माझी आजी मराठी निबंध | Mazi Aaji Essay in Marathi

माझी आजी मराठी निबंध | Mazi Aaji Essay in Marathi

माझी आजी मराठी निबंध | Mazi Aaji Essay in Marathi

        माझी आजी ! आमच्या कुटुंबातील वयाने सर्वात मोठी , वडीलधारी व्यक्ती , तिच्या वागण्याबोलण्यात कमालीचा साधेपणा आहे . ती सकाळी आमच्या थोडी आधी उठते अंघोळ आटोपली की ती माझ्या आईबरोबर स्वयंपाकघरात वावरते . आई तिला काम करू देत नाही . पण आजी ऐकतच नाही . आजीला स्वयंपाक करायला खूप आवडते . न्याहारीसाली ती कधीतरी एखादा पदार्थ करते . तिने केलेला पदार्थ सगळ्यांना आवडला की ती खूश होते . दुपारी जेवून झाले की काही वेळ ती टी . व्ही . पाहते . कधी कधी टी . व्ही . पाहता पाहता सेथेच झोपते . संध्याकाळ झाली की ती फेरी मारायला बाहेर पडते . ही संध्याकाळची फेरी मात्र ती कधीच चुकवत नाही .

         माझी आजी एका कारणासाठी मला खूप आवडते . ती कधीही रागावत नाही . मला तिने अजूनपर्यंत एकदाही साधी एक चापटही मारलेली नाही . एकदाही रागावली नाही . उलट , आईबाबा रागावले की ती माझीच बाजू घेते . माझ्या बाबांनाच दटावते ! आईबाचा आभ्यासासाठी खूप मागे लागले , तरी आजीला आवडत नाही . त्यामुळे मी आजीवर खूश ! तिने काहीही सांगितले की मी ताबडतोब करतो . तिला वाईट वाटणार नाही , याची काळजी घेतो . आईबाबासुद्धा आजीसारखेच वागले , तर किती छान होईल ! 

     आजीला वाचनाचा छंद आहे ; पण हल्ली तिचे डोळे दुखतात . मग ती मलाच वाचायला सांगते आणि ती ऐकते . तिला माझी अभ्यासाची पुस्तकेसुद्धा आवडतात . माझीच पुस्तके मला मोठ्याने वाचायला सांगते . दररोज संध्याकाळी मी तिच्यासाठी माझे एखादे पुस्तक वाचतो . मध्ये मध्ये तिला काही कळले नाही की ती मला आपली शंका विचारते . मीसुद्धा माझ्या परीने तिचे शंकानिरसन करतो . अलीकडे माझ्या लक्षात येऊ लागले आहे की , आजीला वाचून दाखवता दाखवता माझा अभ्यास आपोआप होत असतो . 

          एका गोष्टीसाठी मात्र तिचा खास आग्रह असतो . काहीही खाण्यापूर्वी किंवा स्वयंपाकाच्या भांड्यांना हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुतले पाहिजेत , असे ती सांगते बाबांनासुद्धा ती तसेच सांगते . आजीने काहीही सांगितले की बाबा निमूटपणे ऐकतात . माझे मित्र घरी आले की आजी बेहद्द खूश होते . ती काहीतरी खाक करून त्यांना देतेच . 

      ऐंशीच्या घरातील माझी आजी अजूनही उत्साहात वावरते . ती कधी आजारी पडल्याचे मला तरी आठवत नाही . कधीतरी ती मला आपले पाय चेयायला सांगते , तेवढेच ही माझी आजी मला खूप खूप आवडते .

माझी आजी मराठी निबंध | Mazi Aaji Essay in Marathi

माझी आजी मराठी निबंध | Mazi Aaji Essay in Marathi
माझी आजी मराठी निबंध 

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post