वृक्षदिंडी मराठी निबंध - Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वृक्षदिंडी मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधामध्‍ये पर्यावरणाविषयी जनजागृती व वृक्ष लागवड वाढवण्‍याविषयी शाळेतील मुले कश्‍याप्रकारे वृक्षदिंडी काढुन वृक्षारोपण करतात याविषयी सविस्‍तर माहीती दिली आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

वृक्षदिंडी मराठी निबंध - Marathi Nibandh

वृक्षदिंडी - निबंध वर्णनात्मक निबंधलेखन मराठी


पर्यावरणाचा प्रश्न ही आजची जागतिक समस्या झाली आहे . प्रदूषणाचे बळी आपण केव्हा होऊ , हे सांगता येणार नाही . हा धोका ओळखून आमच्या शाळेने विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रदूषणाशी दोन हात करण्याचे ठरवले . वनमहोत्सवाच्या निमित्ताने आमच्या शाळेने ' वृक्षदिंडी'चा कार्यक्रम आयोजित केला होता . 

त्याची तयारी जवळजवळ महिनाभर चालू होती . प्रत्येक विदयार्थ्याला आपल्या घरी एक ' बालवृक्ष ' तयार करायला सांगितला होता . कोणी कोणते झाड लावावे , हे ठरवण्याची प्रत्येकाला मुभा होती . २ ऑक्टोबरला सर्व विदयार्थ्यांना आपण लावलेली रोपे घेऊन सकाळी सातला शाळेत बोलावले होते , कारण त्या दिवशी शाळेतून वृक्षदिंडी निघणार होती . साऱ्या गावात फिरून ती परत शाळेतच येणार होती . 

शाळेच्या मागच्या पटांगणात ही झाडे लावली जाणार होती . ते बालतरू भूमातेच्या स्वाधीन केले जाणार होते . ठरल्याप्रमाणे २ ऑक्टोबरला सकाळी सात वाजताच सर्व विदयार्थी शाळेच्या गणवेशात आपापले बालवृक्ष घेऊन शाळेत हजर होते . आतापर्यंत शाळेतून अनेक प्रसंगी मिरवणुका निघाल्या होत्या ; पण आजचा उत्साह अगदी आगळाच होता . कारण आम्ही स्वतः लावलेल्या व काही काळ आम्हीच जोपासलेल्या बालवृक्षांची मिरवणूक होती ती ! आजच्या मिरवणुकीत दिल्या जाणाऱ्या घोषणाही आगळ्यावेगळ्या होत्या- ' झाडे लावा , झाडे जगवा , प्रदूषणाचा नाश करा ' , 

' आजचे बालतरू , उदयाचे कल्पतरू ! ' वृक्षदिंडीत काही विदयार्थ्यांनी वृक्षांसारखे हिरवेगार पोशाख केले होते . त्यांच्या हातात फलक होते - ' वृक्षवल्ली आम्हां सोयरी ' , ' एक बालक , एक झाड ' , ' निसर्ग अमुचा सखा , आम्हां आरोग्य देई फुका ! ' त्या बालतरूंचे स्वागत गावातील सारेजण उत्साहाने करीत होते . संपूर्ण गावातून फिरत फिरत ही वृक्षदिंडी शाळेच्या मागच्या पटांगणात आली . तेथे झाडे लावण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करून ठेवण्यात आली होती . आळी तयार होती . सर्व विदयार्थ्यांनी आपापली झाडे लावली . गुरुजींनी , मुख्याध्यापकांनीही वृक्षारोपणात भाग घेतला आणि काय गंमत ! आकाशाच्या झारीतून त्यांच्यावर पाण्याचा वर्षाव झाला . आम्ही पळत पळत शाळेच्या इमारतीत शिरलो . पाऊस थांबला . टवटवीत झालेली झाडांची पाने वाऱ्याबरोबर सळसळत होती . जणू ती आनंदाने टाळयाच पिटत होती .

वृक्षदिंडी मराठी निबंध - Marathi Nibandh


वृक्षदिंडी मराठी निबंध - Marathi Nibandh


Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post