सीमेवरील जवानाचे मनोगत मराठी निबंध

सीमेवरील जवानाचे मनोगत मराठी निबंध

सीमेवरील जवानाचे मनोगत मराठी निबंध

       दहा महिने झाले , घर सोडल्याला . तेव्हासुद्धा घरी फक्त दोन दिवस होतो . पण इकडे सीमेवर अकस्मात गडबड झाली आणि मंजूर रजा रद्द झाली . तातडीचा हुकूम निघाला होता . डोळे पुसतच घरच्यांचा निरोप घेऊन मी घर सोडले आणि दोन दिवसांचा खडतर प्रवास करत , या सीमेवरील छावणीवर येऊन दाखल झालो . वाटेत जनतेने अत्यंत आपुलकीने वागवले . तेव्हा मनाला खूप दिलासा मिळाला . 

          तेव्हापासून आजपर्यंत मी या मोक्याच्या ठिकाणी पहारा देत उभा आहे . हे नाके भारताच्या उत्तर सीमेवर आहे . येथून दूरवर शत्रूची चौकी दिसते . तेथेही माझ्यासारखाच त्यांचा एक जवान तासन्तास खडा पहारा देत उभा आहे . डोळ्याला दुर्बीण लावून आम्हांला सतत जागरूकपणे पहारा करावा लागतो . शत्रूच्या गोटात थोडीशीही हालचाल दिसली , तरीही आम्हांला त्याची नोंद घ्यावी लागते . डोळ्यांत तेल घालून आपल्या भूप्रदेशाचे रक्षण करावे लागते . अशा वेळी मनात येते की का आलो मी या सीमेवर ? माझ्या गावात मी सुखी नव्हतो का ? 

          आजही मला गावातले ते दिवस आठवतात . खाऊनपिऊन सुखी होतो आम्ही . पण कुटुंब वाढले नि केवळ शेतीवर गुजराण होईना ! घराबाहेर पडणे आवश्यक झाले लहानपणापासून सैनिक होण्याचे स्वप्न मनात घोळत होते . गावातील बऱ्याच जणांनी सैनिक होऊन मोठी कामगिरी बजावली होती . आपणही आपल्या देशासाठी असाच पराक्रम करावा या हेतूने उत्साहाने सैन्यात भरती झालो . वर्ष - दीड वर्ष खूप खडतर शिक्षण घेऊन येथील कामगिरीवर रुजू झालो . 

              येथे सीमेवर मरणाची थंडी असते . अशा वेळी काही क्षण कामाचा कंटाळा येतो . पण लगेच कर्तव्याची आठवण येऊन पुन्हा कामाला लागतो . महिन्यातून एखाद दुसरे घरचे पत्र येते व घरची खुशाली कळते . परवा मकरसंक्रांतीला अनेकांनी तिळगूळ पाठवला . राखीपौर्णिमेला काही भगिनींनी राख्या पाठवल्या . दिवाळीचा फराळही आला . थंडी सुरू झाली तेव्हा अनेक माता , भगिनींनी स्वेटर - मफलर विणून पाठवले . तेव्हाच समाधान वाटले की , आपण एकटे नाही . आपल्यामागे आपला देश आहे . आता आम्ही आमच्या घरापासून दूर आहोत ; पण त्याची चिंता वाटत नाही . माझा देश माझ्या घरादाराची , माझ्या मुलामाणसांची काळजी घेईलच ! आणि मी माझ्या देशाच्या सीमेची काळजी घेईनच ! 

सीमेवरील जवानाचे मनोगत मराठी निबंध

सीमेवरील जवानाचे मनोगत मराठी निबंध


Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post