आठवणीतील हिवाळा निबंध मराठी [ प्रसंगलेखन ]

प्रश्न . ' आठवणीतील हिवाळा ' या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा :
  1.  घरातील सुरक्षित आठवण 
  2. रस्त्यावर राहणाऱ्यांची दैना 
  3. शाळाबाह्य मुलांना शाळेत आणणे 
  4. शाळाबाह्य मुलांची काळजी घेणे
  5. स्वतःवर झालेला परिणाम


आठवणीतील हिवाळा निबंध 


नागपूर म्हटले की थंडीच्या दिवसांत कडाक्याची थंडी ! आणि उन्हाळ्यात प्रचंड उकाडा ! या दोन्ही ऋतूंमध्ये हवामानाशी जुळवून घेताना आमची अगदी तारांबळ उडते . 
या वर्षीचा हिवाळा माझ्यासाठी वेगळा अनुभव देणारा ठरला . नेहमीप्रमाणे आज सकाळी स्वेटर , कानटोपी , बूट - मोजे असा जामानिमा करून मी सकाळी शाळेत निघाले . 
शाळेजवळ रस्त्याच्या कडेला काही मुला - मुलींच्या रडण्याचा आवाज ऐकू आला . दगडफोडीचे काम करणाऱ्या वस्तीवरची मुले थंडीने कुडकुडत होती आणि रडतही होती . खरे तर सगळी वस्ती गारठली होती . शाळेत गेल्यावर मुख्याध्यापकांना ही घटना सांगितली . त्यांनी मुलांना शाळेत आणायला सांगितले . भसे बाईच्याबरोबर आम्ही घटनास्थळी ( वस्तीवर ) गेलो .

 त्या मुलांच्या आई - वडिलांना मुलांना शाळेत पाठवण्याबद्दल विनंती केली . मुलांना शाळेत पाठवले तर काम कोण करणार ? असे म्हणून मुलांना शाळेत पाठवायला नकार दिला . शेवटी खाऊ - कपडे देतो असे सांगितल्यावर मुलांना शाळेत पाठवले . 

अस्ताव्यस्त केस , मळलेले व फाटके कपडे , थंडीमुळे फुटलेले गाल - ओठ , अंगाला येणारी दुर्गंधी अशा अवस्थेत त्या मुलांना शाळेत आणले . पुढे त्यांना अंघोळ , जेवण , कपडे , बूट - मोजे देण्यात आले .वस्तू घेताना ही मुले ओढून - खेचून घेत होती . त्यांतल्या एका मुलीने माझ्या अंगातील स्वेटर खेचला . मी थोडीशी घाबरले ! तिने स्वेटर अधिक घट्ट पकडला . नाही देणार स्वेटर ' ती मुलगी म्हणाली . " रातच्याला लई थंडी लागत्ये , म्या न्हाई देनार ! " बाईनी तिला एक स्वेटर दिला . तिचा चेहरा खुलला . 

खरेच थंडीमुळे होणारा त्रास उबदार कपड्यांमुळे मी सहन करू शकत होते . पण गार वारा , बोचरी हाडे गोठवणारी बनापासून थंडी ही मुले कशी सहन करीत असतील ? 
बाईंनी सर्व मुलांना देणगीदारांमार्फत स्वेटर दिले . सर्व मुले आनंदाने शाळेत बसली . ज्या थंडीत आम्ही पर्यटनाला जातो , गरमागरम खादयपदार्थांवर ताव मारतो ; तीच थंडी या उघड्यावरील लोकांना मात्र कशी वाटत असेल , असे मला वाटते

आठवणीतील हिवाळा निबंध [ प्रसंगलेखन निबंध मराठी ]


आपल्याला हा आठवणीतील हिवाळा हा निबंध कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व आपणास अजून कोणत्या प्रकारचा निबंध लागत आहे हेही सांगा म्हणजे आम्ही तुमच्यासाठी तो निबंध नक्की आणू अभ्यासाविषयी कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन लागत असेल तर कमेंट मध्ये कळवा धन्यवाद

6 Comments

Thanks for Comment

  1. मला असा प्रसंग हवा होता थंडीचा सुखद अनुभव, प्राप्त झालेला अनुभव , हिवाळ्यातील वातावरण, अविस्मरणीय प्रसंग, परिणाम

    ReplyDelete
    Replies
    1. Ho nakki ami takalela ahe apala ya website var apan pahu shakatya

      Thanks

      Delete
Previous Post Next Post