उपक्रमातला माझा सहभाग मराठी निबंध | Upkramatla Majha Sahbhag Nibandh

उपक्रमातला माझा सहभाग मराठी निबंध | Upkramatla Majha Sahbhag Nibandh

आपण नवीन इयत्तेमध्ये गेल्यानंतर आपल्याला नवीन अभ्यासक्रमानुसार शालेय अभ्यासक्रमामध्ये उपक्रमांचा खूप महत्त्व आहे असेच नवनवीन उपकरण माझ्या शाळेमध्ये खूप जास्त प्रमाणात चालतात. यामुळेच आमच्या शाळेतील प्रत्येक शिक्षकाने त्याच्या विषया अंतर्गत एक उपकरण बनवायला लावलेली आहेत या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात भाग घ्यावाच लागतो कारण या उपक्रमांचे गुण विद्यार्थ्यांना मिळतात जे की या वर्षभराच्या टिप्पणी मध्ये नोंदले जातात. याच उपक्रमांमध्ये माझे खूप सारे चांगले वाईट प्रसंग म्हणजेच अनुभव आहेत.

आमच्या शहरांमध्ये आमच्या जिल्हा प्रमुखाने हरित शहर हा उपक्रम राबवण्याचे ठरवले या उपक्रमामध्ये जिल्ह्यामधील सर्व शाळा एकत्र आल्या आणि या शाळांना झाडे लावण्याचे काम सोपावली गेले या शाळेमध्ये कॉम्पिटिशन म्हणून जी शाळा सर्वात जास्त झाडे लावेल जी शाळा त्या झाडांना जेवढ्या मोठ्या प्रमाणात मोठे करेल त्या शाळेला एक मोठे बक्षीस म्हणून निधी भेटणार होती त्या निधीमुळे शाळेची प्रगती खूप जोऱ्याने होऊ शकते या कारणाने आमच्या शाळेचे मुख्याध्यापक यांनी देखील आमच्या शाळेचे नाव नोंदणी केली आणि या नाव नोंदणीनंतर शाळेमध्ये या उपक्रमाची संपूर्ण माहिती देण्यास आली आणि आम्ही सर्वजण देखील या उपक्रमामध्ये भागीदार झालो.

हा उपक्रम एकट्याचा नसून पूर्ण शाळेचा आहे याच दृष्टिकोनातून शाळेमधील सर्व विद्यार्थी शिक्षक आणि मुख्याध्यापक कामाला लागले जेणेकरून शाळेला बक्षीस मिळेल आम्ही पहिल्यांदा आलेली झाडे ही पूर्ण शाळेच्या अवतीभोवती लावली गावांमधील ग्रामपंचायत त्याचप्रमाणे गावातील हॉस्पिटल आणि गावामधील ज्या ठिकाणी झाड लावणं शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही झाडे लावली आणि त्याचप्रमाणे त्या झाडांना पाण्याची सोय म्हणून सरकारकडून मिळालेला ठिबक सिंचनाचा वापर केला. त्याचप्रमाणे या उपकरणांमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरी देखील झाडे घेऊन गेली आणि घराच्या अवतीभवती जागा असेल त्या ठिकाणी ती झाडे लावली. हा उपक्रम खूप मोठा उपक्रम होता.

या उपकरणांमध्ये सर्व झाडी ही आम्हाला वन विभाग खाते यांनी पुरवले त्याचप्रमाणे बाकीचे सर्व गोष्टी आम्हाला जिल्हाप्रमुखांनी देण्याचे आश्वासन केलेले होते आणि मुख्याध्यापक यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे सर्व शिक्षकांना घेऊन या उपक्रमामध्ये खूप जास्त प्रमाणात काम केले जेणेकरून सर्व जिल्ह्यांमधल्या शाळेमध्ये आमची शाळा ही प्रथम क्रमांकाची शाळा म्हणून निवडण्यात आली आमच्या शाळेने पूर्ण गावभरामध्ये 25 हजार झाडे लावली आणि याच कारणाने आमच्या शाळेला बक्षीस देखील मिळाले. 

असा आहे माझा शाळेतील सर्वात मोठा उपक्रम आणि या उपकरणांमध्ये माझा अनुभव म्हणजे खूप मौल्यवान आहे की सर्वांनी मिळून जेव्हा काम केले जाते ते काम लवकर होते आणि चांगले देखील होते त्याचप्रमाणे झाडी लावली पाहिजे झाडांना आपण खूप चांगल्या प्रकारे संभाळलं पाहिजे जेणेकरून ती झाडे आपल्याला पुढे जाऊन सावली देण्याची फळे देण्याचे आणि इतर गोष्टींना देखील कामाला येतील आणि खूप महत्त्वाचे म्हणजे प्राणवायू देखील याच झाडांमुळे आपल्याला मिळतो म्हणून मी केलेला हा शालेय उपक्रम मला कायम लक्षात राहील.

उपक्रमातला माझा सहभाग मराठी निबंध | Upkramatla Majha Sahbhag Nibandh

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post