प्रश्न . ' माझे बालपण ' या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा : माझे बालपण
माझे बालपण [ प्रसंग लेखन निबंध मराठी ]
माझे बालपण आसपासची लहान मुले आणि त्यांचे खेळ पाहिले की , माझ्या बालपणच्या आठवणी जाग्या होतात . त्या आठवणींमध्ये काही काळ तरी मी हरवून जातो . मला माझे सगळे बालपण नक्कीच आठवत नाही . पण आठवतात त्या थोड्या आठवणीसुद्धा मला काही काळ सुखावतात . कितीतरी आठवणींनी माझे बालपण सजले आहे . एकदा आमच्या विहिरीतला गाळ काढण्याचे काम चालू होते . माझे बाबासुद्धा विहिरीत उतरले होते . मी काकुळतीला येऊन मलाही विहिरीत उतरवायला सांगत होतो .
मग बाबांना अचानक काहीतरी सुचले . त्यांनी माझ्या एका काकांना सांगितले , " रहाटाला बादली बांध . तिच्यात त्याला वसव आणि खाली सोड . मग मी एखादया सम्राटासारखा विहिरीत उतरलो होतो ! त्या वेळच्या माझ्या मित्रांच्या आरोळ्या अजूनही मला आठवतात .
एकदा झाडावर चढलो . थोड्या अंतरावर गेलो . पण उतरता येईना म्हणून भीतीने थरथरत मोठमोठ्याने रडलो . मित्रांनी केवढी थट्टा केली ! नदीत उतरल्यावर मासे गुदगुल्या करतात म्हणून नदीतून एकदा पळालो होतो . माझ्या हातातले घावणे माकडांनी एकदा पळवले . म्हणून मी कित्येक दिवस माकडांच्या टेकडीकडे फिरकलो नाही . दुधावरच्या सायीचा आनंद तर अवर्णनीय आहे . हा आनंद मला माझ्या बालपणाने दिला आहे .
त्या काळात मी रोज सकाळी वाड्याकडे धाव घेत असे आणि आजोबांनी माझ्यासाठी खास राखून ठेवलेल्या पेलाभर सायीचा आस्वाद घेत असे . आजोबा गुरांच्या रक्षणासाठी रात्री वाड्यावर झोपायला जात . सकाळी मी साय मटकावली की , आम्ही दोघे आनंदाने घरी परतत असू . माझे बालपण म्हणजे आठवणींचा ताजमहाल आहे !
मराठी निबंध - 2
आत्ताच्या लहान मुलांना मोबाईल मध्ये गेम खेळताना पाहिलं की मला माझ्या बालपणाची आठवण येते माझे बालपण या आत्ताच्या नवीन मुलांच्या बालपण अपेक्षा खूप वेगळे होते असे वाटते कारण आताची मुलं दिवसभर मोबाईल मध्ये गेम खेळत असतात मोबाईल मध्ये पिक्चर बघत असतात तसेच त्यांना मैदानी खेळ म्हणजे काय हे माहीतच नाही असे वाटते माझे बालपण या सर्व मुलांपेक्षा खुपच वेगळे होते बरं
मी लहान होतो तेव्हा माझ्या मित्रांसोबत खूप खेळायचो मोबाइल म्हणजे काय हे आम्हाला माहीतच नव्हतं त्या कारणाने आम्ही मैदानी खेळ खूप खेळायचो आम्ही लहानपणी लपाछपी खोखो कबड्डी विटी दांडू सुरपारंब्या आट्यापाट्या असे अनेक खेळ खेळायचो लहानपणीची शाळा आठवली की त्याच आठवणीमध्ये रमन होऊ सर्व गोष्टी आठवतात अभ्यास झाला नसला तर शिक्षकाला सांगायचे कारण डबा नसला तर मित्राच्या डब्यातून जेवण करायची वेगळीच मज्जा जेवायची वेळ झाली की क्रिकेटची बॅट आणि बॉल घेऊन मैदानावर जाऊन खेळायचं हे सर्व मला चांगल्या प्रकारे आठवतो
मित्रांसोबत बालपण कसे गेले हे मला समजलेच नाही आणि शाळेतला पहिला दिवस हे ही मला खूप चांगल्या प्रकारे आठवतो पहिल्या दिवशी मी शाळेत जाण्यास नकार देत होतो रडत होतो परंतु त्यानंतरही मला शाळेत बसवलं आणि शाळेत बनलेल्या मित्रांसोबत खूप मजा तसेच अभ्यासही केला मोठा झाल्यावर असं वाटतं बालपण किती सुंदर आणि आनंदी होतं तसेच लहान होतो तेव्हा असं वाटायचं कधी एकदाचं मोठं होईल आणि कधी मला लागते त्या गोष्टी मिळवला लहान पण खूप सुंदर असतं असं मला मोठं झाल्यावर समजलं
लहानपणी आपल्याला कोणी ओळखत नव्हतं काम सांगत नव्हतं शाळेतून आल्यानंतर तर खाली ठेवलं की ठेवलं की लगेच खेळायला निघायचो खेळून खेळून थकलो की घरी यायचं जेवण करायचं थोडा वेळ गप्प बसायचं आणि झोपून घ्यायचं सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा आणि शाळेत जाऊन मित्रांसोबत मज्जा करायची लहान असल्यामुळे सर्व काकाची हट्ट पूर्ण व्हायचे लागेल ती गाडी लागेल ती खेळणी खेळायला लहानपण हळूहळू मोठ्या प्रमाणात बदलू लागले तसतसा आनंद कमी कमी होऊ लागला पाचवीनंतर लहानपण कमी झालं आणि दहावीपर्यंत अभ्यासाच्या दबावामुळे खेळायला टाईमच मिळत नव्हता असे माझे बालपण संपले परंतु मी माझे बालपण खूप आनंदी आणि मी मजेत जगलो आहे
मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली माझे बालपण या विषयावर आम्ही तुमच्या साठी दोन निबंध लिहिलेले आहेत येत्या काळामध्ये अजूनही माझे बालपण मराठी निबंध ह्य विषयावर तुमच्यासाठी आम्ही अजून काही नमुने घेऊन येऊन तुम्हाला मराठीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आली तर आम्हाला कमेंट मध्ये कळवा आम्ही तुमच्यासाठी कायम कार्यरत आहोत धन्यवाद
माझे बालपण मराठी निबंध - maze balpan marathi nibhand
Tags:
मराठी निबंध लेखन
Tyani hou so much....
ReplyDelete