काव्यगुण मराठी व्याकरण | Kavyagun marathi [ प्रसाद माधुर्य ओज ]
काव्यगुण मराठी व्याकरण | Kavyagun marathi [ प्रसाद माधुर्य ओज ]
काव्यगुण म्हणजे काय ?
काव्यगुण म्हणजे काय - ज्या गुणांमुळे काव्याची शोभा वाढते , त्या गुणांना काव्यगुण म्हणतात .जसे माणसांच्या अंगी गुण असतात . तसे काव्यातही गुण असतात .
पुढील वाक्ये नीट वाचा :प्रत्येक वाक्यातून व्यक्तीचा कोणता गुण दिसून येतो , ते लक्षात घ्या :
वाक्ये
( १ ) सज्जनांची नेहमी संगत करावी . संतपणा
( २ ) परोपकार करणे हे पुण्यकर्म आहे . परोपकार
( ३ ) गणेशने जखमी कुत्र्यावर औषधोपचार केले . भूतदया पराक्रम
( ४ ) भीम हा महापराक्रमी योद्धा होता .
( ५ ) गणपतराव नेहमी दानधर्म करतात . उदारता / औदार्य
वरील उदाहरणांतील व्यक्तींप्रमाणे काव्यातही काव्यगुण असतात .
काव्यगुणाची वैशिष्ट्ये :
( १ ) विविध गुणांमुळे काव्य सुंदर व आकर्षक होते .
( २ ) गुणांमुळे काव्याला सौंदर्य प्राप्त होते .
३ ) काव्यगुणांमुळे काव्यातील रस आल्हाददायक व रसिकमान्य होतो .
काव्यगुणातील शब्दांची वैशिष्ट्ये :
( १ ) सोपे , सुटसुटीत , सहजसुलभ शब्द .
( २ ) नादमधुर शब्द .
( ३ ) शब्दांतील गेयता ( गाण्यास योग्य ) व अर्थाचा गोडवा .
( ४ ) ओळींतून व्यक्त होणारा सहजभाव . ( भावना ) -
काव्यातील प्रमुख गुण तीन आहेत :
( १ ) प्रसाद
( २ ) माधुर्य
( ३ ) ओज .
( १ ) प्रसाद काव्यगुण
प्रसाद म्हणजे सोपेपणा . सुबोध व अर्थ चटकन समजणारी काव्यरचना म्हणजे प्रासादिक रचना होय . काव्य ऐकल्यावर वा वाचल्यावर सहज अर्थबोध करून देणारा काव्यगुण असतो , त्याला प्रसाद म्हणतात
• प्रसाद गुणाची लक्षणे ( वैशिष्ट्ये ) :
( १ ) साधी , सोपी , अर्थसुलभ शब्दरचना .
( २ ) शब्द रसिकाच्या नित्य परिचयाचे व सरळ वाक्यरचना .
( ३ ) दुर्बोध , जटिल , अनाकलनीय शब्दरचना नसते .
( ४ ) सर्व रसांना पुष्टी देणारी रचना .
प्रसाद काव्यगुण उदाहरणे :
( १ ) अरे संसार संसार / जसा तवा चुल्हयावर आधी हाताले चटके / तवा मिळते भाकर
( २ ) माउलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार भुकेलेल्या तान्यापरी तोंड पसरे शिवार
( २ ) माधुर्य ( गोडवा ) काव्यगुण :
माधुर्य म्हणजे मधुरता किंवा गोडवा . काव्यात सोप्या शब्दांप्रमाणेच कोमल व मृदुवर्ण असलेले शब्द ऐकायला सुखद वाटतात . मधुर नादामुळे ते गुणगुणावेसे वाटतात . अशा अनुप्रासिक शब्दांच्या वापरामुळे काव्यात माधुर्य गुण येतो .
माधुर्य गुणाची लक्षणे ( वैशिष्ट्ये ) :
( १ ) मृदुवर्ण व कोमल शब्दांचा वापर .
( २ ) अनुप्रासादिक रचनेमुळे कर्णमधुरता .
( ३ ) रचनेतील गोडव्यामुळे मन प्रसन्न होते .
( ४ ) माधुर्य गुणामुळे चित्तवृत्ती तल्लीन होतात .
माधुर्य काव्यगुण उदाहरणे :
( १ ) श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे .
( २ ) गडद निळे , गडद निळे जलद भरून आले शीतल तनु , चपल चरण , अनिलगण निघाले .
( ३ ) ओज ( ओजस्विता ) काव्यगुण :
ओज म्हणजे आवेश व उत्साह . कठोर वर्ण , संयुक्त व्यंजने यांचा अधिक वापर करून कवी रचनेमध्ये जोमदारपणा निर्माण करतो . काव्यातील या गुणाने अंगात वीरश्री संचारते . ज्या काव्यरचनेत वीर व रौद्र रस आढळतो , तेथे ओज हा गुण असतो .
• ओज गुणाची लक्षणे ( वैशिष्ट्ये ) :
( १ ) जोडाक्षरे , कठोर वर्ण व दमदार शब्दांचा वापर .
( २ ) मनात उत्साह निर्माण करण्याची क्षमता .
( ३ ) वीर व रौद्र रसांची पुष्टी .
( ४ ) भाषा जोरकस व वीरश्री निर्माण करणारी .
ओज काव्यगुण उदाहरणे
( १ ) खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे उदाहरणे :
( २ ) डमडमत डमरू ये खणखणत शूल ये शंख फुकीत ये , येई रुद्रा .
- kavya gun marathi
- kavya gun marathi 11th class exercise
- काव्यगुण मराठी व्याकरण
- काव्यगुण मराठी
- kavya gun marathi 11th class
- 11th marathi kavya gun
- 11th marathi kavya gun swadhyay
- kavya gun marathi vyakaran
- kavya gun dosh
- kavya gun in marathi grammar
काव्यगुण मराठी व्याकरण | Kavyagun marathi [ प्रसाद माधुर्य ओज ]
Tags:
मराठी व्याकरण
very nice post
ReplyDelete