पंडित जवाहरलाल नेहरू भाषण | Speech on Jawaharlal Nehru in Marathi

पंडित जवाहरलाल नेहरू भाषण | Speech on Jawaharlal Nehru in Marathi


पंडित जवाहरलाल नेहरु (१४ नोव्हेंबर १८८९ ते २७ मे १९६४)

" दिसता सुंदर लाल टपोरे फूल गुलाबाचे 
आठवते हो रूप देखणे पंडितजी तुमचे !"

पंडित जवाहरलाल नेहरू भाषण | Speech on Jawaharlal Nehru in Marathi

१४ नोव्हेंबर हा नेहरूंचा जन्मदिवस तोच आज आपण बालदिन म्हणून साजरा करतो. पंडित नेहरू हे मुलांचे आणि फुलांचे भोक्ते होते. भारताचे भाग्यविधाते, स्वातंत्र्यसंग्रामाचे नेते, जागतिक शांततेचे अर्ध्वयू व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर मुत्सद्दी. पं. जवाहरलाल नेहरू यांचे चरित्र म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळाचा पन्नास वर्षांचा इतिहास आहे.

पं. जवाहरलाल नेहरू हे मूळचे काश्मिरी ब्राहमण, त्यांचे पणजोबा पं. लक्ष्मीनारायण नेहरू हे दिल्लीच्या बादशहाकडे कंपनी सरकारचे वकील होते. आजोबा गंगाधर नेहरु दिल्लीचे कोतवाल होते तर वडील मोतीलाल नेहरू हे सुविख्यात वकील होते. वकिलीवर त्यांनी गडगंज संपत्ती मिळवली. अशा
सुप्रसिद्ध व संपन्न घराण्यात अलाहाबाद येथे १४ नोव्हेंबर १८८९ मध्ये जवाहरलाल यांचा जन्म झाला. त्यांचे प्रारंभीचे शिक्षण घरीच झाले. त्यांना शिकवण्यासाठी इंग्रज शिक्षक ठेवले होते. ते कोणत्याही शाळेत गेले नाहीत.

१५ व्या वर्षी उच्च शिक्षणासाठी पं. मोतीलाल त्यांना लंडनला घेऊन गेले. १९०५ साली त्यांनी हॅरोच्या पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश केला व पुढे १९१० साली सृष्टीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व भूस्तरशास्त्र घेऊन ते बी. ए. झाले पुढे १९१२ साली बॅरिस्टर व १९१४ साली एम. ए. अशा चार पदव्या घेऊन ते भारतात परत आले.

एखाद्या व्यक्तीचा विचार करताना त्या व्यक्तीचा विविध प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांच्या मते, आग्रही भाषेतील आपल्या आवडी निवडी समजून घ्यायच्या असतील तर त्या व्यक्तीवरील संस्कारांचा विचार करणे जरूरीचे आहे. पं. नेहरू आरंभापासून शेवटपर्यंत कट्टर राष्ट्रवादी होते.

नेहरूंच्या या राष्ट्रवादाचा उगम बाल्यकाळापासून होतो. बाल्यावस्थेतच राष्ट्रवादी झाले. इंग्रजांनी केलेले अत्याचार सतत त्यांच्या कानावर पडत होते. त्यामुळे ते ब्रिटीश साम्राज्याचे कडवे विरोधक होते. पण इंग्रज व्यक्तीविषयी अप्रीती नव्हती. नेहरूंच्या बालवयातच त्याच्या मनावर चिरंतन ठसा उमटवणाऱ्या गोष्टी म्हणजे टिळकांचा जहाल राष्ट्रवाद व रशिया-जपान युद्ध होय.

शिक्षणानंतर त्यांनी महात्माजींच्या असहकारितेच्या चळवळीत प्रवेश. केला. असामान्य व्यक्तिमत्त्व व देशप्रेमाची ओढ यामुळे ते गांधीजींचे आवडते शिष्य झाले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेकदा तुरुंगवास भोगला. कारावासात असताना त्यांनी 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हे पुस्तक लिहिले. आपल्या अपूर्व त्यागामुळे त्यांनी भारतीय पुढाऱ्यांत मानाचे स्थान मिळवले.

आपल्या देशाला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. नेतृत्व, कौशल्य व धडाडी यामुळे पंडितजींची पंतप्रधान म्हणून निवड झाली. भारताच्या तटस्थ परराष्ट्र धोरणाचा पाया त्यांनी घातला व भारताला जगात मानाचे स्थान मिळवून दिले. विज्ञानाची महती ते जाणून होते. म्हणून त्यांनी विज्ञान प्रसारास उत्तेजन दिले व अनेक कारखाने व संशोधन संस्था स्थापन केल्या.

शांततामय सहजीवनावर त्यांचा विश्वास होता. आपआपसातील वाद चर्चेने मिटवावेत असे त्यांना वाटे. चिन तिबेट युद्धात त्यांनी 'पंचशील तत्त्वे' सुचविली ती जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या शांतता प्रयत्नामुळे त्यांना जगाकडून ' शांतीदूत' ही पदवी मिळाली. भारताचा सर्वागीण उत्कर्ष होण्यासाठी त्यांनी आपल्या कारकदीत तीन पंचवार्षिक योजना आखल्या. त्यांच्या कामगिरीत ने कारखाने उभे राहिले, धरणे बांधली गेली, जो योजनाबद्ध विकास झाला त्यावरून ते नियोजन युगाचे प्रवर्तक होते हे सिद्ध होते.

परमेश्वराखेरीज त्यांची माणसांवर व त्याच्या कर्तृत्वावर श्रद्धा होती. भाक्रा नानगल योजनेसारखे नंदनवन निर्माण करणारे धरण त्यांच्या दृष्टीने तीर्थक्षेत्र होते. आपल्या बुद्धीला पटेल त्याच गोष्टीचा आग्रह धरणारी माणसेच त्यांना आवडत. या उलट लाचार, अंधश्रद्ध माणसांचा त्यांना तिटकारा होता. सतत उद्योगी माणसे त्यांना आवडत म्हणून त्यांनी आराम हराम है' ही घोषणा दिली.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ते सतरा वर्षे भारताचे पंतप्रधान राहिले जगात त्यांन भारताची मान उंचावली. त्याला प्रगतीच्या वाटेवर आणले. त्यांचे सारे जीवन अलौकीक होते. आयुष्यभर ते देशवासीयांशी एकरूप होऊन राहिले. सर्वधर्माबद्दल त्यांनी सहिष्णूता ठेवली. आयुष्यभर ते एका सरळ स्वप्नवादी मार्गावर राहिले. त्यातूनच बलशाही व विश्वबंधुत्व राखणारा भारत

निर्माण झाला. देशाचे पंतप्रधान असूनही त्यांचा स्वभाव अतिशय साधा व सरळ होता. त्यांना लहान मुले व फुले फार आवडत. नेहरूंना निसर्गाचे वेड होते. बर्फाच्छादित गिरीशिखरांचे अन्यांचे धबधब्यांचे आकर्षण होते. त्यांच्या शेवाणीत अडकलेला लाल गुलाब त्यांच्या सौंदर्य दृष्टीचे प्रतिक होता.

मुलांनो! ते आपला वाढदिवस आगळा वेगळा साजरा करीत. तो दिवस त्यांना फार आवडे. एका पारड्यात ते बसत व तराजूच्या दुसऱ्या पारड्यात मिठाई ठेवली जाई व ती मिठाई गोरगरीबांना वाटली जाई. असा हा वाढदिवस आपण १४ नोव्हेंबर बालदिन म्हणून साजरा करतो, त्यांच्यासारखा वाढदिवस साजरा करणे शक्य नसले, तरी आपण आपल्या वाढदिवसाला आपल्याला प्रिय असलेली वस्तू इतरांना द्यावी. ज्यांना त्यांचा आनंद मिळत नाही अशा गोरगरीब अनाथ मुलांना ती वस्तू दिली तर नेहरूंच्या बालदिनाचे महत्त्व कळले असे म्हणता येईल. आयुष्यभर ते जनसामान्यांशी एकरूप राहिलेच पण मरणानंतर सुद्धा आपली रक्षा विमानाने या देशावर विखरून टाकावी, ज्यामुळे माझ्या देहाचा कण न् कण माझ्या प्राणप्रिय देशाच्या मातीशी एकरुप होईल." असे आपल्या मृत्यूपत्रात लिहिले आहे.

अशी अमाप लोकप्रियता मिळवणारा नेता आगळाच म्हणूनच मी म्हणेन 

"दिव्यत्वाची जेथे प्रचिती
तेथे कर माझे जुळती'

पंडित जवाहरलाल नेहरू भाषण | Speech on Jawaharlal Nehru in Marathi


Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post