प्रश्न . ' आठवणीतील हिवाळा ' या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा :
आठवणीतील हिवाळा निबंध
नागपूर म्हटले की थंडीच्या दिवसांत कडाक्याची थंडी ! आणि उन्हाळ्यात प्रचंड उकाडा ! या दोन्ही ऋतूंमध्ये हवामानाशी जुळवून घेताना आमची अगदी तारांबळ उडते .
या वर्षीचा हिवाळा माझ्यासाठी वेगळा अनुभव देणारा ठरला . नेहमीप्रमाणे आज सकाळी स्वेटर , कानटोपी , बूट - मोजे असा जामानिमा करून मी सकाळी शाळेत निघाले .
शाळेजवळ रस्त्याच्या कडेला काही मुला - मुलींच्या रडण्याचा आवाज ऐकू आला . दगडफोडीचे काम करणाऱ्या वस्तीवरची मुले थंडीने कुडकुडत होती आणि रडतही होती . खरे तर सगळी वस्ती गारठली होती . शाळेत गेल्यावर मुख्याध्यापकांना ही घटना सांगितली . त्यांनी मुलांना शाळेत आणायला सांगितले . भसे बाईच्याबरोबर आम्ही घटनास्थळी ( वस्तीवर ) गेलो .
त्या मुलांच्या आई - वडिलांना मुलांना शाळेत पाठवण्याबद्दल विनंती केली . मुलांना शाळेत पाठवले तर काम कोण करणार ? असे म्हणून मुलांना शाळेत पाठवायला नकार दिला . शेवटी खाऊ - कपडे देतो असे सांगितल्यावर मुलांना शाळेत पाठवले .
अस्ताव्यस्त केस , मळलेले व फाटके कपडे , थंडीमुळे फुटलेले गाल - ओठ , अंगाला येणारी दुर्गंधी अशा अवस्थेत त्या मुलांना शाळेत आणले . पुढे त्यांना अंघोळ , जेवण , कपडे , बूट - मोजे देण्यात आले .वस्तू घेताना ही मुले ओढून - खेचून घेत होती . त्यांतल्या एका मुलीने माझ्या अंगातील स्वेटर खेचला . मी थोडीशी घाबरले ! तिने स्वेटर अधिक घट्ट पकडला . नाही देणार स्वेटर ' ती मुलगी म्हणाली . " रातच्याला लई थंडी लागत्ये , म्या न्हाई देनार ! " बाईनी तिला एक स्वेटर दिला . तिचा चेहरा खुलला .
खरेच थंडीमुळे होणारा त्रास उबदार कपड्यांमुळे मी सहन करू शकत होते . पण गार वारा , बोचरी हाडे गोठवणारी बनापासून थंडी ही मुले कशी सहन करीत असतील ?
बाईंनी सर्व मुलांना देणगीदारांमार्फत स्वेटर दिले . सर्व मुले आनंदाने शाळेत बसली . ज्या थंडीत आम्ही पर्यटनाला जातो , गरमागरम खादयपदार्थांवर ताव मारतो ; तीच थंडी या उघड्यावरील लोकांना मात्र कशी वाटत असेल , असे मला वाटते
आठवणीतील हिवाळा निबंध [ प्रसंगलेखन निबंध मराठी ]
Tags:
मराठी निबंध लेखन
Very nice
ReplyDeleteThanks
Deleteमला असा प्रसंग हवा होता थंडीचा सुखद अनुभव, प्राप्त झालेला अनुभव , हिवाळ्यातील वातावरण, अविस्मरणीय प्रसंग, परिणाम
ReplyDeleteHo nakki ami takalela ahe apala ya website var apan pahu shakatya
DeleteThanks
Mla khup avdhla ha nibhand
ReplyDeleteThanks
Delete