बोधकथा | Bodh Katha

बोधकथा | Bodh Katha

बोधकथा | Bodh Katha

चांगलें  विचार - बोधकथा | Bodh Katha

एक रामपूर नावाचे गाव होते.त्या गावा शेजारी खूप मोठे जंगल होते.त्या गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी त्या जंगलातून जावे लागत असे.अतिशय गरज असेल तेव्हाच लोक शेजारच्या गावात जात असे. त्यामुळे हे जंगल निर्जन होते.जंगलात फक्त जंगली प्राणी असायचे.जंगली प्राण्यामुळे लोकांना आज पर्यन्त कधीच त्रास झाला नव्हता.

 एकदा एक गरीब माणूस जंगलातून फिरत चालला होता.जंगलात दूरवर आणि त्याच्या सोबत कोणीही नव्हते.बरेच अंतर पार केले असताना तो खूप थकला होता . आणि त्याला खूप तहान लागली होती आणि भूकही लागली होती , एक डेरेदार झाड पाहून तो त्याच्या खाली बसला आणि विचार करू लागला कि आपल्याला इथे कोणी मिष्टान्न भोजन व थंडगार पाणी आणून देईल तर किती बरे होईल ? योगायोगाने तो ज्या झाडाखाली बसला होता तो होता कल्पवृक्ष .

 त्याने इच्छा केल्याबरोबर ती पूर्ण झाली . आणि त्याच्या पंच पक्वानाचे जेवण प्रकट झाले. त्या माणसाला वाटले कि बहुधा देवच प्रसन्न झाला असावा. त्याने प्रार्थना केली कि मला पोते भरून मोहरा मिळाव्यात म्हणजे माझे दारिद्र्य नाहीसे होईल . तीही इच्छा लगेच पूर्ण झाली . इतक्या मोहरा त्याने आयुष्यात पाहिल्याही नव्हत्या . पण आता त्याला भीती वाटू लागली .

 या मोहरांच्या लोभाने चोर इथे आले तर काय करायचे ? ते धन तर लुटून नेतीलच , पण आपल्यालाही ठार मारतील . हे मनात येताच तिथे चोर आले . आणि त्यांनी मोहरांची पिशवी उचलली आणि त्या गरीब माणसाला ठारही केले . कल्पवृक्षाचे सामर्थ्य न कळल्याने तो हकनाक मरण पावला . या बद्दल आम्हला प्रतिक्रिया नक्की द्या.

मराठी बोधकथा तात्पर्य - आपल्याला मिळणाऱ्या अनुभवाचा जरूर विचार करावा.एखादी संधीचा चांगला उपयोग करून घ्यावा त्या संधीमुळे आपले नुकसान तर होणार नाही असे काही करू नये.कल्पवृक्ष आणि सामर्थ्याची कल्पनाच नसल्याने कार्यकर्ते प्रत्येका ने असे दरिद्री संकल्प करू नये.


गुरु कासव बोधकथा | Bodh Katha

कोणे एके काळी एका नगरात एक वृद्ध एकटाच राहत होता. छोट्याशा झोपडीत राहून तो आजूबाजूच्‍या शेतात छोटीमोठी कामे करून स्‍वत:ची गुजराण करत असे. आपल्‍या गरजा त्‍याने खूपच मर्यादित ठेवल्‍या असल्‍याने त्‍याला फारसा खर्च येत नसे. मात्र हे असताना त्‍याने एक कासव पाळले होते आणि त्‍या कासवावर त्‍याचा फार जीव होता. दुपारी आपले जेवण तयार करताना तो कासवासाठी हरभरे भिजवून त्‍याला देत असे. रिकामा वेळ असताना तो त्‍या कासवाशी संवाद साधत असे.

 आजूबाजूचे लोक त्‍याचे ते कासवप्रेम पाहून हसत असत. एके दिवशी एक परिचित मनुष्‍य त्‍याला भेटण्‍यासाठी आला. थोडा वेळ इकडचे तिकडचे बोलून झाल्‍यावर त्‍याने त्‍या कासवाला पाहिले व तो मनुष्‍य म्‍हणाला,'' तू इतका घाणेरडा प्राणी कशासाठी पाळला आहेस. सोडून दे त्‍या कासवाला.'' त्‍याच्‍या बोलण्‍याने वृद्धाला खूप वाईट वाटले. वृद्ध म्‍हणाला,''अरे मित्रा, तू असे बोलून माझ्या काळजाला हात घातला आहेस. इतके वाईट तर मी कधीच त्‍या कासवाबद्दल माझ्या मनात किंवा स्‍वप्‍नातसुद्धा विचारत आणत नाही.

 ते कासव माझ्या गुरुस्‍थानी आहे म्‍हणून माझ्या मनात त्‍याच्‍याबद्दल खूप आदर आहे.'' तो माणूस म्‍हणाला,''ते कासव तुझे गुरु कसे काय बरे ठरते'' वृद्ध म्‍हणाला,'' कासव हे मानवी मनाचे प्रतिक आहे. कासव आपल्‍याला हे शिकवते की त्‍याच्‍यावर जरा जरी संकटाची चाहूल लागली तरी ते जसे स्‍वत:चे अंग आक्रसून कवचाखाली जाते त्‍याप्रमाणेच मानवाने वाईट गोष्‍टींची जराशी चाहूल जरी लागली तरी त्‍यापासून लांब राहिले पाहिजे. कासवाप्रमाणे आपण आपल्‍या मनाला वाईट गोष्‍टींपासून अंग चोरण्‍याचा प्रयत्‍न केला तर मानवाचे त्‍यात भले आहे.''

मराठी बोधकथा तात्पर्य - विश्वातील प्रत्येक प्राणी आपल्याला काही ना काही शिकवण देतच असतो.


धनाचा विनियोग बोधकथा | Bodh Katha

एकदा एक कोल्‍हा जमिनीत बीळ खणत असताना खूपच खोल खणत गेला. खूप खोल गेल्‍यावर त्‍याला तिथे एक धनाचा हंडा दिसला व त्‍यावर एक वृद्ध नाग त्‍या धनाचे रक्षण करत होता. कोल्‍ह्याने नागाला विचारले,''हे नागदेवता, तुम्‍ही इथे काय करता आहात.'' नाग म्‍हणाला,'' माझ्या पूर्वजांनी पुरून ठेवलेल्‍या धनाचे मी रक्षण करत आहे.

'' मग कोल्‍हा पुन्‍हा म्‍हणाला,'' पण इथं इतकं मोठं धन असताना तुम्‍ही कधी त्‍याचा उपभोग घेतला आहे किंवा नाही. उपभोग सोडा थोडंफार धन दानापोटी तरी खर्च केलंत काय'' नाग म्‍हणाला,'' कसं शक्‍य आहे, हे धन कमी होऊ नये म्‍हणून तर मी स्‍वत: या धनाचे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून रक्षण करत आहे. त्‍याचा उपभोग घेणे किंवा दुस-याला दान देणे ह्यापेक्षा या धनाचे रक्षण करण्‍यातच मला जास्‍त आनंद आहे.

'' हे ऐकून कोल्‍हा नागाला म्‍हणाला,'' मग नागदेवा, तुमच्‍या असल्‍या या श्रीमंतीपेक्षा मी गरीब आहे तोच बरा. ज्‍या धनाचा उपभोग घेतला जात नाही व ज्‍यातून दान केले जात नाही अशा धनाचा काय उपयोग''

मराठी बोधकथा तात्पर्य- ज्‍या धनाचा योग्‍य विनियोग न होता केवळ संचय केला जातो त्‍या धनाचा मनुष्‍यमात्राला काहीच फायदा नाही.


आत्‍मज्ञान बोधकथा | Bodh Katha

  एक संत वनात कुटी बांधून राहत होते. कंदमुळे खाऊन ते गुजराण करत असत आणि परमेश्‍वराचे चिंतन करत. वनातून जाणारा कोणी त्‍यांची कुटी पाहून थांबत असे. तेव्‍हा ते त्‍याच्‍याशी प्रेमाने बोलत. जे काही जवळ असेल ते त्‍याला खाऊ घालत. एक दिवस एक तरूण त्‍यांना भेटायला आला. त्‍यांच्‍या बोलण्‍याने तो प्रभावित झाला आणि त्‍यांचा शिष्‍य बनून तेथेच राहू लागला. संताने त्‍याला तपश्‍चर्या कशी करतात याविषयी माहिती दिली. शिष्‍याने गुरुच्‍या शिकवणीप्रमाणे वाटचाल सुरु केली. गुरुशिष्‍य स्‍नेहभावनेने राहू लागले. एकदा संत त्‍याला म्‍हणाले,'' मन मोठे चंचल असते, त्‍याला नियंत्रणातच ठेवले पाहिजे.

'' ही गोष्‍ट शिष्‍याच्‍या मनावर ठसली. त्‍या दिवसापासून त्‍याने स्‍वत:ला एका खोलीत बंद करून घेतले. संताने त्‍याला विचारले असता शिष्‍य म्‍हणाला की, तो त्‍याच्‍या मनावर ताबा मिळविण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. शिष्‍य रात्रंदिवस खोलीतच राहू लागला. आश्रमात येणा-या जाणा-याकडे तो अजिबात लक्ष देईनासा झाला. एकेदिवशी गुरुने शिष्‍याला खोलीचा दरवाजा उघडावयास सांगितले. 

गुरु आत आले ते हातात एक वीट घेऊनच. गुरुंनी शिष्‍याला काहीच न बोलता ती वीट एका दगडावर घासायला सुरुवात केली. शिष्‍याने विचारले की, गुरुजी हे काय करताय तुम्‍ही. गुरु म्‍हणाले, या विटेपासून आरसा बनवायचा आहे. शिष्‍य म्‍हणाला, गुरुजी असे कसे शक्‍य आहे. गुरुजी शांतपणे शिष्‍याला म्‍हणाले,'' 

ज्‍याप्रमाणे विटेचा आरसा बनू शकत नाही तसे मनाचा आरसा बनू शकत नाही. मन तर धूळ आहे जी आत्‍म्‍यावर पडलेली असते. ती धूळ विसरण्‍याचा प्रयत्‍न केला तरच खरेपणा दिसून येतो.'' शिष्‍याला गुरुची शिकवण समजून आली.

मराठी बोधकथा तात्पर्य – चंचल मनाला नियंत्रणात ठेवूनच प्रगती साधता येते.

बोधकथा | Bodh Katha

बोधकथा
 • bodh katha
 • bodh katha marathi
 • bodh katha in hindi
 • marathi bodhkatha
 • small bodh katha
 • marathi bodh katha pdf
 • bodh katha bodh katha
 • marathi bodh katha for students
 • marathi bodh katha for whatsapp
 • lahan mulanchya bodh katha
 • bodhpar goshti
 • katha marathi bodh katha
 • chan chan bodh katha

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post