गरिबाचे मनोगत मराठी निबंध

गरिबाचे मनोगत मराठी निबंध


              खरंच मला फार गंमत वाटते हं ! माझ्यासारख्या गरिबाला आपलं मनोगत व्यक्त करण्याची संधी तुम्ही आज दिलीत . नाहीतरी , या जगात माझ्यासारख्या गरिबाला विचारतं कोण ? माझी आजी म्हणायची ' पैशाकडे पैसा जातो ' , ते खरंच आहे ! मी गरीब आहे , याबद्दल मला खंत वाटते ; नाही असं नाही , पण त्याबद्दल मी माझ्या आईवडिलांना दोष देणार नाही . कारण ते प्रामाणिक होते . परिस्थितीशी झगडत ते जगले आणि स्वतः अपार कष्ट करून , प्रसंगी स्वतः उपाशी राहून त्यांनी माझं शिक्षण पूर्ण केलं .

               जागरूक राहून माहिती मिळवत राहिलं पाहिजे . पण मी हे काहीही केलं नाही . पदवी मी शिक्षण घेतलं . पदवीधर बनलो . पण परिस्थितीचा नीट विचार केला नाही . ' मला मोठ्या पगाराचीच नोकरी हवी ' असल्या मिजाशीत राहिलो . त्यामुळे मी आजवर बेकार राहिलो . आता विचार करतो , तेव्हा माझ्याच चुका माझ्या लक्षात येतात . आजकाल नुसत बारावी होणं किंवा नुसतं पदवीधर होणं काही उपयोगाचं नाही . सोबत आणखी कोणतं तरी कौशल्य मिळवायला हवं . आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचा विस्फोट होत आहे . या माहितीचा मागोवा घेऊन एखादया विषयात वाकबगार बनलं पाहिजे . 

            यासाठी मिळाली , या कैफातच राहिलो . त्यामुळे कुठे कुठे कोणकोणती संधी आहे , मला काय काय करता येईल , हे मला कळलंच नाही . साधी गोष्ट , माझं इंग्रजी भाषेचं ज्ञान वाढवण्यासाठी प्रयत्न केला नाही . आता याचा मला खूप पश्चात्ताप होतो . माझ्या बरोबरीचे केव्हाच माझ्या पुढे निघून गेले . मी मात्र बेकारच राहिलो . आज लक्षात येतं की , मी शाळा - महाविदयालयात शिकताना अभ्यासही जेमतेम करत होतो . त्यावेळी प्रामाणिकपणे आणि खूप कष्ट करून अभ्यास करायला हवा होता . टक्के टोणपे खाऊन आता मी शहाणा झालो आहे . चुका दुरुस्त करता येतात . मी आजूबाजूला पाहिलं . अपंग , लुळे पांगळे पाहिले .

                तेव्हा माझ्या लक्षात आले की , माझ्याकडे अजूनही खूप काही आहे . धडधाकट शरीर आहे . हातपाय , नाक , कान , डोळे सगळं चांगलं आहे . मग कुरकुर का करावी ? होय , मी चुका केल्या . पण मी कोणतंही पाप केलेलं नाही . त्यामुळे मी परिस्थितीवर मात करू शकतो , करणार आहे . मी आता सर्व प्रकारच्या कष्टांना सामोरा जाण्यास सिद्ध झालो आहे . मी माझ्या पायांवर उभा राहणार . माझ्या आईवडिलांना सुखी करणार .

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post