prasang lekhan in marathi nibhand
प्रश्न . 'अकस्मात पडलेला पाऊस ' या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन प्रसंग लेखन करा- पावसापूर्वीचे वातावरण
- प्रत्यक्ष पावसाचा ,
- निसर्गाचा घेतलेला अनुभव तुमच्यावर झालेला परिणाम
- अविस्मरणीय अनुभव
अकस्मात पडलेला पाऊस
अकस्मात पडलेला पाऊस || Akasmat padlela paus marathi nibandh
या दिवशी भयंकर उकडत होते . सकाळी सहा वाजतासुद्धा अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या . जसजसा दिवस वर येऊ लागला , तसतसा उकाड्याने जीव हैराण होऊ लागला . पंख्याखाली उभे राहिले तरी केसांतून , हनुवटीखालून मानेवर घामाच्या धारा वाहत होत्या . जिवाची काहिली होत होती . बसून पाहिले . उभे राहून पाहिले . टीव्ही पाहायचा प्रयत्न केला . तरीही मन तगमगत राहिले . चैनच पडत नव्हती . तेवढ्यात , भर दुपार असतानाही अंधारून आले . आभाळभर काळेकुट्ट ढग जमा झाले . जोराचा गार गार वारा सुटला .
जमिनीवरील कागदकपटे , पालापाचोळा हवेत घुसळू लागले ... आणि काही क्षणांतच टपोऱ्या थेंबांचा ताडताड वर्षाव सुरू झाला . धुवाधार पाऊस कोसळू लागला . आभाळभर पाऊसच पाऊस होता . घराशेजारी , रस्त्यावर , शेतात , डोंगरात , दरीत सर्वत्र पाण्याचे लोटच्या लोट सुसाट धावू लागले . एखादया अवखळ दांडगट मुलाप्रमाणे पाऊस हुंदडत होता . आम्ही मुलेसुद्धा त्याच्या अवखळपणात सामील झालो , मनसोक्त नाचू लागलो . खरे सांगू का ? पाऊस आणि आम्ही एकत्रच नाचत होतो हा अनुभवच वेगळा होता . एरवी असा पाऊस आला की आम्ही पटापटा घरात घुसतो . दारेखिडक्या लावून घेतो . रस्त्यावर असलो तर रेनकोट घालतो . छत्र्या उघडतो . पावसाचा फारच जोर असला तर दुकानांचा , हॉटेलांचा आसरा घेतो .
आज मात्र वेगळेच घडत होते . पाऊस आणि आम्ही एकत्रच होतो . आम्ही पावसात शिरलो होतो की पाऊस आमच्यात शिरला होता , हे सांगणे कठीण होते . सर्व भोवताल पाऊसमय झाला होता . झाडे तर शेंड्यांपासून मुळांपर्यंत पाण्याने निथळत होती . मी मित्रमंडळींकडे पाहिले . सगळेजण झाडांप्रमाणेच निथळत होते . कानांवरून , नाकाच्या शेंड्यांवरून , हनुवटीवरून पावसाचे थेंब सरसर उतरत होते . ते दृश्य मनाला आनंद देत होते . पावसाच्या त्या शीतलस्पर्शाने जीव सुखावला होता . मन निवांत झाले होते . आता थोड्या वेळापूर्वी मनाची अवस्था काय झाली होती ? आणि आता पाहा . पावसाने केवढा कायापालट केला होता ! ही किमया फक्त पाऊसच करू शकतो . पाऊस हा ईश्वराचाच अवतार आहे . नाहीतर , मनाच्या आत आत खोलवर स्पर्श करण्याची ताकद आणखी कोणात आहे ?
akasmat padlela paus marathi nibandh
आपल्याला अकस्मात पडलेला पाऊस हा निबंध कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कोणते निबंध लागत असतील तर कमेंट मध्ये सांगा आणि निश्चित पणे तुमच्यासाठी निबंध घेऊन येऊया व तुम्हाला कळवा धन्यवाद .
अकस्मात पडलेला पाऊस [ प्रसंग लेखन निबंध मराठी ]
अकस्मात पडलेला पाऊस ( akasmat padlela paus marathi nibandh )
त्या दिवशी खूप भयंकर ऊन पडत होते उन्हाळ्या मधील मे महिन्यात हा प्रसंग घडला उन्हाळ्यामध्ये ऊन सर्वांनाच माहित आहे कसं असतं या उन्हा मध्ये मी पावसाळ्याचा आनंद घेतला आहेत एके दिवशी काय झालं आम्ही सकाळी सर्वजण नेहमीप्रमाणे शाळेत गेलो होतो शाळेतून घरी येत असताना खूप ऊन असल्यामुळे आम्ही गोळा खाण्यासाठी गाडी वर थांबलो इतके भयंकर होते की रस्त्यावरून गरम वाफा निघत होते असे आम्हाला वाटायचे मंग आम्ही गोळा खाल्यानंतर घराकडे निघालो घराकडे येत असताना अचानक हवेचा प्रभाव वाढला रस्त्यावरील झाडांचे पान पाचोळा तसेच कागद प्लॅस्टिकच्या पिशव्या उडू लागल्या सर्वजण हे वातावरण बघत होते.
असे हे अचानक बदललेले वातावरण बघून सर्वांना आश्चर्य वाटत होता तसेच हवामान खात्यातील तज्ञांनी पावसाचा अंदाज आधीच सांगितलेला होता परंतु खडकुना मध्ये अशा प्रकारचा पाऊस होईल हे कोणालाच वाटले नव्हते अचानक वार सुटल्यान ढगे आकाशामध्ये गडगडाट होऊ लागला विजा चमकू लागल्या आम्ही सर्वजण हे दृश्य पाहून घाबरलो तितकाच आनंद ही झाला अचानक आलेल्या पावसामुळे मातीतील सुगंध आम्हाला खूप चांगला वाटला पाऊस पडत असताना सर्व रस्ते आसपासचे वातावरण सर्व गार झाले होते आम्हाला असं वाटत होतं की लगेच त्या पावसामध्ये जाऊन मजा करावी.
पाऊस आल्यानंतर पाऊस थोडा वेळ थांबला आणि आम्ही लवकर घरी आलो घरी आल्यानंतर पावसाने परत हजेरी लावली तर तो पाऊस एक दिवस पूर्ण थांबलाच नाही या एक दिवसांमध्ये आम्ही खाली जाऊन पावसा मध्ये खूप मज्जा केली पावसामध्ये खेळून तसेच फोटो काढली व्हिडिओ काढले आणि पावसाचा आनंद घेतला असा हा उन्हाळ्यामध्ये आलेला अकस्मात पाऊस मला असा पाऊस खूपच आवडतो कारण याने सर्व वातावरण थंड आणि निर्मळ झालेले होते.
अकस्मात पडलेला पाऊस [ प्रसंग लेखन निबंध मराठी ]
मित्रांनो तुम्हाला अकस्मात पडलेला पाऊस हा निबंध कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आम्ही तुमच्यासाठी हे दोन निबंध दिलेले आहेत या निबंध नीट वाचा आणि परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवा धन्यवाद
Tags:
मराठी निबंध लेखन
nice thanks sir
ReplyDeleteMala khup changale vatale apalala ya nibhanfa mul study sathi help keli ya badal
DeleteBatmilekhan -shalecha shtabdi varsha sangta samarambha manniy shikshanmantri yanchya upasthitit sampanna zala plzzz write
ReplyDeleteAmi tumacha sathi varil vishayavar batamilekhan karat alot tumala he ajj 7 vajata milel ami tumala yachi link deyu tumi tya var jaun tumala laghat asalela vishayache batamilekhan pahu shakatya thanks
Deletehttps://www.nirmalacademy.com/2021/03/marathi-batami-lekhan-namuna.html
Deleteya link var jaun tumala laghat asalela vishayache ami batami lekhan kele ahe apan baghu shakatya
nice post
ReplyDeleteThanks '
DeleteThanks sir for nibanda
ReplyDeleteGood
DeleteNice
ReplyDeleteThanks
Deletewell
ReplyDeleteThanks
Deleteplease mala konta hi ek kalpanatmak nibandh lihun dya....
ReplyDeleteHo ami amacha website var takale ahe tumi pahu shakata
DeleteMe pahelelya apghat ha prasang lekhan
ReplyDeletemi pahilela apghat marath nibhand nirmal academy as apan google var taka tumala amachi website disal tithun gha kiva https://www.nirmalacademy.com/2021/10/mi-pahilela-apghat-marath-nibhand-Nirmal-Academy.html link varun ja
DeleteThanks
Nice thanks sir
ReplyDeleteThanks
Deletethanks
ReplyDeleteThanks
DeleteKhup chan aahe
ReplyDeleteThanks
ReplyDeleteNic
ReplyDeleteThank You for your support
Delete