रम्‍य पहाट मराठी निबंध | Ek Ramya Pahat Marathi Nibandh

  रम्‍य पहाट मराठी निबंध | Ek Ramya Pahat Marathi Nibandh

रम्‍य पहाट मराठी निबंध - Ek Ramya Pahat Marathi Nibandh

 रम्‍य पहाट मराठी निबंध | Ek Ramya Pahat Marathi Nibandh

निबंध - 1 
हाटेची वेळच अतिशय प्रसन्न , मनाला मोहवणारी , रोमारोमांत चैतन्य फुलवणारी असते . विशेषत : पावसाळ्यानंतरच्या काळातील पहाट तर अधिकच चैतन्यमय , प्रसन्न असते ; कारण त्यात ग्रीष्मातील दाहकता नसते . त्याचप्रमाणे वर्षाऋतूतील पावसाची रिपरिपही नसते . पाऊस संपल्यामुळे या वेळी आकाश निरभ्र होते . पहाट होऊ लागताच काळोखाचा पडदा विरविरीत होत जातो आणि अस्पष्ट गोष्टी हळूहळू दृष्टिगोचर होऊ लागतात . तेव्हा जाणवते ती आकाशातील पांढऱ्या ढगांची गडबड . 

एकमेकांना ढकलत प्रत्येक ढग पुढे येण्याचा प्रयत्न करीत असतो . स्वच्छ निळे आकाश व त्या पार्श्वभूमीवर पांढरे ढग ही रंगसंगती खरोखरच आल्हाददायक असते . हे दृश्य पाहत राहावे , असे वाटते . वाऱ्याची मंद , शीतल झुळूक आपल्याला अलगद स्पर्श करू लागते . त्या लहरींनी मन सुखावते . ही पहाटेची प्रसन्न , शांत वेळ खरेच खूप प्रेरणादायक असावी . म्हणूनच तर आपल्या पूर्वजांना वेद स्फुरले ते अशा सकाळच्या वेळी ! गेल्या वर्षी आम्ही या काळात गावी गेलो होतो . पावसाळा नुकताच संपलेला होता . 

आईबाबा आणि मी सकाळी सकाळीच फिरायला निघालो . त्या वेळचे ते दृश्य अजूनही माझ्या डोळ्यांसमोर आहे . संपूर्ण डोंगरावर मखमली हिरवळ पसरली होती . अवघी वनश्रीच हिरव्या रंगाने नटलेली होती . लहानमोठे धबधबे उंच कड्यांवरून उड्या मारत खाली धावत होते . संपूर्ण हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर पांढरेशुभ्र धबधबे आल्हाददायक वाटत होते

नया शांतपणे वाहत होत्या . त्यांच्या नितळ पाण्यात काठावरील झाडाझुडपांचे सुंदर प्रतिबिंब पडले होते . आकाशात पक्ष्यांची लगबग नुकतीच सुरू होत होती . या दृश्याने मन प्रसन्न झाले होते . प्रसन्न मनानेच आम्ही घरी परतलो . असा हा पहाटेचा अनुभव पुन्हा पुन्हा घ्यावा , असे मला सारखे वाटते .

 रम्‍य पहाट मराठी निबंध - Ek Ramya Pahat Marathi Nibandh

पहाटेची भ्रमंती किंवा एक प्रसन्न पहाट मराठी निबंध

रम्‍य पहाट मराठी निबंध

 रम्‍य पहाट मराठी निबंध | Ek Ramya Pahat Marathi Nibandh

निबंध - 2
        मी यंदाच्या सुट्टीत माझा वर्गमित्र अमित याच्या गावी जायचे ठरवले. अमितच्या गावी येऊन पोहोचलो, तेव्हा बरीच रात्र झाली होती. दिवसभर कष्टाची कामे करून गाव शांत झोपले होते. अमितच्या घरात माझे मोठ्या प्रेमाने स्वागत झाले. रुचकर भोजन घेतल्यावर निद्रादेवीने माझ्या अंगावर आपले पांघरूण केव्हा घातले, ते मला कळलेच नाही. मला जाग आली, तेव्हा सभोवार अंधार होता. पहाट झालेली नव्हती. अमितच्या घरातील मंडळी मात्र जागी झालेली होती. त्या सर्वांची नित्याची कामे शांतपणे चालू होती. मी अमितला विचारले, बाहेर एक फेरी मारू या का?" अमितने लगेच होकार दिला. मग पहाटेची भ्रमंती करण्यासाठी मी आणि अमित घराबाहेर पडलो.
 
       सूर्योदय झालेला नव्हता. दिशा नुकत्याच उजळत होत्या. सारा गाव हळूहळू जागा होत होता. घरोघरी अंगणात सडा-सारवण, झाडलोट ही कामे चालू होती. वातावरण शांत व प्रसन्न होते. मी आणि अमित मूकपणे चालत होतो. शहरात कधी अनुभवायला न मिळणारी नीरव शांतताव प्रसन्नता माझ्या मनाला सुखावत होती. आम्ही टेकडीवर पोहोचलो. अंधुक अंधुक दिसू लागले. आकाशातील तारे हळूहळू विझू लागले. एखादाच तारा आपले तेजस्वी अस्तित्व दाखवत होता; पण मावळतीचे वेध त्यालाही लागले होत

       पूर्वेकडचे आकाश आता केशरी, गुलाबी, पिवळ्या अशा विविध रंगांच्या छटांनी उजळून निघाले होते. एखादया विदूषकाने क्षणाक्षणाला रंगीबेरंगी कपडे बदलावेत तसाच हा प्रकार दिसत होता. त्या क्षणी बालकवींची ओळ मनात जागी झाली'कुणी उधळिली मूठ नभी ही लाल गुलालाची!' पाहता पाहता क्षितिजाची कडा सोनेरी होऊ लागली. पक्ष्यांच्या किलबिलाटाने झाडांना जाग आली. अरुणोदय होत होता. पूर्वेकडील क्षितिज तेजोमय झाले. मनात आले, ही रम्य, प्रसन्न पहाट जो अनुभवतो, त्याचे अंत:करणही तसेच विशाल होते. म्हणून तर खेडेगावांतून अजूनही मानवतेचे दर्शन घडते ! त्या प्रसन्न वातावरणात काही काळ रेंगाळून आम्ही परत फिरलो.

     परतीच्या वाटेवर घरांच्या छोट्या अंगणात तुळशी वृंदावनां पुढे रांगोळ्यांची शोभा दिसली. रानाकडे निघालेल्या गुरांच्या गळ्यांतील घंटा किणकिणत होत्या. दूरवरून देवळांतील सनईचे मंजूळ सूर कानांवर पडत होते. सारे गाव आता कामाला लागले होते. पण शहरातील धांदल त्यात दिसत नव्हती. सगळीकडे 'प्रसन्नता' भरून राहिली होती. शाहीर होनाजीची 'अमर भूपाळी' जणू साकार झाली होती. पहाटेच्या या आगळ्यावेगळ्या भ्रमंतीने आपण समृद्ध झालो आहोत, असे मला वाटले.

रम्‍य पहाट मराठी निबंध - एक प्रसन्न पहाट  मराठी निबंध

1 Comments

Thanks for Comment

Previous Post Next Post