मी वृक्ष बोलतोय आत्मकथन निबंध मराठी

मी वृक्ष बोलतोय आत्मकथन निबंध मराठी 


 रे थांब जरा आषाढघना | Ray Thamb Zara Ashadhghana

            या , वाटसरूंनो या . या माझ्या सावलीत क्षणभर विसावा घ्या . तुम्हांला खूप काही सांगावं , असं माझ्या मनात येतंय . ऐकताय ना तुम्ही ? ऐका तर मग !

              तुम्हांला आता मी हा असा महावृक्ष दिसतोय . आज माझं वय शंभराच्या वर गेलेलं आहे . खरं तर जन्माच्या वेळी मी अगदी लहानसं रोपटं होतो . हळूहळू मोठा होत गेलो . काही समजूतदार व्यक्तींनी माझ्या खोडाभोवती छानसा पार बांधला . तुम्ही आता बसलाय ना तो पार ! येणारा - जाणारा वाटसरू त्यावर अगदी सहज क्षणभर तरी विसावतो . माझ्या सहवासात त्याच्या जिवाला थोडंतरी सुख मिळतं . येथे बायका - मुलं , त - हेत - हेचे लोक यांची सतत वर्दळ असते . मुलं उल्हासाने बागडतात . बायका आपापल्या सुखदुःखांची देवाणघेवाण करतात . 

           काही उत्साही माणसे तावातावाने वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात . कित्येक चळवळ्या माणसांनी आखलेल्या समाजसुधारणेच्या योजना मी ऐकल्या आहेत . माझ्या अंगाखांदयांवर बागडणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट मी ऐकतो आणि या एका जागी स्थिर राहूनही मला देशोदेशीच्या हकिकती कळतात . माणसांच्या कितीतरी पिढ्या मी पाहिल्या आहेत . त्यामुळे माणसांच्या सुखदु : खांचा मी साक्षीदार बनलो आहे .
 
             आम्हां वृक्षांना माणूस हा प्राणी खरोखरच खूप प्रिय आहे . त्यामुळे आम्ही माणसाला शक्य ती सर्व मदत करतो . आमचा संपूर्ण देह माणसाच्या पूर्ण उपयोगाला येतो . तहेतहेच्या चवदार फळांचा आस्वाद आम्ही माणसाला देतो . पानांचेही कितीतरी उपयोग आहेत . आमच्या फांदया - खोड यांचा सरपणासाठी , बांधकामासाठी , फर्निचर बनवण्यासाठी , कागद तयार करण्यासाठी उपयोग करू देतो . आम्ही हवा शुद्ध ठेवतो . जमिनीतील पाण्याचे स्रोत धरून ठेवतो . त्यामुळे विहिरी , नदयानाले यांना पाण्याचा पुरवठा होतो . म्हणजे आम्ही पर्यावरणाचा समतोल राखतो . यात आमचा फायदा काय ? काहीच नाही ! आम्ही हे सारं तुमच्यासाठी करतो . तुम्ही माणसं मात्र कृतघ्न !

              तुम्हांला मदत करणाऱ्या माझ्यासारख्या मित्रांवरच कुन्हाडीचे घाव घालता . केवळ तात्कालिक फायदयासाठी , वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही माणसे बेसुमार जंगलतोड करता . खरं म्हणजे याचे पुढे होणारे गंभीर परिणाम तुमच्या लक्षातच येत नाहीत . आज ना उदया ते तुम्हांला , तुमच्या मुलाबाळांना भोगावे लागणार आहेत . आताच अनेक ठिकाणी कधी कधी भीषण दुष्काळ पडतो , शेकडो माणसे मृत्युमुखी पडतात . ही माणसाच्या कर्माचीच फळे आहेत . हे लक्षात घेतलं नाही , तर आमच्याबरोबरच सर्व जीवसृष्टी नष्ट होईल . तेव्हा , हे वाटसरूंनो , तुम्ही हे लोकांना समजावून सांगाल का ?

मी वृक्ष बोलतोय आत्मकथन निबंध मराठी 

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post