{100+} मराठी कविता संग्रह |Heart Touching Marathi Kavita on Life

 {50+} मराठी कविता संग्रह |Heart Touching Marathi Kavita on Life 

कविता कविता या नावांमध्येच अर्थ जडलेला आहे कवितांमध्ये एक विशेष जादू असते जी आपल्या हृदयाला आणि मनाला स्पर्श करून जाते . कवितेमध्ये राग असतो प्रेम असतं काही भावना असते आणि काही क्षण आपण कवितेमध्ये रूपांतर करून त्यांना आयुष्यभर जगू शकतो. एखादा क्षण आपण व्हिडिओ प्रमाणे कवितेमध्ये रूपांतरित करू शकतो आणि ती कविता वाचून ऐकून आपण तो क्षण पुन्हा पुन्हा आठवू शकतो. कविता आपल्याला रडू शकतात हसू शकतात प्रतिबिंबित करू शकतात स्वप्न पहायला शिकवू शकतात.

कविता एक प्रकारचा खजिना आहे जो जीवनात आपल्याला आनंद समाधानी यशस्वी होण्यासाठी मदत करतो. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख आनंद प्रेम आहे. अनेक कवींनी किंवा लेखकांनी आपल्याला खूप छान प्रकारच्या कविता लिहून दिलेले आहेत आणि याच कविता आज आपण बघणार आहोत ज्या आपल्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी मदत करतील.

1 thought on “{50+} मराठी कविता संग्रह |Heart Touching Marathi Kavita on Life |

मैत्री करत असाल तर

पाण्या सारखी निर्मळ

करा..

दूर वर जाऊन सुद्धा

क्षणों क्षणी आठवेल

अशी करा..

मैत्री करत असाल तर

चंद्र तारे यां सारखी अतूट

करा..

ओंजळीत घेवून सुद्धा

आकाशात न मावेल

अशी करा..

मैत्री करत असाल तर

दिव्यातल्या पणती सारखी

करा..

अंधारात जे प्रकाश देईल

हृदयात असं एक मंदीर

करा..

-------------------

बर्फाचे तट पेटुनि उठले सदन शिवाचे कोसळते

रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते

असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे

अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर पळे ?

कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे ?

साममंत्र तो सरे, रणाची नौबत आता धडधडते

सह्यगिरीतिल वनराजांनो या कुहरातुन आज पुढे

रक्त हवे जर स्वतंत्रतेला, रक्ताचे पडतील सडे

एक हिमाचल राखायास्तव करा हिमालय लक्ष खडे

समरपुराचे वारकरी हो समरदेवता बोलविते

खडक काजळी घोटुनि तुमचे मनगट-बाहू घडलेले

कडेकपारीमधील वणवे उरात तुमच्या दडलेले

काबुल-कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले

शिवतेजाची दीपमाळ पाठीशी अपुल्या पाजळते

कोटि कोटि असतील शरीरे मनगट अमुचे एक असे

कोटि कोटि देहांत आज या एक मनिषा जागतसे

पिवळे जहरी सर्प ठेचणे – अन्य मना व्यवधान नसे

एक प्रतिज्ञा, विजय मिळेतो राहिल रण हे. धगधगते

----------------

एक वाक्य जीवनात

सदैव लक्षात ठेवावे

एका ठिकाणी थांबल्यापेक्षा

हळूहळू चालत राहावे

प्रेरणादायीकविता मराठी

आपल्याला अपयश मिळाल्यावर

कुणाला काहीही वाटू दे

स्वतःला मजबूत करून

स्वप्नांना पुन्हा बहर येऊ दे

मनातील स्वप्ने खूप मोठी असावी

ती पूर्ण न करण्यासाठी

कारणे मात्र कोणतीच नसावी

मनातील भीतीही

तेव्हाच नाहीशी होते

जेव्हा आपल्या क्षमतांची

आपल्याला जाणीव असते.

मनातील स्वप्ने

तेव्हाच सत्यात उतरतील

जेव्हा त्यावर मनापासून

कृती केल्या जातील.

प्रेरणादायी कविता मराठी

हवं ते मिळवण्यासाठी

एक दिवस किंवा वर्षही लागेल

मात्र ते गमावण्यासाठी

एक क्षणही पुरेसा असेल

एखाद्या जंगलाची सुरुवात

जशी छोट्याश्या ‘बी’ ने होते

तशीच आपल्या यशाची सुरुवात

घेतलेल्या निर्णयावर कृती केल्याने होते

एका दिवसात कुठं

यश मिळत नसते

फक्त कालच्यापेक्षा आज

थोडं चांगल करावं लागते.


स्वतःला घडवणारे

पण आपणच

आणि बिघडवणारे सुद्धा

आपणच

प्रेरणादायी कविता मराठी

अपयश मिळाल्यावर

यशासाठी मार्ग बदलावे

पण अपयशाला घाबरून

माघारी न फिरावे

----------

काम करत राहिलं

तर चुका होत राहतील

अन चुका सुधारल्या

तर कामही पूर्ण होतील.

प्रेरणादायी कविता मराठी

मनासारखं स्वप्न पाहण्यासाठी

झोप लागावी

अन ते पूर्ण करण्यासाठी

मग झोप उडावी

आलेल्या संकटांना

घाबरायचं नसतं

त्यांना हरवण्यासाठी

नेहमी तयार राहायचं असतं

स्वतःला ओळखून

ध्येय ठरवावे

ध्येय मोठेच असेल

तर स्वतःला बदलावे

जिथं असाल तिथून

सुरुवात करावी

जे असेल जवळी

त्याचीच ढाल बनवावी

मागे वळून पाहतांना

भूतकाळात न गुंतावे

आधीपेक्षा किती समोर आलोत

हे जरूर पाहावे

साधी सरळ माणसं

मूर्ख नसतात

ते फक्त समोरच्याला

चांगल समजतात

प्रेरणादायी कविता मराठी

तेव्हा आपण

हरलेलो असतो

जेव्हा आपण

प्रयत्न करणे सोडतो


इतरांचं ऐकून

ध्येय ठरवू नये

मनाला न आवडल्यास

सुरुवातच करू नये

प्रेरणादायी कविता मराठी

तेव्हा सर्व काही संपते

जेव्हा आपण

हार मानलेली असते.

----------

तुमच्यासाठी काय पण

पूरता पूरेना ते आयुष्य,

मिळता मिळेना ते प्रेम,

जुळता जुळेना ती सोबत,

पुसता पुसेना ती आठवण,

म्हणूनच काल पण,

आज पण आणि उद्या पण,

तुमच्यासाठी कायपण !!

शाळेत असतं बालपण,

काॅलेजात असतं तरूण पण,

बरणीला असतं झाकण,

आणि पेनाला असतं टोपण,

जिवलग मित्र आहोत आपण,

मित्रांसाठी कायपण !!

साद घाला कधी पण,

उभे राहु आम्ही पण,

तुमचे मन हेच आमचे सिँहासन,

आमची पण करत जा आठवण,


फक्त बोलत नाही

तर करुन दाखवू ।

तुमच्यासाठी काय पण"

हम वक्त और हालात के साथ

"शौक" बदलते है "दोस्त" नही


Maitri kavita marathi मैत्री कविता

मैत्री कधी ठरवून होत नाही

आपण आपल्या वाटवरुन चालत असतो

आपल्याबरोबर तसे अनेक वाटसरु असतात

रस्ते फुटत असतात....

एकमेकांत येऊन रस्ते मिसळत असतात

आपल्या नकळत कुणाची तरी वाट

आपल्या वाटेला येऊन मिळते

आणि नकळत आपण एकाच

वाटेवरुन समांतर चालु लागतो...

नंतर जवळ येतो

एकमेकाला आधार देतो

एकमेकाला सोबत करतो

एकमेकाची दु:खे वाटुन घेतो

आणि आनंदाचे क्षण साजरे करतो...

मैत्री अशी होते..!

काय जादु असते मैत्रीत!

मैत्री शिववते जगण्याचा खरा अर्थ

मैत्री बदलुन टाकते आयुष्याचे सारे संदर्भ

मैत्री देते आपुलकी, प्रेम अन विश्वास

मैत्री भारुन टाकते आपला श्वास अन श्वास...

कधी कधी वाटतं

समुद्राच्या काठावर शिंपल्याची रास पडलेली असावी

आपण भान विसरुन लहान मुलासारखं

त्यात खेळत असावं

शिंपलेच - शिंपले ....

विविध रंगाचे... विविध आकाराचे ... विविध प्रकारचे...

सहजपणे त्यातला एक शिंपला उचलुन घ्यावा

अलगद उघडावा

अन त्यात मोती सापडावा ....!


friendship poem in marathi [मैत्रीचा ठेवा]

गवळ्याने दुधात पाणी घातलं होतं,

ते दूध माईनं चुलीवर ठेवलं होतं.

इकडे पातेल्यात मात्र निराळीच कहाणी होती,

दूध आणि पाण्याची मैत्री झाली होती.

पातेल्याची गर्मी वाढू लागली,

तशी दुधातल्या पाण्याची वाफ होऊ लागली.

हे पाहून दूध दु:खी झाला,

त्याने पाण्याला अटकाव केला.

सायीचा थर त्याने दिला ठेवून,

पाणी बिचारं त्यात बसलं अडकून.

इच्छा असताना त्याला दुधात राहता येईना,

सायीच्या भिंतीने बाहेर जाता येईना.

शेवटी कंटाळून दुधाला म्हणालं पाणी,

"जाऊ दे मला नाही तर नष्ट होऊ आपण दोन्ही. "

पाण्याचे शब्द ऐकून दूध त्याला म्हणाला,

"मरणाची भीती नाही आपल्या मैत्रीला. "

पाण्याने दुधाला खुप समजावलं,

पण दुधाने त्याचं एक नाही ऐकलं.

शेवटी दोघांनी एक निश्चय केला,

आणि त्यांना वेगळं करणारा जो अग्नी होता;

त्यालाच त्यांनी नष्ट केला.

 friendship poem in marathi [मैत्री आमची ]

पहीला दिवस कॉलेजचा,

खुप खुप मजा केली,

एकटेपणाची सवय माझी

हळू हळू विरून गेली..

माझ्याच बसमधे,

माझ्याच वर्गात,

जणू आम्ही दोघे,

नव्या मैत्रीच्या शोधात..

मैत्रीसाठी माझा प्रस्ताव,

माझ्या विनंतीला तीचा होकार,

तेव्हा जाणवले आता मैत्रीच्या झाडाला,

नवी पालवी फुटणार..

मैत्री आमची खुप सुंदर,

एकाकीच्या सागरात जिव्हाळ्याच बंदर,

ती म्हणायची राहूया आपण,

असंच सोबती निरंतर…

तीचा माझ्यावर खुप जिव,

हे तिच्या स्वभावातून कळायचं,

माझ्या अपयशाला,माझ्या चुकीला,

तिच्या डोळ्यातून टीप गळायचं..

ती मला सावरायची ,

माझ्या उदासीला दुर लावायची,

आंनदाची ती श्रावणसर ,

माझ्यावर वेळोवेळी कोसळायची..

मैत्री आमची वाढत गेली,

तसं एकतर्फी प्रेम माझ्यात जागं झालं,

पण मैत्रीला काही होणार नाही ना?

असं भितीच वारं माझ्या मनात आल

अस्वथ व्हायला लागलो,

दिवसे न दिवस विचार करू लागलो,

तिला कसंतरी कळावं म्हणून,

उगाच प्रयत्न करू लागलो…

कॉलेजच्या शेवटच्या दिवशी,

मी तिला माझ्या मनातलं सांगितलं,

खरतरं आमच्या या नितळ मैत्रीला,

मी तेव्हाच दुर लोटलं..

marathi kavita friendship [ती फक्त मैत्री]

एक एक दगड मोलाचा

तोच दगड नदीचा,नाल्याचा

कधी डोंगरावरचा,कधी पाण्याखालचा

पण माणुस हा कवडीमोलाचा....!

ना त्याला कशाची भ्रांत,ना उसंत

असाच मनी तो सदा अशांत अशांत...

अशात एक हात मैत्रीचा

बनवी त्याला दगड सोन्याचा,चांदीचा

मैत्रीचा मुलामा कधी पाण्याने निघत नाही

त्याचा रंग अस्सल,कधी बेरंग होत नाही

जो ही दगड उचलला

एक माणुस दबला दिसतो

कधी स्वार्थाचा,कधी परमार्थाचा

म्हणुन प्रत्येक दगडाखाली

मित्र भेटत नाही...

मैत्रीचा रंग कसा हा

दगडाचा रंग जसा हा

उन वारा पाऊस कधीच

काहिच त्याचे बिघडवत नाही

तो तसाच आसतो सदा

जसा असतो आधी तसा

म्हणुन प्रत्येक दगडाचा रंग

काळा असत नाही...

काळा असला तरी

काळाच्या पाण्याने पांढरा होत नाही

तशीच असते ही मैत्री..!

काळ कितीही बदलला

तरी ती बदलत नाही

आणि जर बदलली तर...

ती मैत्री म्हणजे फक्त

दगडांची...

माणसांची होत


 Marathi kavita friendship [मैत्रीचे नाते]

मनात असतो विचारांचा काहूर

तरी शब्दा येत नाहीत ओठांवर

खूप काही सांगायचा असत

तेव्हा नसत कोणीही आपल्यासमोर

किती वेळा वाटत की आता

सोडून द्यावेत हे पाश मायेचे

पण नाही सुटत ते रेशमी बंध

आपल्याच नात्यातील कर्तव्याचे

रक्ताची नाती तर

"रेडीमेड" मिळतात

आणि बाकीची म्हणे

"कस्टमाइज़्ड" असतात

तरी "इट्स माइ चाय्स" हा

असतो निव्वळ एक भास

सगळा आधीच असत

"त्यानी" ठरवलेल खास

त्यातूनच मग जुळतात का

काहींचे सूर अनॉखे

आणि त्यालाच म्हणायचे का

आपण मैत्रीचे नाते?

-------------

सुंदर मराठी कविता/चारोळ्या | Heart Touching Marathi Kavita on Life 

तिन्ही सांजच्या धुक्यात

किती कळशी घेऊन

कुंकाउ कापली भरून

गेलीस तू**

वाट पाहून माझे

शेवाळलेले डोळे

पाय भयभीत वाले नदीकडे

तेथे काळे तुझा डाव

घाट पदे घाटावर

रेषा कुंकवाच्या चार पाण्यावरी

--------------

मैत्रीमधले अश्रू"

असते मतलबी, दुनिया ही सारी,

पण आपले, निराळे, असतातही काही,

दैव ज्यांची, सतत परिक्षा पाही,

मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी

जिथे असते श्रद्धा आणि भक्ति,

असे पुजनिय, असतात काही व्यक्ति,

क्षणिक असते, अबोल्याची सक्ति,

मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी

गौण ठरतात मैत्रीपुढे, रक्ताची नाती,

कारन ही असते, सुंदर, निर्मळ नाती,

मनास होत नाही, कधी येथे क्षिती,

मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी

इथे शब्द असतात काही, जे लागतात जिव्हारी,

विसर पडतो यांचा, इथे माणसं आपलीच सारी,

आठवणींन्ने त्यांच्या, मनास येते नवी ऊभारी,

मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी...

--------------

तिमिरातुनी तेजाकडे…

तिमिरातुनी तेजाकडे

ने दीपदेवा जीवना ॥

ज्योतीपरी शिवमंदिरी

रे जागवी माझ्या मना ॥

दे मुक्तता, भयहीनता

अभिमान दे, दे लीनता

दे अंतरा शुभदायिनी

मलयनिलासम भावना ॥

------------

आताच्या परिस्थितीनुसार

भविष्य ठरत नसते

तर आता घेतलेल्या निर्णयाने

भविष्य घडत असते.

परिस्थिती जशी आहे

तशी स्विकारावी

अन आपल्याला जशी हवी

तशी बनवावी

जे हवं आहे

ते मिळत नाही

कारण ते मिळवायचं कसं?

हेच कित्येकांना कळत नाही

स्वतःच्या मनावर

नियंत्रण नसेल

तर साधं-सरळ आयुष्य

खूप अवघड वाटेल

एवढं समजदार

तर नक्की असावं

आपल्यातील वाईट

आपल्याला कळावं

प्रेरणादायी कविता मराठी

माणसाने आयुष्यात

समाधानी राहायचे असते

कारण कुणालाही आयुष्यात

सर्वकाही मिळत नसते

परिस्थिती स्वतःहुन

बदलत नसते

ती बदलण्यासाठी

स्वतःला बदलावं लागते

गरजेचं नाही

नेहमी सिंहाच्या आवेगातच असावं

मुंग्याप्रमाणे कधी कधी

शांततेत प्रयत्न करत राहावं

जन्म सगळ्यांचा

जिंकण्यासाठीच झालेला असतो

फक्त जिकायचं कसं?

हे ज्याचं तो ठरवतो

प्रेरणादायी कविता मराठी

यशासाठी सदैव

प्रेरित राहावं लागतं

कारण जगण्यासाठी जेवण सुद्धा

दररोज करावं लागतं.

-------------

इयत्ता चौथी सर्व मराठी कवितांचा संग्रह |मराठी कविता संग्रह|Marathi Kavita Sangrah

जाता जाता गाईन मी

गाता गाता जाईन मी

गेल्यावरही या गगनातील

गीतांमधुनी राहीन मी

**

माझे जगणे होते गाणे

कधी मनाचे कधी जनाचे

कधी घनाशय कधी निराशय

केवळ नाद तराणे

**

आलापींची संथ सुरावळ

वा रागांचा संकर गोंधळ

कधी आर्तता काळजातली

केव्हा फक्त बहाणे

**

राईमधले राजस कूजन

कधी स्मशानामधले क्रंदन

अजणातेचे अरण्य केव्हा

केव्हा शब्द शहाणे

**

जमले अथवा जमले नाही

खेद खंत ना उरले काही

अदृष्यातील आदेशांचे

ओझे फक्त वाहणे

----------

आडवाटेला दूर एक माळ

तरू त्यावरती एकला विशाळ

आणि त्याच्या बिलगूनिया पदास

जीर्ण पाचोळा पडे तो उदास

उषा येवो शिंपीत जीवनासी

निशा काळोखी दडवु द्या जगासी

सूर्य गगनातुनि ओतु द्या निखारा

मूक सारे हे साहतो बिचारा

तरूवरची हसतात त्यास पाने

हसे मुठभर ते गवतही मजेने

वाटसरु वा तुडवीत त्यास जात

परि पाचोळा दिसे नित्य शांत

आणि अंती दिन एक त्या वनांत

येइ धावत चौफेर क्षुब्ध वात

दिसे पाचोळा घेरुनी तयाते

नेइ उडवुनि त्या दूर दूर कोठे

आणि जागा हो मोकळी तळाशी

पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी

-----------

चूक झालीतर

ती मान्य करावी

ती परत होणार नाही

याची काळजी घ्यावी


आपल्यावर लोकांचा विश्वास

तेव्हाच बसेल

जेव्हा आपला विश्वास

आपल्यावर असेल

संधी दार ठोठावते

हे आता जुनं झालं

दार तोडून संधी मिळवणं

हे आता नवीन आलं

प्रेरणादायी कविता मराठी

अपयश मिळालं म्हणून

निराश होऊ नका

यश मिळेपर्यंत

प्रयत्न करणे सोडू नका

मनासारखं यश

त्यांनाच मिळतं

ज्यांना प्रत्येकक्षणी

ध्येय डोळ्यासमोर दिसतं

जे कारणे देण्यात

तरबेज असतात

ते क्वचितच आयुष्यात

यशस्वी होतात

स्वतःला ओळखून

क्षेत्र निवडावे

नाहीतर क्षेत्रानुसार

स्वतःला बदलावे.

प्रेरणादायी कविता मराठी

आभार तर

चुकांचेही मानावे

कारण तीच आपल्याला

नवीन शिकवते

यश आपल्याला

शोधत येत नसतं

तर यशाला

खेचून आणावं लागतं

यश मिळाल्यावर

सर्वच जमतात

फक्त अपयशावेळीच

एकटं पाडतात.

----------

मराठी कविता संग्रह

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनिने त्या

समुद्रा, डळमळू दे तारे !

विराट वादळ हेलकावूदे पर्वत पाण्याचे

ढळुदे दिशाकोन सारे !**

ताम्रसुरा प्राशुन मातुदे दैत्य नभामधले

दडुद्या पाताळी सविता

आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला

करायला पाजुळुदे पलीता !**

की स्वर्गातुन कोसळलेला, सुड समाधान

मिळाया प्रमत्त सैतान

जमवुनी मेळा वेताळांचा या दर्यावरती

करी हे तांडव थैमान**

पदच्युता, तव भिषण नर्तन असेच चालु दे

फुटू दे नभ माथ्यावरती

आणि, तुटु दे अखंड ऊल्का वर्षावत अग्नी

नाविका ना कुठली भिती**

सहकाऱ्यानो, का हि खंत जन्म खलाशांचा

झूंजण्या अखंड संग्राम

नक्षत्रापरी असीम नभामध्ये संचरावे

दिशांचे आम्हांला धाम**काय सागरी तारू लोटले परताया मागे

असे का हा आपुला बाणा

त्याहुनी घेऊ जळी समाधि, सुखे कशासाठी

जपावे पराभुत प्राणा ?**

कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अन मरती

जशी ती गवताची पाती

नाविक आम्ही परंतु फ़िरतो सात नभांखाली

निर्मीतो नव क्षितिजे पूढती !**

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन, ना दारा

घराची वा वितभर कारा

मानवतेचे निशाण मिरवू महासागरात

जिंकुनी खंड खंड सारा !**

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती

कथा या खुळ्या सागराला

“अनंत अमुची ध्येयसक्ती अनंत अन आशा

किनारा तुला पामराला”

-------------

चार होत्या पक्षिणी त्या, रात होती वादळी

चार कंठी बांधलेली एक होती साखळी

दोन होत्या त्यात हंसी, राजहंसी एक ती

आणि एकीला कळेना जात माझी कोणती

बाण आला एक कोठुन जायबंदी हो गळा

सावलीला जाण आली जात माझी कोकिळा

कोकिळेने काय केले ? गीत झाडांना दिले

आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले

ती म्हणाली, एकटी मी राहिले तर राहिले

या स्वरांचे सूर्य झाले, यात सारे पावले

Famous Marathi Poem

स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या, राजस राजकुमारा

अपार माझ्या काळोखाला दिलास जीवनतारा

सुंदर आता झाली धरती, सुंदर नभ हे वरती

वैराणावर उधळीत आला श्रावण सुंदर मोती

मनात माझ्या मोरपीसांचा फुलला रंग पिसारा

रात्र एक मी अथांग होते नव्हता दीप उशाला

जागही नव्हती, नीजही नव्हती, नव्हता अर्थ कशाला

हारपलेल्या या नौकेला गवसे आज किनारा

----------

पुरे झाले चंद्र-सुर्य, पुरे झाल्या तारा,

पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा

मोरासारखा छाती काढून उभा राहा,

जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा

सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा.||

शेवाळलेले शब्द आणिक यमक-छंद करतील काय?

डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधील काय?

उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत,

जास्तीत-जास्त बारा महिने बाई बसेल झुरत

नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय?||

म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ,

प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ||प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं,

प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं||

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,

मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलंं||

शब्दांच्या या धुक्यामधे अडकु नकोस,

बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस||उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं,

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं!

100 Best Marathi Kavita Marathi Poems | मराठी कविता | मराठी कविता संग्रह

एकदा ऐकले काहींसें असें

असीम अनंत विश्वाचे रण

त्यात हा पृथ्वीचा इवला कण

त्यांतला आशिया भारत त्यांत

छोट्याशा शहरीं छोट्या घरांत

**

घेऊन आडोसा कोणी ‘मी’ वसें

क्षुद्रता अहो ही अफाट असें!

भिंतीच्या त्रिकोनी जळ्मट जाळी

बांधून राहती कीटक कोळी

**

तैशीच सारी ही संसाररीती

आणिक तरीही अहंता किती?

परंतु वाटलें खरें का सारें?

क्षुद्र या देहांत जाणीव आहे

जिच्यात जगाची राणीव राहे!**

कांचेच्या गोलांत बारीक तात

ओतीत रात्रीत प्रकाशधारा

तशीच माझ्या या दिव्याची वात

पाहते दूरच्या अपारतेंत!**अथवा नुरलें वेगळेंपण

अनंत काही जेंत्याचाच कण!

डोंगरदऱ्यांत वाऱ्याची गाणीं

आकाशगंगेत ताऱ्यांचे पाणीं**

वसंतवैभव उदार वर्षा

लतांचा फुलोरा

केशरी उषा….प्रेरणा यांतून सृष्टीत स्फुरे

जीवन तेज जें अंतरी झरे**

त्यानेच माझिया करी हो दान

गणावे कसे हें क्षुद्र वा सान?

-----------


माझे जगणे होते गाणे

सुरेल केंव्हा, केंव्हा बेसुर

तालावाचून वा तालावर

कधी तानांची उनाड दंगल

झाले सुर दिवाणे

कधी मनाचे कधी जनाचे

कधी धनास्तव कधी बनाचे

कधी घनाशय कधी निराशय

केवळ नादतराणे

**

आलापींची संथ सुरावळ

वा रागांचा संकर गोंधळ

कधी आर्तता काळजातली

केंव्हा फक्त बहाणेे

**

राईमधले राजस कूजन

कधी स्मशानामधले क्रन्दन

अजाणतेचे अरण्य केंव्हा

केंव्हा शब्द शहाणेे

**

जमले अथवा जमले नाही

खेद खंत ना उरली काही

अदॄश्यातिल आदेशांचे

ओझे फक्त वाहणे

**सुत्रावाचून सरली मैफल

दिवेही विझले सभागॄहातिल

कशास होती आणि कुणास्तव

तो जगदीश्वर जाणे

--------------

वाईट निर्णयामुळे

अनुभव येतात

तर अनुभवामुळे

चांगले निर्णय घेता येतात

प्रेरणादायी कविता मराठी

चुकत असलो तरी

शिकत रहावे

अपयशाची शिडी बनवून

त्यावरूनच चालत रहावे

अपयश मिळत असेल

तरी तमा न बाळगावी

भिंतीवर चढणारी मुंगी

नेमकी तेव्हा आठवावी

संपले असेल सर्वकाही

तरी हार न मानावी

पुन्हा नव्याने उभं राहून

अपयशातही संधी शोधावी

गरजेचं नाही

आयुष्यात हवं ते मिळावं

जे मिळालं आहे कधीतरी

त्यालाही जीवापाड जपावं

प्रेरणादायी कविता मराठी

कुठलीही अशक्य गोष्ट

नाही या जगात

फक्त ती मिळवण्याची

जिद्द असावी मनात

उभं राहिल्यापेक्षा

चालत रहावे

ध्येयाकडे एक एक पाऊल

टाकत रहावे

आले अपयश तरी

हार मानू नका

यश मिळेपर्यंत

प्रयत्न सोडू नका

आहे त्या परिस्थितीत

समाधान मानावे

मात्र शिकण्यासाठी

सदैव तयार असावे

प्रेरणादायी कविता मराठी

बोलून दाखवण्यापेक्षा

करून दाखवावे

मनातल्या स्वप्नांना

खरं करून दाखवावे

-------------

 ,अजूनही

निळया जांभळ्या नदीला

आंबेवनाची सावली

भेट पहिलीवहिली

अकल्पित

… भेट दुरस्थपणाची

गर्भरेशमी क्षणाची

सौदामिनीच्या बाणाची

देवघेव.

गुलबक्षीच्या फुलानी

गजबजले कुपण

वेचू लागला श्रावण

मोरपिसे।

ओल्या आभाळाच्या खाली

इद्रचापाचे तुकडे

तुझा करपाश पडे

जीवनास.

कधी रेताडीचे रस्ते

कधी मोहरली बाग

कधी प्रासादास आग

कर्पुराच्या।

सप्तसुरातुनी गेले

माझ्या जीवनाचे गीत

तुझ्या सारगीची तात

साथ झाली.

बर्फवाट शिशिराची

आता पुढलिया देशी

तुझ्या मिठीची असोशी

अजूनही.


Marathi Kavita on Life | Marathi Poem on Life

कुठले पुस्तक कुठला लेखक

लिपी कोणती कसले भाकित

हात एक अदृश्य उलटतो

पानामागून पाने अविरत


गतसालाचे स्मरण जागतां

दाटून येते मनामधे भय

पान हे नवे यात तरी का

असेल काही प्रसन्न आशय

अखंड गर्जे समोर सागर

कणाकणाने खचते वाळू

तरी लाट ही नवीन उठता

सजे किनारा तिज कुरवाळू

स्वतः स्वतःला देत दिलासा

पुसते डोळे हसतां हसतां

उभी इथे मी पसरुन बाहू

नवीन वर्षा तुझ्या स्वागता

— शांता शेळके

-------------

दर्शनाला आलात? या..

पण या देवालयात, सध्या देव नाही

गाभारा आहे, चांदीचे मखर आहे.

सोन्याच्या सम्या आहेत, हिर्यांची झालर आहे.

त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.

वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या

पाहीलात ना तो रिकामा गाभारा?

नाही..तस नाही, एकदा होता तो तिथे

काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,

दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा

दोन तास वामकुक्षी घ्यायचा

सार काही ठीक चालले होते.

रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग

पडत होते पायाशी..

दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते

मंत्र जागर गाजत होते

रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.

बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते.**सारे काही घडत होते.. हवे तसे

पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव

उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला

कोणी एक भणंग महारोगी

तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”

आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय

गाभारा रिकामा

पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..

परत? कदाचित येइलही तो

पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर

त्याला पुन्हा..

प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,

आमच्या ट्रस्टींना,

पत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्या मुर्तीसाठी

पण तुर्त गाभार्याचे दर्शन घ्या.

तसे म्हटले तर, गाभार्याचे महत्व अंतिम असत,

कारण गाभारा सलामत तर देव पचास.


Marathi Charoli | मराठी चारोळी


वास्त्यल्याचा ठेवा, जरा जपूनी पू ठेवा...

माझ्या मराठीचा गर्व, र्व अभिमानाने फुलवा...

धन्य माझी माय माऊली, जिने मला पोसिले...

गौरव माझ्या मराठीचा, साऱ्या महाराष्ट्राने जाणिले...

मानतो माय माऊली, अशी माझ्या मराठीची बोली...

रसभरी, मधुभधु री वाणी, माझी माय मराठी गायली...

सदैव राहील प्रेम आमुचेमु चे, माझींया माऊलीवरती...

सर्वोच्च शिखर गाठील, माझी माय मराठी एकेदिवशी...

गौरवाने गातो गीत माझ्या मराठीचे...

मधूरधू वाणी लाभली आम्हांस भाग्य माझ्या मानव जातीचे...

जन्मापासूनी सू नाळ जोडली, माझी माझ्या या मातीशी...

घेऊन जाईल तुझंतु झंशिखरावर आज देतो मी वचन तुला तु ...

तुझ्तु याचंगर्भात रचिला मी माझ्या आयुष्युयाचा ठेवा...

माझ्या मराठीचा गर्व, र्व अभिमानाने फुलवा...

माझ्या मराठीचा वारसा देतो तान्हुल्या भातुकतु लीच्या हाता...

जोपासा माझ्या माऊलीला जिने गौरविल्या, घडविल्या लाख लाख पिढ्या...

ज्या कुशीत विसावला साऱ्या मानवतेचा ते ठेवा...

वास्त्यल्याचा ठेवा, जरा जपूनी पू ठेवा...

माझ्या मराठीचा गर्व, र्व अभिमानाने फुलवा...

माझ्या मराठीचा गर्व, र्व अभिमानाने फुलवा, अभिमानाने फुलवा....

- कोमल जगताप

-------------

नागिण होऊनी कुठे टाकते कालकुटाच्या चुळा

कुठे प्रकटतो हिच्याच देही इश्वरतेचा हात

**

… उषा होऊनी कधी करितसे प्रतिभेची लावणी

कधी शालूसम नेसून बसते ही अवसेची रात

**

हसणे रुसणे कधी दावते दवबिंदूची कुळी

कधी खडकावर कठोरतेने करी लीलया मात

**

ही रसरंगित करी सुगंधित जीवन म्हणती जया

हीच ठेविते फ़ुटकळ मरणे किनखापी बटव्यात

-----------


गर्दीत बाणासम ती घुसोनि

चाले, ऊरेना लव देहभान

दोन्ही करांनी कवटाळूनीया

वक्ष:स्थळी बालक ते लहान

**

लज्जा न, संकोच नसे, न भीती

हो दहन ते स्त्रीपण संगरात

आता ऊरे जीवनसूत्र एक

गुंतोनी राहे मन मात्र त्यात

**

बाजार येथे जमला बळींचा

तेथेही जागा धनिकांस आधी

आधार अश्रूसही दौलतीचा

दारिद्र्य दु:खा दुसरी  उपाधी**

चिंध्या शरीरावरी सावरोनी

राहे जमावात जरा उभी ती

कोणी पहावे अथवा पुसावे?

एकाच शापातून सर्व जाती

**

निर्धार केला कसला मानसी

झेपाउनी ये ठिणगीप्रमाणे

फेकूनिया बाळ दिले विमाने

व्हावे पुढे काय प्रभूच जाणे

**”जा बाळा जा, वणव्यातुनी या

पृथ्वीच आई पुढती तुझी रे

आकाश घेईं तुजला कवेंत

दाही दिशांचा तुज आसरा रे”**

ठावे न कोठे मग काय झाले

गेले जळोनीं मन मानवाचे

मांगल्य सारे पडले धुळीत

चोहीकडे नर्तन हिंस्त्रतेचे!


मित्रांनो जर तुम्हाला या मराठी कवितेचा संग्रह आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि या कविता तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठे कुठे उपयुक्त ठरल्या किंवा किती वेळा तुम्ही या कविता वाचला या देखील मला कमेंट करून सांगा.

Related Searches:

  • Maitri kavita marathi मैत्री कविता | friendship poem in marathi | marathi kavita
  • सुंदर मराठी कविता/चारोळ्या | Heart Touching Marathi Kavita on Life 
  • Marathi Kavita on Life | Marathi Poem on Life
  • Famous Marathi Poem
  • Marathi Charoli | मराठी चारोळी
  • इयत्ता चौथी सर्व मराठी कवितांचा संग्रह |मराठी कविता संग्रह|Marathi Kavita Sangrah
  • मराठी कविता संग्रह
  • 100 Best Marathi Kavita Marathi Poems | मराठी कविता | मराठी
  • कविता संग्रह
  • 1 thought on “{50+} मराठी कविता संग्रह |Heart Touching Marathi Kavita on Life |

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post