मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध । Mi pahileli jatra marathi nibandh

आमच्या गावातील जत्रा  निबंध लिहीत असताना लक्षात ठेवायचे महत्त्वाचे मुद्दे.
  1.  गावातील जत्रा
  2.  गाव माणसांनी फुललेले
  3.  देवळात मंगलमय वातावरण
  4.  देवळात भोवतालची विविध दुकाने
  5.  हिवताप निर्मूलन, कुटुंबनियोजन, स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध याविषयी जनजागृती 
  6.  एका बाजूला गुरांचा बाजार
  7.  बाजूला शेतीची अवजारे ची दुकाने
  8.  फिरते पाळणे  खाऊची दुकाने 
  9.  तुम्ही लुटलेला मनमुराद आनंद
  10.  आणि तुम्हाला आलेला अनुभव याविषयीचे मत
मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध । Mi pahileli jatra marathi nibandh

मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध 

आमच्या गावाची रक्षणकर्ती देवता म्हणजे आमची ' मंगळाई ' . मंगळाई देवीचे देऊळ गावाबाहेर एका टेकडीवर आहे . देवळात जायचा रस्ता जरा अरुंद आणि अवघडच आहे . तरीही गावकरी देवळात जाण्याचे कधीही चुकवत नाहीत . दरवर्षी चैत्री पौर्णिमेला देवीची जत्रा भरते . हा मोठा उत्सवच असतो . 

त्या काळात गावात खूप पैपाहुणे येतात . जे गावकरी नोकरीधंदयाच्या निमित्ताने गावाबाहेर पडले आहेत , तेही जत्रेला आवर्जून येतात . गावकरी मोठ्या उत्साहाने सर्व अतिथींचा पाहुणचार करतात , आगतस्वागत करतात . जत्रेचा हा महोत्सव तीन दिवस चालू असतो , पण बरेच दिवस जत्रेची पूर्वतयारी धूमधडाक्यात चालू असते . जत्रा जवळ आली की , गावकरी देवळाच्या परिसराची स्वच्छता करतात . देवळाला रंगरंगोटी करतात . 

प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवसांत मंदिरावर रोषणाई केलेली असते . फुलांच्या रंगीबेरंगी तोरणा - माळांनी सारा मंदिरपरिसर सजवलेला असतो . मंगळाई देवी नवसाला पावते , अशी भाविकांची श्रद्धा असल्याने जत्रेला दूरवरून खूप लोक येतात . नवस फेडतात . त्यामुळे या परिसरात त्या काळात खूप गर्दी होते . जत्रेच्या दिवसांत या परिसरात पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या दुकानांची गर्दी असतेच . पण त्याचबरोबर भाविकांना आकर्षित करणारी इतरही अनेक दुकाने असतात . 

छोट्यांसाठी खूप खेळही मांडलेले असतात . ' मेरी गो - राऊंड ' , ' विजेचा पाळणा ' यांवर मुलांची सतत झुंबड उडालेली असते . जत्रेत लक्ष वेधून घेणारी अशी अनेक दालने असतात . त्यांपैकी शेती आणि शेतीची साधने यांची माहिती देणारी काही दालने असतात ; काही दालने कुटुंबनियोजन , कुटुंब स्वास्थ्य यांची माहिती देणारी असतात . मात्र , ग्रामस्वच्छता व ग्रामविकास यांची माहिती देणारे दालन सर्वांना आकर्षित करीत असते . या सर्वामुळे ही आमच्या मंगळाईची जत्रा खरोखरच मंगल झालेली आहे .
 मराठी निबंध - 2

मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध । Mi pahileli jatra marathi nibandh

आमच्या  गावात शिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरा पुढे खूप मोठी जत्रा भरते  जत्रा बोललं की लहान मुलांना खूप आनंद होतो तसाच मला पण खूप आनंद होतो जत्रेच्या दिवशी आम्ही सर्व मित्र दिवसभर जत्रेमध्ये करत असतो नवीन वस्तू खरेदी करत असतो तसेच आलेल्या  पाळण्यामध्ये बसत असतो एकदा काय झालं आम्ही पाळण्यामध्ये बसलेलो होत आणि अचानक जोर जोरात पाऊस सुरू झाला आम्ही पाळणा मध्ये बसलो होतो पूर्णपणे ओलेचिंब झालो वरून बघत होतो तर जत्रा मधली सर्व माणसे इकडून तिकडे तिकडून इकडे पळत होती दुकानवाले त्यांचे सामान आवरत होते असं सर्व अचानक झालं त्यानंतर आम्ही सर्व घरी आलो

आणि दुसऱ्या दिवशी परत जत्रेत गेलो दुसऱ्या दिवशी ची जत्रा खूपच स्त होती कारण दुसर्‍या दिवशी सर्व प्रकारचे दुकान आलेले होते सर्व सगळीकडे लाईट माळी होत्या मंदिर चमकत होते सर्व मित्र सोबत होते आम्ही खूप मज्जा केली ते घेतलं खाऊचे दुकान आलेले होती आम्ही सर्व मित्र खाऊ च्या दुकानात गेलो आणि पोट भरून खाऊ घाला खाऊ खाल्यानंतर पैसे दिले आणि तिथून निघालो तर दाबेली खाली आल्यानंतर गुड आम्हाला आईस्क्रीम ची गाडी दिसली मग काय सर्व मित्राच्या आईस्क्रीमच्या गाडी कडे गेले आणि आइस्क्रीम सुद्धा खाली असं करत करत आमच्या सर्वांचे पोट गच्च भरलेले होते खिशातले सर्व पैसे सुद्धा संपलेले होते आणि मोकळा खिसा करून आम्ही सर्वजण जत्रेचा एका कडेला जाऊन उभा राहिलो आणि हळूहळू प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरी आलो

जत्रेच्या तिसऱ्या दिवशी मी आणि माझा परिवार आम्ही सर्वजण सोबत जत्रेला गेलो मग मला घरच्यांनी जे हवं होतं ते घेऊन दिलं तसेच माझ्या लाडक्या बहिणीला सुद्धा मी पूर्ण जत्रा फिरवली घरच्यांसोबत यात्रेला आल्यानंतर त्यांच्यासोबतच राहावं लागतं आणि ते जे बोलतील ते ऐकावं लागतं असं करत करत आम्ही पूर्ण जत्रा फिरलो देवाचे दर्शन घेतले आणि खाऊ तसेच बहिणीसाठी दुकानांमध्ये जाऊन खरेदी केली खरेदी झाल्यानंतर आम्ही सर्वजण बाजूच्याच एका हॉटेलमध्ये जाऊन पोटभर जेवण केलं आणि घराकडे निघालो

असे हे आमच्या जत्रेचे तीन दिवस आमच्या गावामध्ये जत्रा तीन दिवस असते आणि त्यानंतर हळू हळू कमी होत होत पाचव्या दिवशी संपूर्ण जत्रा संपून जाते जत्रेच्या तिन्ही दिवशी मी जत्रेचा आनंद घेतला खूप मजा केली आमच्या गावाची जत्रा आम्ही कधीच विसरू शकत नाही आमच्या गावाची जत्रा खूपच सुंदर आणि खूपच मोठी असते

मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध याविषयी निबंध लेखन केले आहेत तुम्हाला हे निबंध लेखन कसे वाटले हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आपण मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध याविषयी दोन प्रकारचे निबंध लिहिलेले आहेत ते तुम्ही सविस्तर पणे वाचा आणि त्यांचे लेखन करा आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा मी पाहिलेली जत्रा हा निबंध तुम्हाला कसा वाटला आणि इतर कोणत्याही प्रकारचे मराठी किंवा हिंदी निबंध लागत असतील तर आम्हाला कमेंट मध्ये कळवा आम्ही तुमच्या साठी लवकरात लवकर त्यांनी बंद घेऊन येऊ धन्यवाद

मी-पाहिलेली-जत्रा-मराठी-निबंध मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध । Mi pahileli jatra marathi nibandh

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post