जाहिरात लेखन मराठी | Jahirat Lekhan Marathi | story writing in marathi

जाहिरात लेखन मराठी | Jahirat Lekhan Marathi | story writing in marathi

जाहिरात लेखन मराठी | Jahirat Lekhan Marathi | story writing in marathi

जाहिरात लेखन मराठी | jahirat lekhan in marathi

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण अनेक वस्तू वापरतो. त्या वस्तू आपण निर्माण करीत नाही आपल्या गरजेच्या वस्तूसंबंधात आपल्याला पुढील माहिती हवी असते :
(१) आपल्याला हवी असलेली वस्तू कोण निर्माण करते ? 
(२) ती वस्तू आपल्या गरजा किती प्रमाणात भागवते ?
(३) ती वस्तू कुठे मिळते?
(४) त्या वस्तूची किंमत काय?
वरील माहिती पुरवणारा मजकूर म्हणजे 'जाहिरात' होय. आपल्याला हव्या असलेल्या वस्तूची माहिती आपल्याल जाहिरातींमार्फत मिळते. जाहिरात आपल्याला हव्या असलेल्या वस्तूपर्यंत नेते, म्हणजेच आपले लक्ष वेधून घेते. लोकांना हव्या असलेल्या वस्तू निर्माण करणारा तो निर्माता होय. निर्मात्याने वस्तू निर्माण केल्यावर तो व लोकांनी खरेदी करणे आवश्यक असते. म्हणून वरील माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी लागते.

वरील माहिती पुरवणाऱ्या मजकुराला जाहिरात म्हणतात. वस्तूचा निर्माता व ग्राहक यांना जोडून देण्याचे कार जाहिरात करते. आपण निर्माण केलेली वस्तू जास्तीत जास्त ग्राहकांनी खरेदी करावी, असे प्रत्येक निर्मात्याला वाटत असते म्हणून जाहिरात आकर्षक करावी लागते.

जाहिरात लेखन मराठी कसे करावे ? | jahirat lekhan in marathi

महत्त्वाचे मुद्दे :
(१) जाहिरातीची माध्यमे :
(१) इंटरनेट 
(२) चित्रपट 
(३) वृत्तपत्रे 
(४) मासिके 
(५) आकाशवाणी 
(६) दूरदर्शन 
(७) चौकांमधील फलक
(८) गर्दीच्या ठिकाणी वाटली जाणारी पत्रके,

जाहिरात लेखन मराठी मध्ये | Jahirat Lekhan in Marathi Language

(२) जाहिरात लिहिताना घ्यायची काळजी
(१) जाहिरात कोणत्या वस्तूची अथवा सेवेची आहे, हे ठळकपणे व लक्षवेधक रितीने जाहिरातीत मांडले पाहिजे. (२) जाहिरात तयार करताना मथळा, उपमधळा तयार करावा. त्यासाठी सुभाषिते सुवचने, सुप्रसिद्ध कवितेतल्या या गाण्यातल्या ओळी, काव्यमयतेचा आभास निर्माण करणाऱ्या ओळी, लोकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेले शब्दप्रयोग इत्यादींचा उपयोग करता येतो.
(३) जाहिरात नेहमी कमीत कमी शब्दांत असावी. 
(४) जाहिरातीची भाषा साधी, सोपी पण वेधक असावी. व्यवहारातील भाषा वापरली तरी चालेल.
(५) भाषा क्लिष्ट, किचकट, बुद्धीला ताण दयायला लावणारी नसावी.
(६) समाजातील प्रचलित संकेत, लोकभावना यांना धक्का देणारी भाषा नसावी.
(७) काव्याचा आभास निर्माण करणारी लयबद्ध शब्दरचना जाहिरात आकर्षक बनवते.
(८) विनोदाची पखरण करता आल्यास उत्तम, 
(९) जाहिरातीला चित्रांची जोड देता आल्यास जाहिरात अधिक प्रभावी होते, हे खरे. मात्र जाहिरातलेखनात चित्रे
काढणे किंवा चित्रकलात्मक सजावट करणे परीक्षेत अनिवार्य नाही. 
(१०) ग्राहकांच्या आवडी, गरजा, सवयी व फॅशन्स या सतत बदलत असतात. जाहिरातीत या बदलांचा प्रभाव दिसला पाहिजे,
(११) जाहिरातीचे भाषिक रूप महत्त्वाचे. साध्या चौकटीमध्ये योग्य ओळीत केलेली मांडणीही पुरेशी असते.
(१२) जाहिरातीत संपर्क स्थळ, संपर्क क्रमांक, ई-मेल आयडी इत्यादींचा ठळक उल्लेख असला पाहिजे,

जाहिरात लेखन मराठी | Jahirat Lekhan Marathi | story writing in marathi

जाहिरात लेखन मराठी | Jahirat Lekhan Marathi | story writing in marathi

jahirat lekhan in marathi for student | जाहिरात लेखन मराठी 10

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post