माझा आवडता ऋतू मराठी निबंध | Maza Avadata Rutu Hivala In Marathi

माझा आवडता ऋतू मराठी निबंध | Maza Avadata Rutu Hivala In Marathi


माझा आवडता ऋतू मराठी निबंध | Maza Avadata Rutu Hivala In Marathi

माझा आवडता ऋतू मराठी निबंध | Maza Avadata Rutu Hivala In Marathi

   आपल्या देशामध्ये वसंत , ग्रीष्म , वर्षा , शरद , हेमंत व शिशिर असे सहा ऋतूंचे चक्र सतत फिरत असते . सर्व ऋतूंमध्ये वर्षाऋतू , म्हणजेच पावसाळा मला अधिक आवडतो

     पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे . कारण तो हवाहवासा वाटत असतानाच येतो . डोक्यावर रणरणणारे ऊन , पायाखाली तव्यासारखी तापलेली जमीन आणि मानेवर , अंगावर चपचपणाऱ्या घामाच्या धारा यांनी जीव नकोसा झालेला असतो ; उकाड्याने माणसे हैराण झालेली असतात . सर्व सृष्टीच पावसासाठी जणू उसासे टाकत असते . सर्व पशुपक्षीदेखील थंडगार सावलीचा निवारा शोधत असतात आणि त्याच वेळी पाऊस येतो धो धो कोसळत . वातावरणातील उकाड्याचा सर्व ताप तो स्वतः शोषून घेतो . रोमारोमात गारवा शिरतो . चराचर सृष्टी तृप्त होते . असा हा जीवघेण्या उकाड्यापासून सोडवणूक करणारा पावसाळा कोणाला आवडणार नाही ? 

      जूनमध्ये शाळा सुरू होते . त्याच्या आसपास पावसाळा सुरू होतो . नवे वर्ष , नवा वर्ग , नवा गणवेश , नवी पुस्तके आणि नवी छत्री या साऱ्या नव्या नवलाईमुळे शाळेत जाताना मन उल्हासाने भरलेले असते . त्याच वेळी हा चैतन्यशाली दोस्त वाटेत भेटतो . त्याच्या सोबत नाचत बागडत मी शाळेत जातो . मित्रांच्या विविध रंगांच्या छत्र्या . तहेत - हेचे रेनकोट यांमुळे शाळेकडे जाणारी वाट रंगांनी फुलून जाते . वाटते की , जणू ती वाटच आपल्यासोबत उत्साहाने शाळेत येत आहे !

    हा पाऊस मोठा जादूगार आहे . तो रूक्ष , रखरखीत सृष्टीचे रूपच पालटून टाकतो . पाऊस पडून गेला की सर्वत्र मखमलीसारखी हिरवळ पसरते . वृक्षवेली हिरव्या रंगाच्या विविध छटांनी नटतात . शेते हिरव्यागार रोपांनी डोलू लागतात . खळाळणारे ओढे - नाले सगळीकडून धावत असतात . सर्व सृष्टी सचैल स्नान करून टवटवीत बनते

      या पावसाची रूपे तरी किती ? कधी तो थुई थुई नाचत येतो ; कधी रिमझिमत येतो . कधी तो धो धो कोसळतो ; तर कधी प्रचंड गडगडाट करीत , विजांचा चकचकाट करीत धुवाधार बरसतो . एखादया दिवशी प्रचंड , काळेभोर ढग आकाशात अवतरतात . भरदिवसा जणू रात्रच सुरू होते . पाऊस पडून गेला की , धुक्याने झाकोळलेल्या कातळावरून उड्या घेणारे लहान लहान धबधबे दिसू लागतात . पावसाची सर थांबते . अचानक उघडीप येते , तेव्हा सर्वत्र हिरवागार गालिचा पसरल्यासारखे वाटते . पाहावे तेथे मन वेडावून टाकणारी हिरवाई दिसते .

    पाण्याची , धान्याची बेगमी करतो . म्हणूनच मी म्हणतो की , वर्षाऋतू म्हणजे पावसाळा क्वचित सूर्याला पावसाची मौज लुटायची लहर येते . मग ढगांना बाजूला सारून तो नभांगणात उतरतो . त्याची सोनेरी किरणे पावसात चमचमू लागतात . आणि काय आश्चर्य ! आकाशात ते मनोहारी इंद्रधनुष्य तरळू लागते . आणि बालकवींच्या ओळी मनात अलगद उतरतात वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे ; मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणि भासे !  असा हा सुखदाता पावसाळा सर्व सृष्टीचा पोशिंदाही आहे . तो सर्व चराचरात चैतन्य निर्माण करतो . धरतीमातेला सुजला सुफला बनवतो . चार महिन्यांत हा पाऊस वर्षभराच्या हाच सर्व ऋतूंचा राजा आहे .

माझा आवडता ऋतू मराठी निबंध :[ वर्णनात्मक निबंधलेखन ]

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post