मी पाहिलेला सूर्यास्त - Mi Pahilela Suryast eassy
मी पाहिलेला सूर्यास्त - Mi Pahilela Suryast eassy मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये मी पाहिलेला सूर्यास्त मराठी निबंध या विषयावर लेखन करणार आहोत आणि अत्यंत उत्कृष्ट असा निबंध लिहिणार आहोत आपल्याला आम्ही लिहिलेले निबंध कसे वाटतात हे तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की कळवा चला तर पाहूया मी पाहिलेला सूर्यास्त मराठी निबंध आणि या निबंधाचे लेखन सुद्धा करू या
नुकतीच माझी वार्षिक परीक्षा संपली होती . मी घरीच होते . उन्हाळ्याचे दिवस असल्याने दुपारभर सूर्याने होरपळून काढले होते . घरातून बाहेर डोकावणेही नकोसे वाटत होते . कधी एकदा संध्याकाळ होते , असे मला झाले होते . संध्याकाळ होताच मी आमच्या घराच्या गॅलरीत येऊन उभी राहिले . शांतपणे वाहणारे गार वारे मनाला सुखवू लागले . इतक्यात सहजच माझे लक्ष मावळणाऱ्या सूर्याकडे गेले . त्याचे ते सौम्य , लोभसवाणे रूप पाहून मी विस्मितच झाले , त्याच्या रूपात आता ती दुपारची दाहकता नव्हती . उलट किंचित कोवळीक होती .
हरखून जाऊन मी त्याला न्याहळतच राहिले . सूर्य झपाझप क्षितिजाकडे सरकत होता . त्याचे बिंब आता मोठे दिसत होते . पूर्ण बिंबच नारिंगी सोनेरी बनले होते . पश्चिम दिशा सोनेरी प्रकाशाने झळाळून गेली होती . झाडांची पाने , घरांची छपरे , डोंगराचे शिखर यांना सोनेरी झळाळी प्राप्त झाली होती . पाहता पाहता ते सूर्यबिंब क्षितिजाला टेकले . वेगाने क्षितिजाखाली जाऊ लागले आणि शेवटी केवळ एक सोनेरी बिंदू क्षितिजावर उरला . भोवतालच्या सोनेरी तेजाचा तो जणू केंद्रबिंदू होता .
मग एका क्षणी तो सोनेरी बिंदूही लुप्त झाला . हळूहळू अंधाराचे साम्राज्य पसरू लागले . मी कितीतरी वेळ त्या दृश्याकडे एकटक पाहतच राहिले ! अकस्मात मला आमच्या गॅलरीतून दिसलेला पावसाळ्यातील सूर्यास्त आठवला . आकाश ढगांनी व्यापले होते . सूर्य क्षितिजाकडे पोहोचू लागला , तसतसा नारिंगी - सोनेरी रंग सर्वत्र पसरू लागला . पण नंतर मात्र आभाळभर पसरलेल्या ढगांनी विविध रंग धारण करायला सुरुवात केली . पश्चिम दिशा तर अनेक रंगांनी सजली . हळूहळू सूर्य अस्ताला गेला ; पण पश्चिमेने मात्र तो रंगीन साज लगेच उतरवला नव्हता . कितीतरी वेळ ते अनेक रंग आभाळात तरंगत होते .
आजच्या दृश्यामुळे मी पावसाळ्याच्या आठवणीत हरवून गेले . मग मनात येऊ लागले की , सुमद्रकिनाऱ्यावरील सूर्यास्त कसा असेल ? डोंगरावर सूर्य कसा मावळत असेल ? वाळवंटात मावळणारे सूर्यबिंब असेच लोभसवाणे दिसत असेल ? ही ठिकाणे मी अजून पाहिलेली नाहीत . मोठी होईन तेव्हा अशी ठिकाणे पाहीनच . पण या ठिकाणी जेव्हा कधी जाईन , तेव्हा तेथील सूर्यास्त पाहायला मुळीच विसरणार नाही .
मराठी निबंध - 2
मी पाहिलेला सूर्यास्त मराठी निबंध - सूर्योदय निबंध मराठी
मी पाहिलेला सूर्यास्त मराठी निबंध
उन्हाळ्याचे दिवस होते आमची परीक्षा नुकतीच संपली होती मार्चमध्ये पेपर संपल्यानंतर आम्ही सर्वजण गावी आलो होतो सुट्ट्या चालू होत्या आणि अत्यंत भयंकर असा उन्हाळा सुद्धा होते दिवसभर आम्ही उन्हामध्ये जात नव्हतो आणि दिवसभर घाम आणि इतर पितर होत होतो सकाळी 9 चा पुढे आम्ही घराबाहेर पडत नव्हतो कारण बाहेर खूप ऊन असायचे म्हणून आम्ही सायंकाळ म्हणजे चार वाजायची वाट बघत असायचो .
एकदा की चार वाजले की ऊन कमी व्हायचं मंग आम्ही सर्वजण फिरायला आणि खेळायला जायचं खेळता-खेळता सहा-सात वाजायचे या वेळामध्ये आम्ही सर्वजण गावाकडील डोंगराकडे बघायचं कारण तिथून पाहिलेला तो सूर्य अत्यंत सुंदर दिसायचा आम्ही सर्वजण त्याच्याकडे बारकाईने बघत असायचे तो सूर्य हळूहळू डोंगराच्या आड लपायचं आम्ही दररोज हे दृश्य बघायचं तरी पण आमचे मन कधीच भरत नव्हती म्हणून सायंकाळ झाली की आम्ही डोंगराच्या कडेला जाऊन बसायचं खेळायचं आणि सूर्यास्त बघायचं .
तेव्हा मी असा विचार केला की डोंगरापासून मी सूर्यास्त बघितला किती सुंदर दिसतो तसेच समुद्रा मध्ये सूर्य कसा बनवत असेल वाळवंटामध्ये सूर्य कसा मावळत असेल तसेच शहरामध्ये सूर्यास्त कसा दिसत असेल हे सर्व प्रश्न मला पडले मग मी निश्चय केला की मोठे झाल्यानंतर हे सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी निघेल म्हणजेच हे सर्व सुर्यास्त बघायला आम्ही कॅमेरे मध्ये या सूर्यास्ताची सुंदरता जपून ठेवण्याचा प्रयत्न करेल .
हा निश्चय करत असताना तिथून एक म्हातारे बाबा आले त्यांनी आम्हाला सांगितलं की सूर्य कसा मावळतो आणि परत सकाळी सूर्य उगवतो तसंच आपणही झालं पाहिजे म्हणजे ते बोलले कि सूर्य कधी थकत नसतो तो दररोज उगवतो आणि मावळतो त्यांनी जर उगवण आणि मावळ बंद केलं तर पूर्ण सजीव सृष्टी नष्ट होईल तसेच आपणही आपल्या जीवनामध्ये दररोज काम केले पाहिजे आणि आनंदी राहिले पाहिजे असं ते बाबा आम्हाला बोलले आणि तिथून निघून गेले आम्ही सर्वांनी या गोष्टीचा विचार केला आणि सूर्यासारखा असा निर्णय केला आणि घरी परतलो .
मी पाहिलेला सूर्यास्त मराठी निबंध
मित्रांनो तुम्हाला मी पाहिलेला सूर्यास्त मराठी निबंध हि पोस्ट कशी वाटली आम्हाला नक्की कळवा निबंध आवडला असेल तर कमेंट मध्ये कमेंट करुन आम्हाला सांगा आणि इतर कोणत्याही प्रकारचे निबंध लागत असतील तर कमेंट करा आम्ही तुमच्यासाठी प्रत्येक प्रकारचे निबंध घेऊन येऊ धन्यवाद
Tags:
मराठी निबंध लेखन
thanks
ReplyDelete