लालबहादूर शास्त्री यांची माहिती मराठी | लालबहादूर शास्त्री भाषण

लालबहादूर शास्त्री यांची माहिती मराठी | लालबहादूर शास्त्री भाषण

लालबहादूर शास्त्री (२ ऑक्टो. १९०४ ते ११ जाने. १९६६)

'अखिल देश पाठिशी, 
जवान व्हा, रणी चला 
किसान होऊनी कसा, 
भूमी सस्यश्यामला 
यौवनास योग्य रे, 
शौर्य आणि स्वाभिमान
 जय जवान, जय किसान"




या कविवर्य ग. दि. माडगुळकरांच्या ओळींप्रमाणे भारत देशाला 'जय जवान, जय किसान' हा मंत्र देणार. लाल बहादूर शास्त्रींचा जन्म २ ऑक्टोंबर १९०४ मध्ये मुगलसराई या गावी झाला. त्यांना जन्मजात वैभव लाभले नाही त्यांचे वडील रेव्हेन्यू खात्यामध्ये कारकून होते. त्यामुळे त्यांना पगार तो कितीसा मिळणार पण तेवढेही सुख नियतीला पहावले नाही. शास्त्रीजींच्या जन्मानंतर काही कालावधीतच त्यांचे वडील वारले. शास्त्री पोरके झाले. त्यामुळे शास्त्रींच्या आईने माहेरी जाण्याचा निश्चय केला. शास्त्रींचे बालपण हे आजोळी मामाच्या आश्रयाखाली गेले.

एकदा शास्त्रींची आई गंगानदीवर स्नानाला गेली असता तिच्या हातून शास्त्री खाली पडले. तिला वाटले की पोर नदीच्या पाण्याबरोबर वाहून गेला पण गोष्ट वेगळीच होती. नदीत स्नान करणाऱ्या एका माणसाला ते पोर सापडले. आणि ते त्याने आईच्या स्वाधीन केले.

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जशी जन्मतारीख ही एकच आहे तसे दोघांचे विचारही एकच आहेत. महात्मा गांधींच्या विचारांचा जबरदस्त पगडा शास्त्रींच्या मनावर होता. म. गांधींप्रमाणे शास्त्री जेवढे मृदू होते तेवढेच निश्चयी होते. म. गांधीचे पहिले दर्शन शास्त्रींना १९१६ साली झाले होते. त्या वेळी ते आफ्रीकेत सत्याग्रह करून नुकतेच भारतात आले होते, तेव्हा पांढरा काठेवाडी फेटा, अंगरखा व जोडा असा सर्वाच्या नजरेस भरेल असा पेहराव होता. साध्या पेहरावाखाली दडलेल्या विचारांची श्रीमंती त्यांच्या भाषणावरून दिसून आली. राजे महाराजांच्या समोर केलेल्या भाषणात गांधी म्हणाले होते, "भारतातील जनता दारिद्रयात उपाशीपोटी मरत असताना एवढे अलंकार चढवून राजे महाराजे येथे आलेत. त्यांनी अगोदर आपले जडजवाहीर विकून टाकावे व मिळालेला पैसा गोरगरिबांना वाटावा 'या सारखे राजे महाराजांच्या श्रीमंतीवर घणाघात करणारे गांधीचे भाषण ऐकून अनेक राजे भरसभेतून उठून गेले. परंतु सभा ऐकण्यासाठी आलेल्या सामान्य लोकांनी मात्र गांधीच्या या भाषणाचा टाळ्या वाजवून यथोचित सन्मान केला. हे दृश्य लाल बहादूर शास्त्रीनी पाहिले व ते देशप्रेमाने प्रेरित झाले.

म. गांधीनी जेव्हा शाळा कॉलेजांवर मुलांनी बहिष्कार घालावा असे ठरविलं. तेव्हा शास्त्री आपल्या शिक्षकांकडे आले आणि निर्भीडपणे म्हणाले, 'गुरुजी, माझे मन अभ्यासात लागत नाही. देशाकडे माझे मन ओढ घेत आहे.

गांधीजींच्या आज्ञेप्रमाणे मी शाळा सोडून देणार आहे.' अर्थात हे विचार गुरुजींना पसंत नव्हते. त्यांनी 'तू विचार कर. भावनेच्या आहारी जाऊ नकोस.' असे सांगितले. पण शास्त्रीजींचा निर्णय पक्का होता. त्यांनी शाळेला राम राम ठोकला व ते स्वातंत्र्याच्या चळवळीत सामील झाले. मात्र स्वातंत्र्याची चळवळ संपल्यानंतर ते पुन्हा शिक्षणाकडे वळले.

कॉलेजचे जीवन म्हणजे अगदी फुलपाखरासारखे. हा समज शास्त्रींच्या बाबतीत खोटा ठरला. त्यांना ज्ञान संपादण्याची विशेष हौस होती. कॉलेजला जाण्यासाठी त्यांना दररोज ५ ते १० मैलांची पायपीट करावी लागत असे. टॉलस्टॉयवर त्यांची विशेष भक्ती होती.

कॉलेज शिक्षण झाल्यानंतर लालबहादूरांना कोणता मार्ग ज्यादा याबद्दल अगोदर काहीच सुचेना पण एक निश्चय होता की नोकरी न करता समाजसेवा करायची. त्या वेळी लाला लजपतरायांनी गोखल्यांच्या धर्तीवर "लोकसेवक समाज" संस्था काढली व त्याद्वारे शास्त्रींनी अस्पृश्योद्धाराचे काम सुरू केले. गांधींप्रमाणे अस्पृश्योद्धार स्त्रियांची स्वतंत्रता आणि स्वदेशी ही त्यांची व्रते होती.

१९२७ साली ललितादेवी यांच्याशी शास्त्रींचा विवाह झाला. शास्त्रींया संसार त्यांनी उत्तम रीतीने सांभाळला. आपला पती लोकसेवक आहे. त्याचा वेळ संसाराच्या व्यापात जावू नये यासाठी त्या दक्षता घेत. शास्त्रींच्या लग्नात त्यांना सासुरवाडीकडून एक चरखा व काही बार खादी हुंडा म्हणून देण्यात आली होती. लाल बहादूर आपल्या छोटयाशा कारकिर्दीत अनेक देशांना भेटी देऊन आले. ते जात त्या त्या ठिकाणी आपल्या मृदू पण निश्चयी शब्दांनी ते आपली छाप पाडत आणि आपल्या देशात कोणत्या त्रुटी आहेत. या देशापासून काय शिकण्यासारखे आहे हे पाहून त्या प्रमाणे स्वदेशी परतल्यानंतर ते कामाला लागत. २७ मे १९६४ ला नेहरूंचा अंत झाल्यानंतर देशाची सर्वस्वी जबाबदारी बटू मूर्ती लालबहादूर शास्त्री यांच्यावर आली. त्यांनी आपल्या कृतीने माणसाचे शील व निश्चय किती प्रभावशाली असू शकतात हे शास्त्रींनी स्वतःवरून दाखवून दिले आहे. १८ महिन्यांच्या छोट्याश्या कारकिर्दीत आपण पंतप्रधान पदाला किती लायक होतो हे शास्त्रींनी आपल्या कृतीने दाखवून दिले. शास्त्रीजी दरिद्री नारायणाचे खरेखुरे प्रतिनिधी आहेत. शास्त्रीजी नम्र आहेत पण या नम्रपणात अजिजी व भिक्षांदेही नाही. राष्ट्राबद्दल त्यांचा स्वाभिमान, शास्त्रीजींच्या पाक-भारत संघर्षातील युद्धप्रसंगी राष्ट्राला उद्देशून केलेल्या त्या महान भाषणात व कृतीत आढळून येतो. शास्त्रीचे संपूर्ण जीवन हीच एक आदर्श आचार संहिता होय. शास्त्रींजींच्या अंगच्या अनेक गुणांचा प्रत्यय आजपर्यंत अनेकवेळा आला असला तरी या वामन मूतीन ज अतुल धैर्यशाली मार्गदर्शन भारताला केले त्याने सारे जग स्तिमित झाले आहे. भारताची मान जगात उंचावली.

'जय जवान, जय किसान' या शास्त्रींजीच्या नव्या घोषणेत त्यांच्या देशविषयक खंबीर धोरणाचे पडसाद उमटले. अखेर म्हणावेसे वाटते

" या देशाच्या पौरुषाचा 
तूच शोभतो लाल खरोखर 
तुझ्या आगळ्या व्यक्तीत्वाने 
आम्हा दिघले नवसंजीवन"

लालबहादूर शास्त्री यांची माहिती मराठी | लालबहादूर शास्त्री भाषण

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post