माझे आवडते शिक्षक मराठी निबंध | My Favourite Teacher Essay in Marathi

माझे आवडते शिक्षक मराठी निबंध | My Favourite Teacher Essay in Marathi

आवडते शिक्षक म्हणलं तर मला माझे आवडते शिक्षक जाधव सर आठवतात जाधव सर हे माझे आवडते शिक्षक आहे केवळ माझेच नाही तर ती माझ्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचे आवडते शिक्षक आहेत त्याचप्रमाणे या शाळेमधून जितके विद्यार्थी शिकून गेलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे जाधव सर हे आवडते शिक्षक आहे. आमची शाळा ही एक गावाकडची शाळा आहेत आणि या शाळेमध्ये जाधव सर हे येत्या पंधरा वर्षापासून शिकवत आले आहेत. म्हणूनच जाधव सरांची ओळख ही पूर्ण गावाभरात एक वंदनीय शिक्षक किंवा एक चांगले शिक्षक म्हणून झालेली आहेत.

जाधव सर यांची व्यक्तिमत्व रुबाबदार आहेत उंच शरीराचे चेहऱ्यावर तेज असणारे सरांचा पोशाख अगदी स्वच्छ आणि साधा असतो कधी कधी ते खादीचा लांब सदरा घालतात त्यांच्या राहणीमानावरून ते एकदम रुबाबदार दिसतात. परंतु कधीकधी त्यांनी घातलेले भडक रंगाचे कपडे मला अजिबात आवडत नाही. तसंच त्यांच्या कडे आता सिनेमांमध्ये जे कपडे वापरतात ते कधीच दिसत नाही. तसेच त्यांच्या स्वच्छ व साध्या पोशाखांवरूनही पाहणाऱ्याला सरांचा निर्मळ आणि स्वच्छ अंतकरणाची आणि चांगल्या चरित्राची लक्षणे दिसून येतात.

जाधव सर हे मराठी विज्ञान गणित इतिहास असे सर्व विषय शिकवण्यास सक्षम आहेत तसेच त्यांनी शिकवलेला विषय हा खूप जास्त दिवस लक्षात राहतो मला आठवते की मी त्यांच्या हातून शिकलेलो गणित अजूनही विसरलेलो नाही ते विज्ञान आणि गणित विषय तर अगदी सोप्या भाषेत शिकवतात कारण जाधव सरांचे कौशल्य ही खूप चांगले आहेत आणि ते खूप जास्त दिवसापासून शिकवत आहे त्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांना काय शिकवायचे आहे ते माहित आहे त्याच कारणाने सर्व विद्यार्थ्यांना सर्व विषय खूप सोपी जातात.

त्यांची शिकवण्याची पद्धत ही अतिशय वेगळी आहेत ते घरगुती प्रसंगांतील उदाहरणे घेतात म्हणजेच आपल्या जीवनामध्ये चालू घडामोडींचे उदाहरण घेऊन ते त्या उदाहरणांना सहजपणे अभ्यासाकडे वळवतात ते आपल्याला जीवनामध्ये घडलेल्या गोष्टी किंवा आपण वापरत आलेलो गोष्टी याच गोष्टींचे विज्ञान आणि गणिताचा वापर कुठे होतो या गोष्टी शिकवतात उदाहरणार्थ आम्हाला एकदा त्यांनी दही लावायची संपूर्ण क्रिया शिकवली होती त्यामध्ये विज्ञान कोणत्या कोणत्या ठिकाणी आपल्याला उपयोगी येतं त्या सर्व गोष्टी आम्हाला त्यांनी शिकवल्या ्याचप्रमाणे असे खूप सार्‍या गोष्टी ते आम्हाला शिकवत होते म्हणून ते सर्वांचे आवडती शिक्षक म्हणून सर्व गावांमध्ये प्रसिद्ध होते.

आता मी दहावीच्या वर्षाच्या शेवटी आलेलो आहेत आणि माझ्या मनात विचार आला की आता मला जाधव सरांचे शिकवलेल्या गोष्टी असेच चांगले शिक्षण मला परत भेटेल का माहित नाही पण मला मनातून वाटतंय की पुढे जाऊन देखील मला अशाच प्रकारचे चांगले शिक्षक मिळतील आणि ते शिक्षक मिळाले तर ते माझ्या भाग्यच असेल.

माझे आवडते शिक्षक मराठी निबंध | My Favourite Teacher Essay in Marathi

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post