शालेय जीवनात भेटलेल्या मित्रमैत्रिणी मराठी निबंध

शालेय जीवनात भेटलेल्या मित्रमैत्रिणी 

शालेय जीवनात भेटलेल्या मित्रमैत्रिणी


तशी मी फार सुदैवी आहे . मला नेहमीच खूप मित्रमैत्रिणी मिळत गेल्या . आता तर आम्हा मित्रमैत्रिणींचा एक संघच तयार झाला आहे . आम्ही सारे शिशुवर्गापासून एकत्र आहोत . त्यामुळे आमची मैत्री अगदी घट्ट आहे . आम्ही एकत्र असलो की धम्माल सुरू होते . नाना उचापती करून आम्ही गंमतजंमत करीत असतो . 

म्हणून आमच्यापैकी कोणी गैरहजर असले की आम्हाला चुकल्या चुकल्यासारखे वाटते . एका वर्षी मला कांजण्या आल्या होत्या . त्या वेळी मला तीन आठवडे कोणालाही भेटण्यास बंदी होती . तेव्हा तर मला कित्येकदा रडू यायचे . पण मी बरी होऊन शाळेत गेले , तेव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नाही . मग सर्वांनी मला माझा बुडालेला अभ्यास पूर्ण करण्यास झटून मदत केली . माध्यमिक शाळेतील पाच वर्षे तर माझ्या कायम लक्षात राहतील . माझ्याकडे वक्तृत्वकला चांगली असल्याने मी वक्तृत्वस्पर्धेतील सर्व बक्षिसे पटकावली . 

तर प्रसाद व प्रज्ञा आपल्या अभिनयाने आंतरशालेय स्पर्धेतील नाट्यस्पर्धा जिंकत होते . राणी , सोनाली , दिपू मैदान गाजवत होते . त्यामुळे शाळेत आमचा गट फार भाव खात असे . आमच्यापैकी कोणाचीही स्पर्धा असो , आम्ही सर्वजण तेथे न चुकता वेळेवर उपस्थित असू . शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन , वर्गाची सहल हे कार्यक्रम म्हणजे तर मजेची पर्वणीच . नाटकात एखादयाचाच सहभाग असे ; पण प्रत्येकाला वाटे आपण तेथे हवेच . मिनूचा भरतनाट्यमचा कार्यक्रम होता , तेव्हा आठ दिवस आम्ही सर्वजण धडपडत होतो . निशूची पहिली कविता मासिकात छापून आली , तेव्हा आम्हांला आभाळाला हात टेकल्याचा आनंद झाला . 

आम्हां मित्रमैत्रिणीमध्ये कधीतरी बारीकसारीक भांडणेही झालीत ; पण ती तात्पुरती . ती लगेच संपायची . एकमेकांविषयी राग , अबोला तर कधीच कोणीही धरला नाही . आपापसांत हेवे , मत्सरही कधी कोणी बाळगला नाही . परीक्षेच्या काळात पेपर संपला की आम्ही उभ्याउभ्यानेच सर्व पेपर सोडवत असू . त्यावरून आम्ही आमचे प्रत्येकाचे गुण निश्चित करतो . आमचा अंदाज बहुतांश वेळा खरा ठरत असे . 

मी पहिल्यापासून अभ्यासात हुशार . त्यामुळे बहुतेक वेळा माझाच पहिला क्रमांक असे . कधीतरी श्रुती किंवा पूजा हा क्रमांक पटकावत . पण आमच्यात यावरून कधीही हेवेदावे झाले नाहीत , आम्ही आमच्या मैत्रीच्या असंख्य आठवणी उराशी बाळगल्या आहेत . आता दहावीनंतर आमच्या वाटा कदाचित भिन्न होतील . पण आमच्या या आठवणी पुसल्या होती झाडे गणवेशात जाणार नाहीत .

शालेय जीवनात भेटलेल्या मित्रमैत्रिणी

शालेय जीवनात भेटलेल्या मित्रमैत्रिणी


Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post