Paragraph in marathi language | Small paragraph in marathi

Paragraph in marathi language | Small paragraph in marathi

Paragraph in marathi language | Small paragraph in marathi

Example of paragraph 1

     शिक्षणाच्या अनुषंगानं अन्य क्षेत्रांतही अनुताईंनी फार मोठं काम केलं आहे. शिक्षणाबरोबरच त्यांनी बालकल्याण, मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्‍छता, कुटुंबकल्याण, आरोग्य आदी विषयांवरही खूप कष्ट घेतले. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या सर्व त्यांनी केल्या. एकाच वेळेला अनेक प्रयोग, असेही त्यांच्या कामाचं स्वरूप होतं. त्यामुळेच केवळ देशातील नव्हे, तर परदेशांतील संस्था आणि शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं. शिक्षणक्षेत्रात आणि त्यासाठी आदिवासी क्षेत्र निवडून काम करणं हे अतिशय अवघड असतं. ज्यांच्यासाठी शिक्षणाचं व्रत चालवायचं त्यांचाही अशा कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध होतो. रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही त्यामागची कारणं असतात. शिवाय स्थितिशील समाजही या कार्यात वारंवार अडथळे आणत असतो. या सर्व गोष्टींवर मात करून ज्ञानाचा दिवा जपण्याचं आणि अनेकांच्या मनांतील विविध प्रकारचा अंधार दूर करण्याचं काम अनुताईंनी निरपेक्ष वृत्तीनं केलं. स्वतःच्या बळावर त्यांनी शिक्षणक्षेत्रात एक सुरेख स्वप्न पाहिलं. ते प्रत्यक्षात उतरवलं. कधी झाडाखाली, कधी गोठ्यात, कधी बोडक्या माळावर, तर कधी झोपडीत वर्ग चालवून त्यांनी मोठ्या जिद्दीनं ज्ञानप्रसार केला. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा, असा प्रचार कधी त्यांनी केला नाही, तर स्वतःलाच दिवा बनवलं. त्यात आपल्या श्रमाचं तेल ओतलं, कर्तृत्वानं तो पेटवला आणि आयुष्यभर तो तेवतच ठेवला. पाच-सहा तपांच्या अविरत धडपडीनंतर कोसबाडच्या टेकडीवरील ही समई आता विझली आहे. त्यामुळे अवघी टेकडी हळहळली असेल, आदिवासींचे डोळे पाणावले असतील, तर या सर्वांनी अनुताईंच्या पाऊलखुणा जपून ठेवणं हीच त्यांना आदरांजली ठरेल.

Example of paragraph 2

      अशी ही दुपार होत असते एखाद्या शेतावर. त्या तळपत्या सूर्याला साक्षी ठेवून सकाळपासून केलेल्या कामाचा शिणवटा घालवण्यासाठी प्रशस्त अशा वडाच्या नाही तर पिंपळाच्या झाडाच्या सावलीत विसावलेला असतो कोणी शेतकरी. सकाळपासून नांगरून अन्घाम गाळून झाल्यावर घरच्या लक्ष्मीने आणलेला भाकरतुकडा, तिच्याच बरोबर दोन-चार सुख-दु:खाच्या गोष्टी करत नुकताच खाऊन झालेला असतो. आपल्या धन्याच्या कष्टाकडे मोठ्या कौतुकाने पाहत असते ती. दुपार कृतकृत्य होऊन मोठ्या आदराने पाहत असते त्या दोघांकडे. त्यांच्या डोईवरच्या वडाच्या झाडावरच्या पक्ष्यांचा किलबिलाटही आता थांबलेला असतो आणि फांदीवरच ऊन लागणार नाही अशा झाडांच्या सावलीत बिचारे पक्षीदेखील थोडीशीच; पण छानशी डुलकी काढत असतात. लांबवर भटकणारे, शेकडो मैलांची रपेट करणारे पक्षीदेखील मिळेल त्या वृक्षांवर थोडी विश्रांती घेत असतात. सकाळपासून प्रयत्न करून थोडं दाणा-पाणी मिळाल्यावर छोटे-छोटे पक्षीदेखील कुठे तरी विसावत असतात अन्घरांच्या आश्रयानं राहणारी कबुतरंदेखील गुटर्रगूं थांबवून कुठं तरी छपरांच्या सांदीत थोडी सैलावलेली असतात. ‘आणखी उत्साहानं काम करण्यासाठी, सज्ज होण्यासाठी थोडी विश्रांती घ्या’ म्हणत असते पशु-पक्षी अन्प्राण्यांनादेखील ही दुपार. जंगलातले प्राणीदेखील भक्ष्य मिळवण्यासाठीची भटकंती आता बंद करून, नाही तर सकाळी-सकाळीच ताव मारलेलं आपलं भक्ष्य आता पचवण्यासाठीची पायपीट बंद करून एखाद्या ढोलीत, नाही तर गुहेत अंमळ पाय ताणून विसावलेले असतात. जगाची सगळी काळजी अन्उद्याची भ्रांत त्या देखण्या जनावरांनी दुपारवर टाकून दिलेली असते-दुपारनंही ही काळजी घेतलेली असते अन् ‘छान आराम करा’ म्हणत असते ती त्यांना! 

Example of paragraph 3

    कर्त्या घरातली कर्ती माणसं आपल्या आयुष्याच्या प्रश्नावर-म्हणजेच आयुष्याच्या दुपारीच कर्तृत्वानं चार पैसे आपल्यासाठी अन्पुढच्या पिढीसाठी गाठी बांधत असतात...त्या उद्योजकाची आयुष्यातली सकाळ, शिकण्याचा काळ आता संपलेला असतो अन्आयुष्याची संध्याकाळ व्हायच्या आत त्याला आपल्या आयुष्याच्या संध्याकाळची बेगमी याच आपल्या चाळीस-पन्नास वर्षांच्या काळात, आपल्या आयुष्याच्या दुपारीच करून ठेवायची असते. हे सुद्धा चक्र असंच चालू असतं घरोघरी. घरांतली वृद्ध माणसं बिछान्यावर पडून वामकुक्षी करता-करता दुपारी विचार करत असतात मागे बघत. त्या दुपारच्या शांततेत आपण कमावल्याच्या-गमावल्याच्या बाबींची मनात कुठे तरी पहुडल्या-पहुडल्या उजळणी चालू असते. कुठे-तरी भीतीची एखादी लकेरही मनात येऊन जाते-भविष्याबद्दल; पण मग ‘रोज राेज हा विचार करायची तरी काय गरज? उद्याची दुपार पाहायला मिळणार आहे का नाही, याचाही नको करायला विचार...जेव्हा जे व्हायचं ते होणारच आहे, आपण फक्त या दुपारचे प्रतिनिधी!’ असा विचार करून मन शांत केल्यावर दुपार मग त्या दमल्या-भागल्या जीवाला पुरेपूर विश्रांतीही घेऊ देते.

Example of paragraph 4

दीपक फार चौकस मुलगा खरं. त्याला खेळायला म्हणून आणलेलं, कुठलंही नवं खेळणं, तो पहिल्यांदा थोडा वेळ कुतूहलानं रंगून खेळायचा; पण दिवसाच्या शेवटी ते खेळणं मोडून ते कसं चालतं याचा शोध घेण्यात तो मग्न व्हायचा. त्याचा आनंद असे तो खेळण्याच्या आतली रचना समजावून घेण्यात. यांत्रिक हालत्याचालत्या खेळण्यांच्या बाबतीत तर त्याचा उत्साह विचारू नका. दीपकला त्याचे वडील नेहमी म्हणायचे देखील, ‘‘दीपक! यंत्राच्या वाटेला जाऊ नकोस. खेळण्याची मोडतोड करून त्यांना सतावू नकोस. एखाद्या दिवशी यंत्रं रागावली म्हणजे कळेल, मग पळता भुई थोडी होईल. तू मोडलेल्या खेळण्यांतली यंत्रं पहा कशी तुझ्याकडे चिडून पाहताहेत.’’

Paragraph in marathi language | Small paragraph in marathi

  • marathi paragraph writing
  • marathi paragraph for typing
  • marathi paragraph 300 words
  • marathi paragraph and questions
  • marathi paragraph for handwriting
  • marathi typing paragraph online test
  • paragraph of marathi
  • marathi typing paragraph pdf
  • marathi typing paragraph practice
  • marathi paragraph writing pdf
  • marathi paragraph reading
  • marathi paragraph typing test
  • marathi text paragraph
  • marathi typing 30 wpm paragraph
  • paragraph word marathi meaning

Paragraph in marathi language | Small paragraph in marathi

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post