निसर्गाचा प्रकोप- भूकंप मराठी निबंध

 निसर्गाचा प्रकोप- भूकंप मराठी निबंध 

निसर्गाचा प्रकोप- भूकंप मराठी निबंध

निसर्गाचा प्रकोप -  निसर्ग अमुचा सखा ' म्हणून माणूस नेहमी निसर्गाचा गौरव करीत आला आहे ; पण हाच माणूस आपल्या अविचारी कृतीने निसर्गाला वेदना देत असतो . कधी तो प्रचंड वृक्षतोड करतो : कधी हवेत दूषित वायू सोडतो ; तर कधी कारखान्यांचे मलीन पाणी नदयांच्या गोड्या पाण्यात सोडून सारे पाणी दूषित करतो . स्वाभाविकच त्याचा मित्र असलेला निसर्ग त्याच्यावर संतप्त होऊन रौद्र रूप धारण करतो . या निसर्गाच्या संतापाचे एक रूप म्हणजे भूकंप .

 आता वैज्ञानिकांनी भूकंपाची शास्त्रीय कारणे शोधून काढली आहेत . पण कधी कधी या शास्त्रज्ञांच्या कल्पनांनाही धक्का बसतो . सहयाद्रीच्या दख्खन पठारावरील खडकात भक्कमपणा अधिक असल्यामुळे तेथे भूकंप कधी होणारच नाही , असे सर्वजण मानत होते ; पण काही वर्षांपूर्वी घडलेल्या कोयनेच्या परिसरातील भूकंपाने व नंतर काही वर्षांनी लेल्या लातूरच्या भूकंपाने या कल्पनेला धक्का दिला आहे . सप्टेंबरचा शेवटचा दिवस . पावसाळा जवळजवळ संपत आला होता . शेतीतील कामे संपल्यामुळे गावकरी गणपतीच्या सणात रमले होते . 

अनंतचतुर्दशीला गणपतींचे विसर्जन करून , तृप्त मनाने ते रात्री आपल्या घरकुलात गाढ झोपले होते ; पण ती रात्र त्यांच्यासाठी काळरात्र ठरली . भल्या पहाटे अचानक जमीन हादरू लागलो आणि दगडमातीची ती घरे पत्त्याच्या बंगल्यांसारखी कोसळली . घरांच्या भिंतीसाठी वापरलेले मोठमोठे चिरे गाढ निद्रेत असलेल्या लोकांच्या अंगावर कोसळले आणि त्यांची निद्रा ही चिरनिद्रा ठरली . नांदल्या गावांना स्मशानाचे स्वरूप आले होते . मृत्यूचे भीषण तांडव सुरू झाले होते . सगळीकडे हाहाकार उडाला होता . सर्वजण या भूमातेच्या कोपाने सुन्न झाले होते . 

अल्पावधीतच ही वार्ता जगाच्या कानाकोपऱ्यांत जाऊन पोहोचली आणि मदतीचे अनेक हात तत्परतेने पुढे आले . भूकंपाचे लहानमोठे धक्के बसतच होते . चारही बाजूंनी धावून आलेले लोक भूकंपाचा प्रकोप पाहून दिङ्मूढ झाले . प्रत्येकजण आपल्याला जमेल तशी मदत करीत होता . दगडमातीच्या ढिगाऱ्यांखाली शेकडो लोक गाडले गेले होते . काहींना बाहेर काढण्यात आले . जखमी लोकांना रुग्णालयांत पोहोचवले जात होते . मृतांना एकत्रितपणेच अग्नी देण्यात आला . मनाला सुन करणारी अवकळा पसरली . लवकरच या आपत्तीतून वाचलेल्या लोकांसाठी नवीन निवारे उभे राहू लागले . या अमानुष क्रौर्यामध्येही काही ठिकाणी माणसांचा स्वार्थीपणा डोके वर काढतच होता . 

अशा या विपत्तीत चोयामाऱ्या करणारे काही समाजकंटकही होते . त्यांच्या लीला ऐकून मन विषण्ण होत होते 
होत्याचे नव्हते करणाऱ्या या आपत्तीमुळे एक गोष्ट ठळकपणे लक्षात आली की , माणसाने स्वकर्तृत्वाच्या कितीही गमजा मारल्या , तरी निसर्गाच्या रौद्र रूपापुढे तो हतबल होऊन जातो . .

निसर्गाचा प्रकोप- भूकंप मराठी निबंध 

निसर्गाचा प्रकोप- भूकंप मराठी निबंध


Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post