मराठी निबंध | mi chandravar gelo tar essay in marathi

    वर्तमानपत्रांतून, दूरदर्शनवरून विविध बातम्या, माहितीपत्रे यांचा वर्षाव सुरू झाला आहे. माणूस आता चंद्रावर जाण्याची, तेथे सहली काढण्याची, तेथे कायमची वस्ती करण्याची स्वप्ने पाहू लागला. एके दिवशी एका वृत्तपत्रात एक बातमी आली. ज्यांना या सहलीत भाग घ्यायचा आहे. त्याने खालील पत्त्यावर अर्ज करावा. मी लगेच निश्चय केला, 'आपण नक्कीच या सहलीत भाग घ्यायचा.' माझ्या मनात आले - आता या मोहिमेद्वारे मला चंद्रावर जायला मिळाले तर ! ...तसे झाले तर !

   फार दिवसांचे उराशी बाळगलेले माझे स्वप्न साकार होईल. चंद्रावर चालताना टुण्टुण् उड्या मारत जाण्याचा आनंद मला लुटता येईल. पृथ्वीवरून चंद्राच्या पृष्ठभागावर दिसणारा 'ससा' धुंडाळण्याचा मी प्रयत्न करीन. चंद्रावरून माझी पृथ्वीमाता कशी दिसते, ते मी पाहीन. चंद्रावरून पृथ्वीवरील माणसांशी संपर्क साधणारी संदेशवाहिनी असणारच! त्या वाहिनीवरून मी चंद्रावरील सृष्टीचे, सभोवारच्या अथांग विश्वाचे, तेथून दिसणाऱ्या माझ्या पृथ्वीमातेचे धावते समालोचन समस्त मानवांना ऐकवीन. तेथेच कायमचे वास्तव्य करणे जमलेच, तर तेथे एक भारतीय उपाहारगृह सुरू करीन

   क्षुधा-तृषा शमन करणाऱ्या त्या उपाहारगृहात अस्सल मराठी पदार्थ मिळू शकतील. मोदक, थालीपीठ यांसारखे पदार्थ तसेच सोलकढी, मधुकोकम यांसारखी पेये मिळू शकतील. चंद्रावर लुब्ध होऊन पृथ्वीवरील विशेषतः माझ्या महाराष्ट्रातील कवींनी रचलेल्या कविता व इतर साहित्य त्या उपाहारगृहात विक्रीसाठी ठेवीन. पण हे सारे केव्हा?-जर मला चंद्रावर जायला मिळाले तर !! मी हातातील वृत्तपत्रावरील तारीख पाहिली, ती १ एप्रिल होती आणि बातमीच्या शेवटी कंसात छापले होते – 'एप्रिल फूल' सर्वांना सुखाचे जावो.

मी चंद्रावर गेलो तर मराठी निबंध | mi chandravar gelo tar essay in marathi

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post