प्रश्न . ' महापुराचे थैमान ' या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा :
- नदीला पूर येणे .
- मुसळधार पाऊस ,
- विजांचा कडकडाट लोकांचे टेकडीवर स्थलांतर माणसे ,
- गुरे पाण्यात वाहत जाणे .
- शाळेचे नुकसान होणे .
- मनाला विषण्ण वाटणे .
महापुराचे थैमान [ प्रसंग लेखन निबंध मराठी ]
' अरे पळा , पळा ! गावात नदीचे पाणी शिरलेय ! नदीला पूर आलाय ! उठा , उठा , पळा , पळा ! " ही आरोळी ऐकली आणि आमच्या सगळ्यांच्या जिवाचा थरकाप उडाला . बाहेर येऊन पाहतो तो काय , जोरदार पाऊस कोसळत होता . नदीच्या पाण्याचा लोंढा गावाला गिळत आत शिरला होता . जो तो जिवाच्या आकांताने टेकडीवर पळत होता . आम्हीही तीच वाट घराबाहेर निघालो तोवर पाण्याचे लोंढे आमच्या घराला वेढत होते . त्यात मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट घरे , गुरे - ढोरे पाण्याच्या प्रवाहात वाहताना दिसू लागली . सगळीच स्थिती भयानक होती . त्यात वीज गेलेली . प्यायला तेवढ्यात आमची सखूमावशी पाण्यात ओढली गेली .
आईने टाहो फोडला ! थोड्याच वेळात झोपड्या , मातीची कच्ची पाणीच नव्हते . आसऱ्यासाठी कोरडी जागा नव्हती . सगळेजण दयनीय नजरेने इकडेतिकडे बघत होते . लागत नव्हता . वयोवृद्ध माणसे , रुग्ण आणि तान्ही बाळे यांचे आता कसे होणार ? सर्वांनाच काळजी लागून राहिली होती काही वेळाने शासनामार्फत अन्नाची पाकिटे , औषधे , पिण्याचे पाणी आणि ब्लँकेटचा पुरवठा झाला . थोडेसे हायसे वाटले मी माझ्या मित्र - मैत्रिणींसह स्वयंसेवक व्हायचे ठरवले . अन्न - पाणी वाटणे , औषधे देणे , इत्यादी कामे आम्ही मनापासून महापुराचे थैमान धावत - पळत आम्ही टेकडीवर पोहोचलो . देवळाचा आसरा घेतला . पण पावसाच्या माऱ्यापुढे कोणाचाच निभाव घरली . जरुरीपुरते सामान बरोबर घेतले .
सगळेच भयानक ! केली . दुसऱ्या दिवशी पूर ओसरला . नदीच्या किनाऱ्यावर दलदल झाली होती आणि प्रचंड प्रमाणात कचरा पसरला होता कुजलेल्या कचऱ्यात मेलेली जनावरेही होती . त्यांची दुर्गंधी सगळीकडे पसरली होती . जेमतेम शाळेत पोहोचलो पण तेथेही वाईट स्थिती होती . मुसळधार पावसामुळे शाळेतील वह्या - पुस्तकांचा लगदा झाला होता . ते सगळे पाहिल्यावर माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले . पुढे पूर ओसरला पण मातीत मिसळलेला भाजीपाला , नदीचा गाळ आणि गढूळ पाणी पाहून सगळेच विषण्ण झाले होते .
निबंध क्रमांक 2
महापुराचे थैमान निबंध लेखन । How To Write Mahapurache
महापुराचे थैमान मराठी निबंध
गायत्री नदी ही आमच्या गावाचे भूषण. किंबहुना गायत्रीच्या काठावरच आमचे गाव वसलेले आहे. गावाच्या बाबतीत कोणतीही गोष्ट सांगायची असली, तर ती गायत्रीच्या संदर्भात सांगितली जाते. गावातल्या प्रत्येकाचे गायत्रीवर खूप प्रेम ! अशी ही गायत्री कधी आपल्या जीवावर उठेल, असे गावकऱ्यांना वाटलेच नव्हते. पण ते अघटित घडले ! नदीला महापूर आला आणि दीड दिवस महापुराने गावात अगदी थैमान घातले !
त्या वर्षी सगळीकडे पावसाचे प्रमाण जरा जास्तच झाले होते. आमच्या गावातही पाऊस बराच काळ मुक्काम ठोकून होता. नुसताच रेंगाळला नव्हता तर तो चक्क कोसळत होता. जुनी जाणती माणसे म्हणत होती - असा पाऊस कधीच पडला नाही ! दरवर्षी पावसाळ्यात गायत्रीचे पाणी वाढू लागले की, गावातील गृहिणींना आनंद होतो. त्या कौतुकाने म्हणतात, 'चला, आपली 'गाय' माहेराला आली आहे. तिची ओटी भरू या. तिचे कोडकौतुक करू या. मग सगळ्या स्त्रिया नदीच्या घाटावर जमून तिची ओटी भरतात. तिला खण नारळ अर्पण करतात. यंदापण गावातील सर्व महिला नदीच्या काठावर जमल्या; पण यंदाचे तिचे स्वरूप मात्र वेगळेच होते. नेहमीची सोज्ज्वळ, शांत गायत्री नव्हती. तर तिने रौद्ररूप धारण केले होते ! 'हे काही तरी वेगळेच लक्षण आहे बाई !'
कसेबसे ओटीभरण उरकले आणि सगळ्या महिला घराकडे वळल्या. पाऊस कोसळतच होता आणि सर्वांचे चित्त होते गायत्रीकडे. बातम्या येत होत्याच. गायत्रीचे पाणी वाढत होते. नदीकाठावरचे गणेशाचे देऊळ पूर्ण पाण्याखाली गेले. तेव्हा मात्र गावकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले ! पाऊस सतत पडतच होता आणि त्याचबरोबर नदीचे पाणी वाढत होते. मग लक्षात आले की, प्रक्षुब्ध झालेल्या नदीने गावाला सगळ्या बाजूने वेढले आहे. गावाचा बाहेरच्या जगाशी संपर्कच राहिला नव्हता. सगळेच गावकरी हवालदिल झाले होते. कशी शांत होणार ही नदी? मग अफवांचे पेव फुटले. खोलगट भागातील बैठी घरे, झोपडीवजा घरे पाण्याखाली गेली. कित्येकांची गुरे, कोंबड्या वगैरे पाण्यात वाहून गेले !
तासातासाला पाणी वाढतच होते. निम्मा गाव पाण्याखाली होता. कित्येक झाडे उन्मळून पडली. शेतात पाणीच पाणी झाले होते. घराघरातील सर्व माणसे आपला जीव वाचवण्याचा यत्न करीत होती. अशा संकटाच्या वेळी काही व्यक्तींच्या मनातील धाडस आपोआपच जागे होते. ते इतरांना साहाय्य करायला धावतात. गावाजवळच्या एका टेकडीवर गावातील बायकामुलांना पोहोचवले गेले. आता रस्ते हरवले होते. लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी काही हौशी लोकांनी होड्या आणल्या होत्या. गावात नुकत्याच आलेल्या नव्या जिल्हाधिकारी बाईंनी होडीतून गावात फेरफटका मारला व गावकऱ्यांना धीर दिला. पाऊस कोसळतच होता. आता पाण्याशिवाय काहीही दिसत नव्हते.
किती नुकसान झाले असावे, याचा अंदाज लोक बांधत होते, त्याचबरोबर देवाला आळवत होते. 'थांबव रे बाबा तुझा पाऊस !' बऱ्याच काळानंतर पाऊस थांबला ! पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले; पण भरपूर नुकसान करून आणि रोगराई पसरवून ! गावकरी अजूनही या महापुराच्या आठवणीने हवालदिल होतात आणि देवाला हात जोडून विनवणी करतात, 'देवा, हे असले महासंकट पुन्हा आणू नको रे बाबा !'
निबंध क्रमांक 3
महापुराचे थैमान [ निबंध मराठी ] - mahapurache thayman marathi nibhand
यंदाच्या वर्षी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे भंडारदरा धरण तसेच आसपासचे महाराष्ट्रातील सर्व धरण पूर्ण भरलेले आहेत आता धरणांमध्ये पाणी साठवण्याची जागा नाही त्या कारणाने नद्यांना पाणी सोडण्यात आले आणि महाराष्ट्रामध्ये पहिलाच धो धो पाऊस पडत आहे आणि अशावेळी नद्यांना पाणी सोडणं हा निर्णय महाराष्ट्राने घेतला मंग होणार काय होतं आमच्या गावाच्या मधून नदी गेली आहेत आणि त्या नदीला सोडलेल्या पाण्यामुळे ती नदी गच्च भरुन वाहत होती वाढलेल्या पावसाच्या प्रभावामुळे सगळीकडे पाणी पाणी झाले होते त्यामुळे आमच्या गावांमध्ये भयंकर असा पूर आला
महापुराचे संकेत आम्हाला आधीपासूनच मिळत होते आणि प्रत्यक्षात महापूर आल्यानंतर आम्ही सर्वजण खूप घाबरून गेलो आणि महापुराच्या या संकटाला सामोरे जाण्यासाठी तयार झालो गावामध्ये सरपंचांनी एक सभा घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याच प्रमाणे सर्व गावातील नागरिक या सभेसाठी उपस्थित झाले सरपंचांनी आम्हाला नीट समजावून सांगितले सर्वांना काम वाटून दिलेले महापूर आल्यानंतर काय काय करायचे हे सर्वांना आधीच सांगून ठेवलेले होते त्यामुळे महापूर आल्यानंतर आमच्या सर्वांची जास्त फजिती झाली नाही कारण सर्वांना आधीच माहीत होते काय करायचे आहे
गावांमध्ये पाणी हळू हळू चढू लागले तस-तसे नदीकडच्या भागातील सर्व लोकांनी त्यांची घरे मोकळी केली गावातील सर्व नागरिकांनी त्यांना मदत केली आणि गावाशेजारील डोंगरावर जाऊन आम्ही सर्व थांबलो हळूहळू करून सर्व गाव डोंगरावर आले वरून पाऊस तसा चालू होता आम्ही पावसामध्ये भिजत होतो आम्हाला खाण्यासाठी काहीच राहिलं नव्हतं पाणी सुद्धा पिण्यासाठी राहिलेलं नव्हतं अशा वेळ महाराष्ट्र सरकारने आम्हाला खूप मदत केली आम्हाला हेलिकॉप्टरचा मार्फत जेवणाचा पुरवठा केला तसेच भारतामधील सैन्यदल सुद्धा आमची मदत करण्यासाठी पोहोचलेले होते सगळीकडे नावा फिरत होते सर्व नागरिकांची मदत करत होते आम्हीदेखील सर्व मदत करण्यासाठी गावाकडे जात होतो आणि ज्यांना आमची मदत लागत होती त्यांची मदत करत होतो
आमच्या गावांमध्ये महापूर आला म्हणजेच आमच्या आसपासच्या सर्व गावांमध्ये हीच परिस्थिती होती आमचा पूर्ण जिल्हा महापुरा चा सामना करत होता हे सर्व पूर्ण देशभरात नव्हे तर पूर्ण जगामध्ये समजलेले होते यामध्ये न्यूज चैनल नेहमीची खूप मदत केली सोशल मीडिया आणि आम्हाला मदती साठी पैसे गोळा केले आम्हाला जेवणाची आणि राहण्याची सोय करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करत होते आजारी पडलेल्या लोकांना हेलिकॉप्टरच्या मार्फत उपचार करण्यासाठी नेत होते हे सर्व मी बघत होत
हळूहळू पावसाचा प्रभाव कमी झाला आणि नद्यांचे पाणी सुद्धा बंद केलं त्यानंतर गावांमधील पाणी सुद्धा हळूहळू कमी होऊ लागलं महापूर हळूहळू कमी होऊ लागला जमिनीवरचे पाणी जिरवा लागले आणि निघून जाऊ लागले तस तसे आमच्या मनाला चांगले वाटू लागले शेतकऱ्यांची सर्व शेती या महापुरामुळे खराब झाली तसेच सर्व घरांमध्ये पाणी घुसलेले होते म्हणून इलेक्ट्रॉनिक तसेच अनेक कागदपत्रे विविध अडचणींचा सामना आम्हाला सर्वांना करावा लागत होता हळू हळू सर्व नीट झाले आणि आम्ही सर्वांनी महापुरा चा सामना करून परत नवीन जोमाने सुरुवात केल
महापुराचे थैमान निबंध मराठी [ प्रसंगलेखन ] - mahapurache thayman marathi nibhand
Tags:
मराठी निबंध लेखन