भरतवाक्य कविता 10वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो;
कलंक मतिचा झडो; विषय सर्वथा नावडो;
सदंघ्रिकमळीं दडो; मुरडितां हटानें अडो;
वियोग घडतां रडो; मन भवच्चरित्रीं जडो ।।

न निश्चय कधीं ढळो; कुजनविघ्नबाधा टळो;
न चित्त भजनीं चळो; मति सदुक्तमार्गीं वळो; ।
स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;
पुन्हां न मन हें मळो; दुरित आत्मबोधें जळो ।।

मुखीं हरि! वसो तुझी कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी सकलकामना मावली; ।
कृपा करिशि तूं जगत्रयनिवास दासावरी,
तशी प्रगट हे निजाश्रितजनां सदा सांवरी ।।
(केकावलि)

पंडित कवी. काव्य-नाटक-व्याकरण-अलंकारादी शिकून न्याय व वेदान्त यांचे अध्ययन. त्यांनी विपुल काव्यरचना केली आहे. २६८ काव्यकृती त्यांच्या नावावर आहेत. त्यांपैकी ‘आर्याभारत’, ‘केकावलि’, ‘मंत्रभागवत’, ‘मंत्ररामायण’, ‘श्रीकृष्णविजय’ व ‘हरिवंश’ या रचना प्रसिद्ध आहेत. त्यांनी संस्कृत काव्यरचनाही केली आहे. त्यांचे समग्र वाङ्मय ‘कवीवर्य मोरापंतांचे समग्र ग्रंथ : खंड १ ते १२’ यामध्ये संग्रहित करण्यात आले आहे. 

मोराेपंतांनी या रचनेत सज्जन माणसांच्या सहवासाचे व सद्‌विचारांच्या श्रवणाचे महत्त्व यांकडे लक्ष वेधले आहे. खोटा अभिमान बाळगू नये, भक्तिमार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला बळी पडू नये असे आवाहन केले आहे. सत्कर्मात व सज्जनांच्या सहवासात राहण्याची शिकवण या पद्य रचनेतून दिली आहे.

भरतवाक्य कविता 10वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

भरतवाक्य कविता 10वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
भरतवाक्य कविता 


कृ .३ . ' सुसंगतीचे महत्त्व ' या विषयावर थोडक्यात लिहा . 


उत्तरः मोरोपंतांच्या केकावलीतील ' सुसंगती सदा घडो ' ही ओळ सुभाषित म्हणून सुप्रसिद्ध आहे . या ओळीतून कविवर्य संगतीचे आपल्या आयुष्यातील स्थान व महत्त्व विशद करत आहेत . माणसाचे व्यक्तिमत्त्व हे त्याच्या संगतीवरून ठरते , असे म्हटले जाते . जगात , आपल्या मित्रमंडळीत , परिवारातील लोकांत वावरताना बऱ्यावाईट , गुणदोषांनी युक्त अशी अनेकविध माणसे आपल्याला भेटत असतात . 

हा सहवास ' सु ' म्हणजे उत्तम , चांगला असेल , तर आपला विकास होतो आणि वाईट गुणांच्या , , विचारांच्या सहवासात आपण राहिलो तर ते अवगुण , वाईट सवयी , दुष्ट प्रवृत्ती चटकन आत्मसात होऊ शकतात . त्याचा वाईट परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर घडून येतो . एक प्रसिद्ध गोष्ट आहे , की दोन पोपट दोन वेगवेगळ्या पिंजऱ्यात विकण्यासाठी ठेवलेले असतात . एक पिंजरा एक कसाई घेऊन जातो , तर दुसरा पिजरा एका सद्गृहस्थाच्या घरी नेला जातो . कसायाकडे असलेला पोपट शिव्या शिकतो ,

 तर सद्गृहस्थाकडे असलेला पोपट मधुरवाणीने आलेल्या गेलेल्यांचे स्वागत करतो , श्लोक म्हणतो , या उदाहरणावरूनही आपल्याला हे कळते . को चांगल्या संगतीचा परिणाम चांगला , तर काय सगानीमा मोटो
आपण चांगल्या लोकोच्या , उच्च विचाराच्या , चांगल्या पुस्तकाच्या सान्निध्यात , सहवासात राहिल्यामुळे आपल्यातही चांगल्या विचाराची , सद्गुणाची , मूल्याची रुजवण होते . प्रगल्भता येते . जोवन चांगल्या पद्धतीने जगण्याची प्रेरणा मिळते . आपल्या वर्तनात सुधारणा होते . सद्वर्तनी मनुष्याच्या हातून सत्कर्मेच घडतात . सत्कर्माचा परिपाक म्हणून जीवन चारित्र्यसंपन्न , आदर्श जमते .

भरतवाक्य कविता 10वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]


Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post