रुग्णालयाची कैफियत मराठी निबंध

रुग्णालयाची कैफियत मराठी निबंध 

रुग्णालयाची कैफियत मराठी निबंध

 रुग्णालयाची कैफियत मराठी निबंध

              मी एक सार्वजनिक रुग्णालय आहे . नगरपालिका माझी देखभाल करते . एका फार मोठ्या शास्त्रज्ञाचं नाव मला मिळालं आहे - ' डॉ . होमी भाभा रुग्णालय
 
          आजकाल सगळ्याच बाबतीत महागाई वाढली आहे . वैदयकीय सेवाही महागली *आहे . औषधांच्या किमती भरमसाट वाढत आहेत . ज्यांच्याकडे पैसा आहे , जे श्रीमंत आहेत ते सहजगत्या आरोग्याच्या सोयी मिळवतात . पण गरिबांचं काय ? त्यांच्याकडे खायला आणायला पैसा नाही ; तर मग औषधांसाठी कसा खर्च करणार ? गरिबांनी औषधोपचारांशिवाय मरून जायचं का ? या चिंतेतून माझा जन्म झाला . मी आज जिथे आहे , त्याच्या अवतीभवती गरीब श्रमिकांचीच दाट वस्ती आहे . आजारपणात त्यांची सेवाशुश्रूषा करण्यासाठीच माझा जन्म झाला आहे . माझ्या परीने मी ती सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहे . 

               माझ्या येथे नेहमीच रुग्णांची खूप गर्दी असते . पण जेव्हा एखादा अपघाताचा तातडीची सेवा आवश्यक असलेला रुग्ण येतो , तेव्हा अशा गर्दीतही त्याच्यावर त्वरित उपचार केले जातात . येथे येणाऱ्या रुग्णांच्या संख्येच्या मानाने येथील सेवकवर्ग कमी आहे . त्यामुळे त्यांची खूप धावपळ होते . माझ्याकडे दररोज शेकडोंनी रुग्ण येत असतात . काहीवर बायउपचार विभागात उपचार करून त्यांना घरी पाठवलं जातं . पण ज्यांच्यावर शल्यक्रिया आवश्यक असते किंवा ज्यांचा आजार बळावलेला असतो , त्यांना माझ्याकडे दाखल केलं जातं . 

              वेगवेगळ्या आजारांसाठी माझ्याकडे वेगवेगळे विभाग आहेत आणि प्रत्येक विभागासाठी तज्ज्ञ डॉक्टर नेमलेले आहेत , याचा मला अभिमान आहे . येथे येणाऱ्या रुग्णांकडेच माझी कैफियत म्हणजे तक्रार आहे . ते अनेक वेळा गैरसमजुतीमुळे माझी निंदानालस्ती करतात . त्यांना वाटते सेविकेने , डॉक्टरने सतत त्यांच्याकडे लक्ष दयावे . पण हे सर्वकाळ अशक्य आहे . येथे अनेक रुग्ण असतात . सर्वांकडेच त्यांना लक्ष दयावं लागतं . कित्येक वेळा ते येथील खाण्यापिण्याबाबत तक्रारी करतात . पण त्यांच्या लक्षात येत नाही की , आजारपणात साधाच आहार योग्य असतो . हे रुग्ण आणि त्यांचे आप्त अनेक वेळा रुग्णालयाची शिस्त मोडतात . वाटेल त्या वेळी भेटीला येणारे नातलग इतर रुग्णांना आणि काम करणाऱ्या सेवकांना त्रासदायक ठरतात . 

             रुग्णांचे हे आप्त रुग्णालयात स्वच्छता पाळत नाहीत . कुठेही कचरा टाकतात , धुंकतात , अशा वेळी येथील डॉक्टर , सेवक त्यांना कडक शब्दांत सुनावतात . मग ती मंडळी मला नावं ठेवतात . याउलट सर्वांनी येथील नियम पाळले तर मित्रांनो , अधिकच चांगलं होईल .

रुग्णालयाची कैफियत मराठी निबंध

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post