मी रस्ता चुकतो तेव्हा मराठी निबंध

मी रस्ता चुकतो तेव्हा मराठी निबंध

मी रस्ता चुकतो तेव्हा मराठी निबंध

मी रस्ता चुकतो तेव्हा 
    लहानपणी मी अतिशय भित्रा होतो . कुठेही गेलो तरी आपण रस्ता तर चुकणार नाही ना , अशी भीती कायम मनात असायची . त्यामुळे मी वडीलमाणसांचा हात सोडत नसे . कधी कधी तर या भित्रेपणामुळे आई माझ्यावर चिडत असे . लहानपणी मी एकदा रस्ता चुकलो होतो . सुट्टीत आम्ही आत्याकडे गेलो होतो . आत्याकडे काहीतरी समारंभ असल्यामुळे सर्व मोठी माणसे त्यात गुंतली होती . खरे पाहता मी सतत आजीचा किंवा आईचा पदर धरून असायचो ; पण कसा कोण जाणे त्या दिवशी मी रस्त्यावर एकटाच बाहेर पडलो . वाटेत मला एक सुंदर मांजर दिसले . त्याचे ते लोभस , गुबगुबीत अंग , शुभ्र रंगाच्या पार्श्वभूमीवरील हिरवट करड्या रंगाचे पट्टे हे पाहून ते मांजर आपण घरीच घेऊन जाऊ असे वाटू लागले . त्याला धरण्यासाठी मी त्याच्या मागोमाग धावत राहिलो . थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले की , आपण रस्ता चुकलो आहोत . मी जोराने रडायला सुरुवात केली . माझ्याभोवती गर्दी जमली . त्यांत पोलीसही होता . त्यामुळे तर मी अधिकच गोंधळलो आणि आत्याच्या घराचा पत्ता न सांगता मी आमच्या घरचा पत्ता सांगू लागलो . त्यामुळे जमलेल्या मंडळींना काही कळेना . तेवढ्यात आत्याच्या घरातील कोणीतरी मला पाहिले आणि त्याने मला ओळखले .

या घटनेमुळे माझ्या मनात रस्ता चुकण्याची भीती ठाण मांडून बसली आहे . थोडा मोठा झाल्यावर वर्तमानपत्रे वाचू लागलो आणि त्यांतील ' मुले पळवण्याच्या ' बातम्या वाचून तर ही भीती फारच वाढली . गेल्या वर्षी आठवीत असताना वयाच्या अगदी बाराव्या वर्षीही मी रस्ता चुकलो होतो ; पण तो वेगळ्या अर्थाने . आठवीचे वर्ष सुरू झाले आणि हेमंत नावाचा एक नवीन विद्यार्थी आमच्या वर्गात आला . हेमंतच्या बाबांची आमच्या गावात बदली झाली होती . हेमंत मोठ्या शहरातून येथे आला होता . तो खूप गप्पिष्ट होता . त्याच्याजवळ गोष्टींचा साठा होता . तो गोष्टी रंगवून सांगत असे . स्वाभाविकच मला त्या ऐकायला आवडत . थोड्याच दिवसांत त्याची माझी गट्टी जमली . एके दिवशी शाळेतून मधल्या सुट्टीत आम्ही हेमंतच्या घरी गेलो . तेथील वैभव पाहून मी दिपून गेलो . हेमंतच्या घरी कोणी नव्हते . त्या दिवशी मी हेमंतकडे डी . व्ही . डी. वर चित्रपट पाहिला . मग पुढे वेळी - अवेळी शाळा बुडवून आम्ही हेमंतच्या घरी जात असू आणि चित्रपट पाहत असू . 

त्यामुळे आपले अभ्यासाकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे , हे माझ्या ध्यानातही आले नाही . मात्र , थोड्याच दिवसांत हे सर्व घरी कळलेच . घरात माझ्याशी सर्वांनीच अबोला धरला . आई एकटी रडत बसली होती . मला हे सर्व असह्य झाले . मलाही रडू कोसळले . मी आईजवळ जाऊन तिला मिठी मारली आणि तिची क्षमा मागितली . पुन्हा असे न वागण्याचे वचन दिले . चाचणी परीक्षेत मी नापास झालो . नंतर मी कधीच शाळा बुडवली नाही . झटून अभ्यास करू लागलो ! भरपूर गुण मिळवू लागलो ! अगदी आजपर्यंत ! मी रस्ता चुकलो होतो तो अशा प्रकारे , नियमितपणे अभ्यास करण्याचा रस्ता सोडून भरकटलो होतो . मात्र त्यानंतर आजपर्यंत मी सरळमार्गी विदयार्थी म्हणूनच वागत आलो आहे .

मी रस्ता चुकतो तेव्हा मराठी निबंध


Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post