वारकरी संप्रदाय निबंध मराठी
आमच्या शेजारी नारायणकाका नावाचे एक गृहस्थ राहतात . आमच्या समस्या शेजाऱ्यांमध्ये ते माझ्या चांगले लक्षात राहिले आहेत . ते लक्षात राहण्यामागे कारणही तसेच आहे . मी रोज सकाळी शाळेत जाण्यासाठी उठतो त्याच वेळी शेजारच्या घरात नारायणकाकांचा वावर सुरू झालेला असतो . रोजच्या निरीक्षणामुळे नारायणकाकांविषयी माझ्या मनात नितांत आदर व जिव्हाळा निर्माण झाला आहे .
नारायणकाका सकाळी सकाळीच उठतात . स्नान करतात आणि प्रथम विचठल रखुमाईची पूजा करतात . मग दारातील तुळशीची पूजा करतात . हे सर्व चालू असताना कुठला कुठला अभंग तन्मयतेने म्हणत असतात . त्यानंतर त्यांची न्याहरी होते . घरातील बारीकसारीक कामे केली की , ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी जायला निघतात . त्यांचा योशाख नेहमी अगदी साधा असतो . घरात असताना शुधा पायजमा व शुन शर्ट हा त्यांचा ठरलेला पोशाख ! कपाळाला उभे गंध कायम , गळ्यात तुळशीमाळ , घराबाहेर पडतात तेव्हा देखील त्यांचा पोशाख पांढराशुभ्रच असतो . त्यांच्याकडे पाहताक्षणीच त्यांचा साधेपणा व सात्विकपणा नजरेत भरतो .
नारायणकाकांच्या पोशाखाइतकाच त्यांचा स्वभावही निष्कपट , सरळसाधाच आहे . ते कधी कोणाशी भांडताना दिसत नाहीत . कोणाबद्दल अपशब्द उच्चारत नाहीत . जेव्हा पाहावे तेव्हा हसतखेळत गप्पा मारताना दिसतात ; पण कोणावद्दल वाईट बोलत नाहीत . लोकही त्यांच्याशी आदराने व आपुलकीने वागतात . मी एकदा वावांना नारायणकाकांच्या स्वभावाबद्दल विचारले , तेव्हा बाबांनी सांगितले की , ते पूर्वी तरुण असताना खूप तापट होते . त्यांना पटकन राग यायचा . छोट्याशा गोष्टीवरून भांडण करायला उठायचे , पण कालांतराने , विशेषतः जेव्हा ते वारकरी बनले , गळ्यात माळ घातली , तेव्हापासून त्यांचा स्वभाव पूर्णपणे बदलला . नारायणकाका आषाढी एकादशीला न चुकत्ता वारीला जातात . वारीहून परतले की त्यांच्या घरी मोठी पूजा असते . ते वारीहून आले की आमच्या आजूबाजूचे सर्वजण त्यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यायला जातात .
नारायणकाका विठ्ठल भक्त आहेत , पण त्यांना अंधश्रद्धेचा तिटकारा आहे . ते नेहमी सांगतात की , मनोभावे देवाचे नाव घेतले की आपली भक्तो देवाला पावते . त्यासाठी कोणतेही अवडंबर माजवण्याची गरजच नाही . असे हे आमचे नारायणकाका . त्यांच्याकडे पाहिले की निर्मळ , पवित्र वाटते .
वारकरी संप्रदाय निबंध
Tags:
मराठी निबंध लेखन