मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ | Vakprachar in Marathi

मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ | Vakprachar in Marathi

 1. मामू अनघड - न घडलेले.      
 2. ढब -शैली.     
 3.  इशारत मिळणे- इशारा मिळणे.      
 4. चौवाटा पांगणे- चार दिशांना विखुरणे.       
 5. प्राणसई (कविता) घनावळ- मेघमाला.      
 6. सांगावा - िनरोप.      
 7. हुडा - गोवऱ्यांचा ढीग.      
 8. शेणी - गोवरी.      
 9. ठाणबंदी - पशूंना गोठ्यात बांधून ठेवणे.      
 10. कोमेली - कोमेजली.      
 11. भिंग - आरसा.       
 12. अशी पुस्तकं खिळवून ठेवणे- मन गुंतवून ठेवणे.      
 13. आरोळी ठोकणे- मोठ्याने हाक मारणे.      
 14.  झाडांच्या मनात जाऊ (कविता) फाया-अत्तर लावलेला कापसाचा बोळा.    
 15. करणी-कृती, क्रिया.       
 16. परिमळ तोंडात मूग धरून बसणे- गप्प बसून राहणे.      
 17. अपढिक- न शिकलेला/न शिकलेली.     
 18.  धरित्री-जमीन.       
 19. दवांत आलिस भल्या पहाटीं (कविता) 
 20. पिपासा-तहान तरल- चंचल.     
 21.  गोंदणे- सुईने किंवा काट्याने त्वचेवर काढलेली नक्षी/काढलेले चिन्ह.       
 22. माणूस बांधूया मन कातर होणे- भयभीत होणे.     
 23.  काळजात क्रंदन होणे- दु:ख होणे.      
 24. साद- हाक.     
 25.  क्रंदन - आक्रोश, आक्रंदन.       
 26. ऐसीं अक्षरें रसिकें (संतकाव्य) बीक- बळ.      
 27. कळंभा- कलह, भांडण.      
 28. धणी- तृप्ती.      
 29. आविष्करें- तयार होतात, सरसावतात.     
 30.  बुझावी- समाधान व्हावे.     
 31.  सहस्रकरु- सूर्य.      
 32. भावज्ञां- (भाव) जाणणाऱ्यांना.      
 33. फावती- आढळतात.      
 34. वोगरिलीं - वाढलेली.      
 35. नीच नवी- नित्यनूतन.      
 36. प्रतिपत्ति- मेजवानी.      
 37. आत्मप्रभा- आत्मप्रकाश.      
 38. ठाणदिवी- लाकडी समई. प्रकाशाचे साधन.       
 39. वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला असहकाराचे अंजन 
 40. घालणे- सहकार्य न करण्याचा उपाय योजणे.       
 41. आकांत- अनर्थ/कोलाहल.      
 42. उतराई होणे- उपकारातून मुक्त होणे.       
 43. वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार न्यून असणे-कमतरता असणे.     
 44.  विचारांची पिंजण चालणे- विचारप्रक्रिया सतत चालू राहणे.      
 45. साक्षित्वाने- एकाग्रतेने, दक्षतापूर्वक.      
 46. मातीशी मसलत करणे- मातीशी संवाद साधणे.      
 47. बांडगुळ- परोपजीवी वनस्पती.      
 48. अवाक् होणे- आश्चर्यचकित होणे.      
 49. अभ्यासाचे डोंगर पेलणे- खूप अभ्यास करणे.       
 50. पैंजण (कविता) तोरा- ऐट.
मराठी व्याकरण वाक्प्रचार व अर्थ मराठी Marathi vakprachar with meaning

मराठी व्याकरण वाक्प्रचार व अर्थ मराठी Marathi vakprachar with meaning

 1. अंग चोरणे- फारच थोडे काम करणे.
 2. अंगाची लाही लाही होणे-अतिशय संताप येणे.
 3. अंगात वीज संचारणे- अचानक बळ येणे.
 4. अंगवळणी पडणे- सवय होणे.
 5. उर भरून येणे- गदगदून येणे.
 6. कपाळ फुटणे- दुर्दैव ओढवणे.
 7. कपाळमोक्ष होणे- मृत्यू येणे, अचानक येणाऱ्या संकटाने उध्वस्त होणे.
 8. कपाळाला हात लावणे- हताश होणे, निराश होणे.
 9. काढता पाय घेणे- विरोधी परिस्थिती पाहून निघून जाणे .
 10. कानउघाडणी करणे- चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे.
 11. कान उपटणे- कडक शब्दात समजावणे.
 12. कान टोचणे- खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे.
 13. कान निवणे- ऐकुन समाधान करणे.
 14. कान फुंकणे- चुगली/ चहाडी करणे.
 15. कानाने हलका असणे- कशावरही पटकन विश्वास ठेवणे.
 16. कानामागे टाकणे- दुर्लक्ष करणे.
 17. कानाला खडा लावणे- एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाळणे.
 18. कानावर हात ठेवणे- नाकबूल करणे.
 19. कानीकपाळी ओरडणे- एक सारखे बजावून सांगणे.
 20. कानावर घालणे- लक्षात आणून देणे.
 21. कानोसा घेणे- अंदाज किंवा चाहूल घेणे.
 22. केसाने गळा कापणे- घात करणे.
 23. कंठ दाटून येणे- गहिवरून येणे.
 24. कंठस्नान घालने- शिरच्छेद करणे.
 25. कंठाशी प्राण येणे- खूप कासावीस होणे.
 26. कंबर कसणे- जिद्दीने तयार होणे.
 27. कंबर खचणे- धीर सुटणे.
 28. खांद्याला खांदा भिडवने- सहकार्य व एकजुटीने काम करणे.
 29. गळा काढणे- मोठ्याने रडणे.
 30. गळा गुंतणे- अडचणीत सापडणे.
 31. गळ्यात गळा घालणे- खूप मैत्री करणे.
 32. गळ्यातला ताईत होणे- अत्यंत आवडता होणे.
 33. गळ्यापर्यंत बुडणे- कर्जबाजारी होणे, डबघाईला येणे.
 34. चेहरा खुलने- आनंदित होणे.
 35. चेहरा पडणे- लाज वाटणे, खजील होणे.
 36. छाती दडपणे- घाबरून जाणे.
 37. जिभेला हाड नसणे- वाटेल ते बोलणे.
 38. जीव की प्राण असणे- अत्यंत प्रिय असणे. 
 39. डोक्यावर खापर फोडणे- निर्दोष माणसावर दोष टाकणे.
 40. डोक्यावर बसवणे- फाजील लाड करणे.
 41. डोळा असणे- नजर/पाळत ठेवणे.
 42. डोळा लागणे- झोप येणे.
 43. डोळे उघडणे-अनुभवाने सावध होणे.
 44. डोळेझाक करणे- दुर्लक्ष करणे.
 45. डोळे निवणे- समाधान होणे.
 46. डोळे पांढरे होणे- धक्कादायक प्रसंग निर्माण होणे.
 47. डोळ्यात अंजन घालणे- चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे.
 48. डोळ्यात खुपणे- मत्सर करणे.
 49. डोळ्यात धूळ फेकणे- खोटेनाटे सांगून फसवणे.
 50. डोळ्याला डोळा न लागणे- झोप न येणे.

मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ | Vakprachar in Marathi

  1. डोळ्याचे पारणे फिटणे- समाधान होणे किंवा पाहून आनंदित होणे.
  2. डोळे विस्फारणे- आश्चर्याने पाहणे.
  3. डोळ्यातून थेंब न काढणे- मोठा आघात होऊनही न रडणे.
  4. तळपायाची आग मस्तकात जाणे- अतिशय संतापने.
  5. तोंड काळे करणे- कायमचे निघून जाणे.
  6. तोंडघशी पडणे- विश्वास घात होणे / अडचणीत येणे.
  7. तोंडचे पाणी पळणे- अतिशय घाबरणे.
  8. तोंड देणे- सामना करणे
  9. तोंड फिरवणे- नाराजी व्यक्त करणे.
  10. तोंड भरून बोलणे- मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे.
  11. तोंड वेंगाडणे- याचना करणे.
  12. तोंड सांभाळून बोलणे- जपून बोलणे.
  13. तोंड सुख घेणे- दोष देताना वाटेल तसे बोलणे.
  14. तोंडाची वाफ दवडणे- वायफळ बडबड करणे.
  15. तोंडात बोट घालणे- आश्चर्यचकित होणे.
  16. तोंडात शेण घालणे- पराकोटीची निंदा करणे.
  17. तोंडाला कुलूप घालणे- गप्प बसणे.
  18. तोंडाला तोंड देणे- भांडणे.
  19. तोंडाला पाणी सुटणे- हाव निर्माण होणे.
  20. दात ओठ खाणे- चीड व्यक्त करणे.
  21. दात धरणे- सूड घेण्याची भावना बाळगणे.
  22. दात विचकणे- निर्लज्जपणे असणे.
  23. दाताच्या कण्या करणे- वारंवार विनंती करणे.
  24. दाती तृण धरणे- शरण जाणे.
  25. नजर चुकवणे- न दिसेल अशी हालचाल करणे. 
  26. नवल वाटणे- आश्चर्य वाटणे, चकित होणे.
  27. नाक उडवणे- थट्टा, उपास करणे
  28. नाक कापणे- थट्टा उपहास करणे
  29. नाक खुपसणे- नको त्या गोष्टीत उगाच सहभाग घेणे
  30. नाक घासणे- लाचार होऊन माफी मागणे.
  31. नाक मुरडणे- नापसंती दाखवणे, उपहास करणे
  32. नाकाने कांदे सोलने- जास्तीचे शहाणपण दाखवणे
  33. नाकी नऊ येणे- फार दमणे
  34. पदरात घेणे- स्वीकारणे
  35. पदरात घालने- चूक पटवून देणे
  36. पाठ थोपटने- शाबासकी देणे, कौतुक करणे
  37. पाठीशी घालणे- संरक्षण देणे
  38. पाठ दाखवणे- समोरून पळून जाणे
  39. पाठ पुरवणे- सारखे मागे लागणे
  40. पाठबळ असणे- आधार असणे
  41. पाठीला पोट लागणे- उपाशी राहिल्याने हाडकुळा होणे
  42. पाठ न सोडणे- एखाद्या गोष्टीचा पिच्चा पुरवणे
  43. पाढा वाचणे- सविस्तर सांगणे
  44. पाणी दाखवणे- सामर्थ्य दाखवणे
  45. पाणी पडणे- वाया जाणे, नष्ट होणे
  46. पाणी मुरणे- कपटाने काहीतरी लपवून ठेवणे
  47. पाणी पाजणे- पराभव करणे
  48. पाणी सोडणे- अशा सोडणे
  49. पाय काढणे- विरोधी परिस्थिती लक्षात घेऊन निघून जाणे
  50. पाय घसरणे- तोल जाणे, मोहात फसणे

  मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ | Vakprachar in Marathi

   1. पायबंद घालने- आळा घालणे
   2. पाय मोकळे करणे- फिरायला जाणे
   3. स्वतःच्या पायावर उभे राहणे- स्वतंत्र किंवा स्वावलंबी होणे
   4. पोटात कावळे कोकळणे- खूप भूक लागणे
   5. पोटात ठेवणे- गुपित सांभाळून ठेवणे
   6. पोटात शिरणे- मोठ्या चातुर्याने विश्वास संपादन करणे
   7. पोटाला चिमटा घेणे- अत्यंत काटकसरीने राहणे
   8. पोटावर पाय देणे- रोजंदारी बंद करणे
   9. पोटाशी धरणे- माया करणे, कुशीत घेणे
   10. प्राणापेक्षा जपणे- स्वतःच्या जिवापेक्षा एखादी गोष्ट सांभाळणे
   11. बोटावर नाचवणे- हवे तसे खेळवणे
   12. मनात अढी धरणे- एखाद्याविषयी मनात राग निर्माण होणे
   13. मांडीवर घेणे- दत्तक घेणे
   14. मुठीत असणे- ताब्यात असणे
   15. रक्त आटवणे- अतीकष्ट करणे
   16. रक्ताचे पाणी करणे- अतिश्रम करणे
   17. हाडांची काडे करणे- अतिकष्ट करणे
   18. हाडे खिळखिळी करणे- भरपूर चोप देणे
   19. हात आखडणे- देण्याची क्षमता असतानाही कमी देणे
   20. हातघाईवर येणे- मारमारीची पाळी निर्माण करणे
   21. हातचा मळ असणे- एखादी गोष्ट सहज करता येणे
   22. हात झटकणे- नामानिराळा होणे
   23. हात टेकणे- नाईलाजाने शरण येणे
   24. हात दाखवणे- मार देणे, फसवणे
   25. हात देणे- मदत करणे
   26. हात मारणे- ताव मारणे 
   27. हातातोंडाशी गाठ पडणे- जेमतेम खायला मिळणे
   28. हातापाया पडणे- लाचारीने विनवण्या करणे
   29. हातावर तुरी देने- डोळ्यादेखत फसवून पळणे
   30. दोन हात करणे- सामना करणे, टक्कर देणे
   31. हृदय भरून येणे- गदगदून येणे

   मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ | Vakprachar in Marathi

   • मराठी वाक्प्रचार व अर्थ pdf
   • मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग 100
   • डोळे पांढरे होणे अर्थ
   • वाक्प्रचार अर्थ व वाक्यात उपयोग 50
   • इयत्ता चौथी मराठी वाक्प्रचार
   • नजरेत भरणे अर्थ व वाक्यात उपयोग
   • खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा
   • हिंदी वाक्प्रचार

   मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ | Vakprachar in Marathi

    Post a Comment

    Thanks for Comment

    Previous Post Next Post