शब्दभेद मराठी व्याकरण - [ विश्लेषण प्रकार जाती ]

शब्दभेद म्हणजे काय ?  मराठी व्याकरण 

शब्दभेद म्हणजे दोन शब्दांतील फरक . 

शब्दभेद कशामुळे जाणवतात ? 
भाषेत असंख्य शब्द असतात . 
शब्दांना अर्थ असतो . 

• शब्दांच्या उच्चारांतून व लेखनांतून जेव्हा सूक्ष्म बदल जाणवतात , तेव्हा अर्थामध्ये खूप फरक पडतो . वरील कारणांमुळे शब्दभेद होतात


शब्दभेदाचे वर्गीकरण चार प्रकारे होते : 

( १ ) शब्दांचे उच्चार साधर्म्य ( सारखेपणा ) . 
( २ ) शब्दलेखनातील होणारा सूक्ष्म बदल . 
( ३ ) शब्दांच्या संदर्भाची अचूक जाण . 
( ४ ) शब्दलेखनात एखादया अक्षराचा फरक , 



( १ ) शब्दांचे उच्चार साधर्म्य एका शब्दाचे भिन्न अर्थ ) 

( अ ) पुढील वाक्ये नीट वाचा व अधोरेखित शब्दांकडे लक्ष द्या : 
( १ ) राजाच्या दरबारी गज झुलत होता . 
( २ ) इमारतीच्या खिडकीला गज लावले .

पहिल्या वाक्यातील ' गज ' या शब्दातील ' ज ' चा उच्चार ' ज्य ' सारखा ( तालव्य ) आहे . 

• दुसऱ्या वाक्यातील ' गज ' या शब्दातील ' ज ' चा उच्चार नेहमीचा ( दंतमूलीय ) आहे . उच्चारांतील या सूक्ष्म भेदामुळे शब्दभेद व अर्थभेद झाला आहे . 
पहिले वाक्य → गज → हत्ती 
दुसरे वाक्य → गज → लोखंडी सळई जोतित शब्दांकडे

( आ ) पुढील दोन वाक्ये नीट वाचा व अधोरेखित शब्दांकडे लक्ष दया : 

( १ ) लहान मुलांचे बोल मधुर असतात . 
( २ ) रमेश , जरा हळू बोल . 

दोन्ही वाक्यांतील ‘ बोल ' या शब्दांत उच्चारसाधर्म्य ( सारखेपणा ) असला तरी त्यांच्या अर्थांत फरक आहे . ( अर्थभेद आहे .
पहिले वाक्य → बोल → शब्द ( वाणी ) 
दुसरे वाक्य → बोल → बोलणे ( क्रियापद ) 

शब्दांचे उच्चारसाधर्म्य व भिन्न अर्थ असलेल्या शब्दांचं पुढील यादी अभ्यासा : 



  1. अंक → ( १ ) आकडा ( संख्या ) ( २ ) मांडी 
  2. माया → ( १ ) ममता ( २ ) धन
  3. माळ → ( १ ) फुलांचा सर ( २ ) ओसाड जमीन
  4. जलद → ( १ ) लवकर ( २ ) ढग
  5. जीवन → ( १ ) आयुष्य ( २ ) पाणी
  6. तीर → ( १ ) काठ ( २ ) बाण

( २ ) शब्दलेखनातील सूक्ष्म बदल : 

पुढील दोन वाक्ये नीट वाचा व अधोरेखित शब्दांकडे लक्ष द्या : 
( १ ) मला पुस्तकांच्या पाच प्रती दे . 
( २ ) आई - वडिलांप्रति आदर बाळगावा . 
पहिले वाक्य → प्रती → पुस्तकांची संख्या 
दुसरे वाक्य → प्रति → एखादयाला उद्देशून ( विषयी ) 

• येथे ' ती ' ( दीर्घ वेलांटी ) व ' ति ' ( हस्व वेलांटी ) या लेखनातील सूक्ष्म बदलामुळे अर्थदृष्ट्या बदल झाला .


( ३ ) शब्दांच्या संदर्भाची अचूक जाण : 
पुढील वाक्ये नीट वाचा व अधोरेखित शब्दांकडे लक्ष दया : 
( १ ) पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केले गेले 
( २ ) सूर्यास्ताच्या वेळी ध्वजावरोहण करण्यात आले . 

पहिले वाक्य → ध्वजारोहण → ( आरोहण ) ध्वज चढवणे . 
दुसरे वाक्य → ध्वजावरोहण → ( अवरोहण ) ध्वज उतरवणे .

शब्दलेखनात एखादया अक्षराचा फरक : 

पुढील वाक्ये नीट वाचा व अधोरेखित शब्दांकडे लक्ष द्या : 
( १ ) लग्नात वर शोभून दिसत होता . 
( २ ) आज बाजाराचा वार आहे . 
( ३ ) आज जोराचा वारा सुटला . 

पहिले वाक्य → वर → नवरा 
दुसरे वाक्य तिसरे वाक्य → वार → दिवस → वारा → हवा ( पवन , वात )

1 Comments

Thanks for Comment

Previous Post Next Post