जय जय महाराष्ट्र माझा इयत्ता सातवी | जय जय महाराष्ट्र माझा- इयत्ता सातवी मराठी

जय जय महाराष्ट्र माझा इयत्ता सातवी | जय जय महाराष्ट्र माझा- इयत्ता सातवी मराठी 

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ।।धृ.।।
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा ।।१।।

भीति न आम्हां तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला, जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव शंभू राजा
दरीदरींतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ।।२।।

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
 दिल्लीचेही तक्त राखितो महाराष्ट्र माझा ।।३।।

जय जय महाराष्ट्र माझा इयत्ता सातवी | जय जय महाराष्ट्र माझा- इयत्ता सातवी मराठी 

जय जय महाराष्ट्र माझा इयत्ता सातवी | जय जय महाराष्ट्र माझा- इयत्ता सातवी मराठी

राजा बढे (१९१२-१९७७): प्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार. ‘माझिया माहेरा जा’, ‘हसले मनी चांदणे’, ‘क्रांतिमाला’, ‘मखमल’ इत्यादी गीतसंग्रह प्रसिद्ध; ‘गीतगोविंद’, ‘गाथासप्तशती’, ‘मेघदूत’  इत्यादी काव्यांचे अनुवादही प्रसिद्ध.  प्रस्तुत गीतातून कवीने महाराष्ट्राची थोरवी सागिं तली आहे.

 भारत देश महान-इयत्ता आठवी मराठी

आमच्या विरोधात कटकारस्थाने करणाऱ्या व विरोधात बोलणाऱ्याची आम्हाला मुळीच भीती वाटत नाही.गडगडणारे ढग आम्हाला घाबरवू शकत नाही.याना उउत्त्र देण्यासाठी आमच्या जीभाच पुरेशा आहेत.अशीच शिकवण सह्याद्रीच्या सिंह छत्रपती शिवराय यांनी आम्हाला दिली आहे.त्यांच्या शिकवणीच्या घोषणा दरीदरीतून घुमत आहेत.हा महाराष्ट्र माझा आहे.

या महाराष्ट्रातील माणसे रांगडी आहे

या महाराष्ट्रातील माणसे रांगडी आहे.त्यांच्या या काळ्या छातीवर महाराष्ट्राविषयी असलेल्या अभिमानाची लेणी कोरली आहेत.त्यांची मनगटे पोलादी आहेत.त्यामुळे ते जिवावरचा खेळखेळण्यास मागेपुढे पहात नाही.महारास्त्रातील लोक दारिद्र्याच्या उन्हात शिजतात,पण कष्ट करून ते निढळाचा घाम गळतात.भरपूर कष्ट करतात.पिढ्यानपिढ्या इथे देश गौरवासाठी लोक झिजले आहेत.दिल्लीच्या सिंहासानाचीही शान राखणारा असा महाराष्ट्र आहे.

जय जय महाराष्ट्र माझा इयत्ता सातवी | जय जय महाराष्ट्र माझा- इयत्ता सातवी मराठी 

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post