आमचा तहेवाईक शेजारी [ प्रसंग लेखन निबंध मराठी ]

आमचा तहेवाईक शेजारी [ प्रसंग लेखन निबंध मराठी ] 


     आपण जेव्हा नव्या जागेत राहायला जातो , तेव्हा आपल्याला त्या जागेविषयी विशेष कुतूहल असते . पण त्याचबरोबर आपले शेजारी कोण आहेत , याविषयी आपल्याला जास्त कुतूहल असते . विशेषत : परगावी जाऊन राहण्याचा योग आला तर तेथील शेजाऱ्यांविषयी अधिकच कुतूहल वाटत असते . बाबांची बदली चेन्नईला झाली , तेव्हा आमची सर्वांत पहिली अडचण होती ती भाषेची आणि त्यामुळे तेथील नव्या शेजाऱ्याविषयी विलक्षण कुतूहल होते ; पण तेथील शेजाऱ्याच्या घराला भलेभक्कम कुलूप होते .

     त्या बंद दाराकडे वरचेवर लक्ष जात होते . दोन - चार दिवसांनी शेजाऱ्याच्या घराचे दार उघडे दिसले . आत डोकावलो तर एक वृद्ध गृहस्थ टेबलापाशी अभ्यास करताना आढळले . मला जरा गंमतच वाटली की हा एवढा वृद्ध माणूस आणि विदयार्थ्यांसारखा अभ्यास काय करतोय ? पण त्यांचे माझ्याकडे लक्षच गेले नाही . मन जरा खटू झाले तेव्हा त्यांच्या बागेतून फेरफटका मारला . ती बाग फारच सुंदर होती . काही दिवसांनी मला आमचे ते शेजारी स्वतः बागकाम करताना दिसले . लगेच मी ती संधी साधली व त्यांना ' हॅलो ' करून त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली . त्यांना परक्या व्यक्तीशी बोलायला फारसे आवडत नसावे , हे माझ्या लक्षात आले . 

         ते माझ्या प्रश्नांना त्रोटक उत्तरे देत होते . त्यावरून मला एवढेच कळले की ते एकटेच राहत होते . ते माझ्या बाबांच्या कार्यालयातच काम करीत होते . नंतर बाबांकडून कळले की , ते त्या कार्यालयातील प्रमुख शास्त्रज्ञ होते . एका विशेष संशोधनाला त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते . कालांतराने तेथील वास्तव्यात आमचे ते शेजारी म्हणजे ' मणी अंकल ' माझे दोस्त बनले , अगदी जगावेगळे दोस्त . मणी अंकल जेव्हा त्यांच्या विचारांच्या तंद्रीत असत , तेव्हा ते मला ओळखही दाखवत नसत . एखादे वेळी ते मला ' परत जायलाही ' सांगत ; पण मला त्या वेळी त्यांचा जरादेखील राग येत नसे . त्या थोर शास्त्रज्ञाला एकाग्रतेची आवश्यकता आहे . याची मला जाणीव होती . 

        हेच मणी अंकल कधी लवकर घरी आले की , आपली गाडी आमच्या घराशी थांबवून मला खूप लांब फिरायला घेऊन जात . मग त्या दिवशी खूप धमाल असे . आणि खेळ यांचा ते माझ्यावर वर्षाव करीत आणि नेहमीच विचारात गढलेले असणारे हेच का ते ' अंकल ' असा मला प्रश्न पडे . वैज्ञानिक क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सरकारने त्यांना परदेशात पाठवले . जाण्यापूर्वी काकांनी मला खूप पुस्तके वक्षीस दिली आणि ' तू खूप अभ्यास कर . मोठा हो ! ' असे सांगितले . घरातल्या सर्वांना नवल वाटले की , इतरांशी इतक्या विक्षिप्तपणे वागणारा हा माणूस आपल्या बाळशीच कसा काय प्रेमाने वागतो ? या मणी अंकलच्या असंख्य सुखद आठवणी हा माझ्या आयुष्याचा मोलाचा ठेवा आहे .

आमचा तहेवाईक शेजारी [ प्रसंग लेखन निबंध मराठी ]

आमचा तहेवाईक शेजारी


Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post