शब्दशक्ती मराठी व्याकरण - Shabdashakti Marathi Grammar [ अभिधा लक्षणा व्यंजना ]
शब्दशक्ती मराठी व्याकरण - Shabdashakti Marathi Grammar [ अभिधा लक्षणा व्यंजना ]
शब्दशक्ती म्हणजे काय ?
शब्दशक्ती म्हणजे काय - आपण आपल्या मनातील विचार , भावना व कल्पना भाषेच्या द्वारे व्यक्त करतो . अक्षरे , शब्द व वाक्ये हे भाषेचे घटक आहेत . अक्षरांच्या अर्थपूर्ण क्रमाला शब्द म्हणतात . प्रत्येक शब्दाला अर्थ असतो . भावना प्रकट करण्यासाठी आपल्याला योग्य शब्दांची निवड करावी लागते . शब्दाच्या अंगी अर्थ प्रकट करण्याची जी शक्ती असते तिला शब्दशक्ती असे म्हणतात .
शब्दशक्ती तीन प्रकारच्या आहेत ?
( १ ) अभिधा
( २ ) लक्षणा
( ३ ) व्यंजना .
शब्दातून किंवा वक्यातुं जेव्हा सरळसरळ किंवा शब्दश: अर्थ स्पष्ट होत असतो तेव्हा त्या शब्दशक्तिला अभिधा असे म्हणतात.तर त्या अर्थाला वाच्यार्थअसे म्हणतात.
व्यंजना शब्दशक्ती :
शब्दातून सरळ सरळ अर्थ प्रतीत न होता जेव्हा व्यंगात्मक अर्थ पतित होतो तेव्हा त्याला व्यंजना शब्दशक्तीअसे म्हणतात.तर त्या अर्थाला व्यंगार्थअसे म्हणतात.
लक्षणा शब्दशक्ती :
शब्दश: अर्थ न घेता सुसंगत अर्थ जेव्हा घ्यावा लागतो तेव्हा लक्षणा शब्दशक्ति आहे असे म्हणतात.
शब्दशक्ती मराठी व्याकरण |
अभिधा शब्दशक्ती मराठी व्याकरण
मी जंगलात एक हत्ती पाहिला .
• या वाक्यात ' हत्ती ' या शब्दातून अवाढव्य आकाराचा प्राणी हत्ती , हाच शब्दशः सरळ व रूढ अर्थ समजतो . इतर कुठलाही अर्थ प्रतीत होत नाही .
अशा प्रकारे शब्दाचा सरळ व रूढ अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दातील शक्तीला अभिधा म्हणतात .
अभिधा शक्तीने प्रकट होणाऱ्या अर्थाला वाच्यार्थ म्हणतात .
अभिधा शक्तीची ( वाच्यार्थ ) वैशिष्ट्ये
( १ ) ही शब्दाची पहिली शक्ती होय .
( २ ) यातून शब्दश : अर्थ सूचित होतो
( ३ ) तोच अर्थ शब्दकोशात सापडतो .
अभिधा शब्द शक्ति के उदाहरण
( १ ) राम एक राजा होता .
( २ ) तलावात भरपूर पाणी आहे .
( ३ ) ही वाट डोंगरगावची आहे .
( ४ ) बांगड्या रंगीत असतात .
( ५ ) मावळतीचा सूर्य सुंदर दिसतो .
लक्षणा शब्दशक्ती मराठी व्याकरण : लक्षणा शब्द शक्ति मराठी
माझ्या घरावरून हत्ती गेला .
• येथे ' घरावरून हत्ती ' हा शब्दश : रूढ अर्थ न घेता , त्या शब्दाशी सुसंगत असलेला दुसराच अर्थ घ्यावा लागतो . ' घरावरून ' म्हणजे घरावर पाय ठेवून नव्हे , तर घराच्या बाजूने ( वाटेने ) हत्ती गेला , असा अर्थ घ्यावा लागतो .
अशा प्रकारे एखादया शब्दाचा मुख्यार्थ ( वाच्यार्थ ) बाधित होऊन ( जाऊन ) त्याऐवजी सुसंगत असलेला दुसरा अर्थ येतो अशा मुख्यार्थ बाधित शब्दातील शक्तीला लक्षणा म्हणतात लक्षणा शक्तीने प्रकट होणाऱ्या अर्थाला लक्ष्यार्थ म्हणतात .
• लक्षणा शक्तीची ( लक्ष्यार्थ ) वैशिष्ट्ये :
( १ ) दुसरा अर्थ सूचित होतो .
( २ ) मूळ अर्थाला बाधा येते .
( ३ ) संदर्भाने सुसंगत दुसरा अर्थ प्रतीत होतो .
लक्षणा शब्द शक्ति के उदाहरण
यात काही राम नाही .
त्याच्या डोळ्यांतील पाणी आटले .
त्या वेळी माझी वाट लागली .
पानिपतावर सव्वा लाख बांगडी फुटली .
सूर्य विरून गेला .
व्यंजना शब्दशक्ती मराठी व्याकरण
पुढील वाक्य नीट वाचा :
लढताना वीरांच्या अंगी हत्ती संचारला .
• येथे ' हत्ती ' या शब्दाचा शब्दश : अर्थ अभिप्रेत नसून ' हत्तीचे बळ ' हा ध्वनित होणारा रूढार्थ प्रकट झाला आहे . मूळ अर्थाला बाध न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दाच्या शक्तीला व्यंजना म्हणतात .
व्यंजना शक्तीने प्रकट होणाऱ्या अर्थाला व्यंग्यार्थ म्हणतात . व्यंग्यार्थाची अनेकार्थी सूचकता : व्यंग्यार्थामध्ये एकाच वेळी अनेक अर्थ सूचित करण्याची किमया असते .
उदा . , दिवस मावळला . या वाक्याचा रूढार्थ ' सूर्यास्त झाला ' असा असला तरी त्यातील व्यंग्यार्थात व्यक्तिगणिक वेगवेगळ्या अर्थांची सूचना असते . ‘ दिवस मावळला ' म्हणजे
१ ) घरी परतायची वेळ झाली .
2 सायंप्रार्थनेची वेळ झाली .
3 घर आवरण्याची वेळ झाली . )
4 कामावरून घरी येणाऱ्या वडिलधाऱ्या मंडळींची वाट पाहण्याची वेळ झाली . )
5 अभ्यास करण्याची वेळ झाली . इत्यादी .
शब्दशक्ती मराठी व्याकरण |
• व्यंजना शक्तीची ( व्यंगार्थ ) वैशिष्ट्ये :
( १ ) वेगळा अर्थ सूचित होतो .
( २ ) मूळ अर्थाला बाधा येत नाही .
( ३ ) दुसरा सुसंगत अर्थ रसिकांपर्यंत पोहोचतो .
व्यंजना शक्तीची के उदाहरण
1. लाथ मारेल तिथे पाणी काढेल .
2. आपणच आपली वाट निर्माण करावी .
3. अखेर येते निरोप घेऊन निवांत मार्गात ते कंकण .
4. त्याच्या जीवनाचा सूर्य अस्ताला गेला .
शब्दशक्ती मराठी व्याकरण - Shabdashakti Marathi Grammar [ अभिधा लक्षणा व्यंजना ]
नक्की वाचा मराठी व्याकरण
Tags:
मराठी व्याकरण
Pustake hi mazi apatye....hi konti sakti aahe ??
ReplyDeleteप्रत्येक शब्दामध्ये अपला अर्थ प्रकट करण्याची अंगभूत शक्ती असते त्याला शब्दांच्या शक्ती असे म्हणतात.
Deleteशब्दांच्या अंगी तीन प्रकारची शक्ती असते.
१) अभिधा
२) लक्षणा
३) व्यंजना
१) अभिधा
एखादा शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा एक शब्दशः, शब्दकोशगत सरळ व रुढ अर्थ समजतो किंवा त्याच्याशी निगडीत जो सर्वसामान्य अर्थ निघतो, त्या शब्दांच्या शक्तीस अभिधा असे म्हणतात.
उदा.
मी एक साप पहिला.
आमच्या घरी एक पोपटआहे.
अभिधा शब्दशक्तीचे पुढीलप्रमाणे तीन प्रकार पडतात.
१) रूढी
यामध्ये शब्दांना रूढीने मिळालेला एकाच अर्थ असतो.
उदा.- त्याने वाघ पहिला.
२) योग
यामध्ये शब्दांचा उगम तसेच उलगडा सांगता येतो आणि शब्दाला एकाच मूळ अर्थ असतो.
उदा- मी भारतीय आहे.
३) योगरूढी
यामध्ये शब्दांचा उलगडा सांगता येतो आणि शब्दाला एकाच मूळ अर्थ असतो.
उदा- खग (ख -आकाश , ग – गमन करणारा ) – पक्षी
Explanation : शब्दामध्ये अनेक अर्थ लपविन्याची क्षमता असते , मराठी भाषा तर या बाबती मध्ये खुप अष्टपैलू प्रकाराची आहे , एकाच शब्दाचे अनेक अर्थ असणे किंवा ते अनुभवाने तसे काढ़ने या साठी तर अनेक मोठ्या सहीत्यकानी त्यांची हयात घातली , मराठी भाषेची अरथात अर्थ लपवन्याची एक खूबी आहे.येवडेच काय मराठी मध्ये एक चित्रपट संगीत सुधा फार प्रसिद्ध आहे जसे " शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलीकडले " मराठी संस्कृतीतील संतानी या शब्सिधी प्रकारचा वापर पुरेपुर करुण घेतला आहे , संत तुकाराम महाराज आणि संत माउलिंच साहित्य हे तर सम्पूर्ण शब्दसिधि संकल्पनेचा वापर करत आलेल आहे . शब्दांमध्ये प्रकट होण्याची अंगभूत शक्ति असते , शब्दांच्या या थेट किंवा गर्भित अर्थ स्पष्ट करण्याच्या शक्तीला शब्दशक्ती असे म्हणतात .
ReplyDeleteशब्द शक्ती चे उपप्रकार बाबत माहिती द्या
Delete