एका ऐतिहासिक स्थळाला भेट मराठी निबंध | Me Pahilela Aitihasik Sthal Nibandh in Marathi

एका ऐतिहासिक स्थळाला भेट मराठी निबंध | Me Pahilela Aitihasik Sthal Nibandh

एका ऐतिहासिक स्थळाला भेट मराठी निबंध | Me Pahilela Aitihasik Sthal Nibandh in Marathi



    नाताळच्या सुट्टीत सहलीला जायचेच , हा आमच्या घरातील अलिखित नियम आहे यंदा आम्ही एकमताने विजयदुर्गाची सहल करण्याचे ठरवले . कारण २८ डिसेंबरला विजयदुर्ग आपला आठशेवा वाढदिवस साजरा करीत होता .

     सहल म्हणजे आनंदाचा पूर आणि आता तर जायचे होते एका प्राचीन दुर्गावर त्यामुळे आमच्या आनंदाला महापूर आला होता . मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर , खारेपाटण ओलांडले की , सिंधुदुर्ग जिल्हयातील ' तळेरे ' हे गाव आपले स्वागत करते . या गावापासून पन्नास किलोमीटर अंतरावर विजयदुर्ग किल्ला आहे . खारेपाटण गावापर्यंत आम्ही आमच्या गाडीने गेलो ; पण पुढचा वाघोटण खाडीतील प्रवास मात्र आम्हांला नावेतून करावा लागला . कारण ही खाडी समुद्राला जेथे मिळते , तेथेच विजयदुर्ग दिमाखात उभा आहे . 

    दुर्गाच्या परिसरात आम्हांला एक वृद्ध गृहस्थ भेटले . त्यांनी आम्हांला त्या दुर्गाची संपूर्ण हकिकत हकिकत सांगितली . आठशे वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्हयातील पन्हाळगडावरील शिलाहार राजा भोज याने हा किल्ला बांधला होता . नंतर वेळोवेळी या दुर्गाची सत्ता बदलत गेली . १६५३ मध्ये शिवछत्रपतींनी या किल्ल्यावर आपल्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली . हे सारे ऐकून आम्ही मोहरून गेलो . पु . ल . देशपांडे यांनी लिहिलेले ' कान्होजी आंग्रे ' हे पुस्तक मी वाचले होते ; तो सारा इतिहास माझ्या डोळ्यांसमोर राहिला . या आक्रमणे केली . पण कान्होजी आंग्रे वत्यांचा मुलगा यांनी मर्द मराठ्यांच्या साहाय्याने हा किल्ला अजिंक्यच ठेवला . हे आठवून मी त्यांना मनोमन मानाचा मुजरा केला . पण पुढे मात्र फंदफितुरीमुळे १७५६ मध्ये विजयदुर्गावर इंग्रजांची सत्ता आली .

     विजयदुर्ग हा सागरी किल्ल्यांतील वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आहे . या दुर्गाचे वीस बुरूज तर पश्चिमेला थेट समुद्रात उतरलेले आहेत आणि उरलेल्या तीनही बाजूंना तटबंदी आहे . इंग्रजांनी या किल्ल्याला ' ईस्टर्न जिब्राल्टर ' असे नाव ठेवले . मात्र दहा महिन्यांतच पेशव्यांनी ' विजयदुर्ग ' परत मिळवला . तो १८१८ पर्यंत स्वराज्यात होता . असा हा विजयदुर्ग शिवछत्रपतींच्या अफाट दूरदृष्टीचेच प्रतीक आहे .  या दुर्गाला आठशे वर्षे पूर्ण झाल्याचा सोहळा तेथे पाच सहा दिवस चालू होता . तेथील विविध कार्यक्रमांच्या धामधुमीत आम्ही सहभागी झालो व तृप्त मनाने घराकडे परतलो .

मराठी निबंध - 2

एका ऐतिहासिक स्थळाला भेट मराठी निबंध : वर्णनात्मक निबंधलेखन 

    उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या आम्ही सर्वजण फिरायला जाण्याचा निर्णय घेऊन  कुठे फिरण्यासाठी जायचं असं ठिकाण बघत होतो तर तेवढ्यात मला आठवले की शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये जो पराक्रम केला त्या पराक्रमाचा आपण आढावा घेतला पाहिजे म्हणून आम्ही सर्वांनी असे ठरवले की शिवाजी महाराजांच्या रायगड या किल्ल्याला सर्वांनी भेट द्यायची ठरल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सर्व आवडले जाण्याची सर्व तयारी केली सर्व सामान सोबत घेतले .

   सकाळी ठीक 5 वाजता घरून निघालो रायगडला जाण्याचा प्रवास आमच्या घरापासून साडेसातशे किलोमीटर इतका होता परंतु आम्ही सर्वजण खूप आनंदी होतो म्हणून हा प्रवास कधी संपला हे कोणाला समजलंच नाही रायगड  या  किल्ल्याखाली आम्ही संध्याकाळी पोहोचलो मंग असे ठरवले की संध्याकाळी आराम करून सकाळी सकाळी किल्ल्यावर चढायचं.

    सकाळी सर्वजण लवकर उठले आवरलं आणि किल्ल्यावर चढण्यासाठी निघाले किल्ल्यावर चढत असताना आम्ही सर्वांनी किल्ल्याची ठेवा किल्ला कसा बनवला किल्ल्याचा इतिहास हे सर्व जाणून घेण्यासाठी उत्सुक होतो त्यामुळे आम्ही एक गाईड ठेवला होता तो आम्हाला सर्व रायगडचा इतिहास सांगत होता तेव्हा आम्हाला समजले कि शिवाजी महाराज किती शूर वीर होते हे सर्व त्या रायगड किल्ल्या वरूनच आम्हाला समजत होते मी  रायगड किल्ल्यावरून पाहिलेले दृश्य कधीच विसरू शकत नाही आम्ही त्या किल्ल्यावर सकाळ पासून तर सायंकाळपर्यंत होतो सायंकाळी रायगड किल्ल्यावरून पाहिलेला सूर्यास्त हा अविस्मरणीय आहे.

 त्या दिवसापासून मला शिवाजी महाराजांविषयी खूपच कौतुक वाटू लागले त्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी मी रायगड शेजारील सर्व किल्ले फिरलो मला रायगड हा किल्ला खूपच आवडला आणि ही भेट माझ्यासाठी एक ऐतिहासिक भेट झाली म्हणून मी खूप आनंदी होतो.

एका ऐतिहासिक स्थळाला भेट मराठी निबंध : Me Pahilela Aitihasik Sthal Nibandh

मित्रांनो आज एक इतिहासिक स्थळाला भेट मराठी निबंध तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा  आज आपण  सिंधुदुर्ग या किल्ल्याची माहिती आणि इतिहास जाणून घेतला आहेत आपल्या दिलेल्या विषयाप्रमाणे आपण निबंध सुद्धा देखील लिहिलेला आहे तरीही तुम्हाला अजून कोणत्याही प्रकारचे असेच नवनवीन निबंध लागत असतील तर आम्हाला कमेंट मध्ये कळवा आम्ही तुमच्या साठी लवकरात लवकर ते निबंध संग्रह घेऊन येण्याचा प्रयत्न करू धन्यवाद

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post