थांब जरा आषाढघना कविता 12वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

 
थांब जरा आषाढघना
बघुं दे दिठि भरुन तुझी करुणा
कोमल पाचूंचीं हीं शेतें
 प्रवाळमातीमधलीं औतें
इंद्रनीळ वेळूंचीं बेटें
या तुझ्याच पदविन्यासखुणा

रोमांचित ही गंध-केतकी
 फुटे फुलीं ही सोनचंपकी
लाजुन या जाईच्या लेकी
तुज चोरुन बघती पुन्हापुन्हा
उघड गगन, कर घडिभर आसर
अाणि खुलें कर वासरमणि-घर
 वाहूं दे या तव किमयेवर
कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा

कणस भरूं दे जिवस दुधानें
देठ फुलांचा अरळ मधानें
कंठ खगांचा मधु गानानें
आणीत शहारा तृणपर्णां
आश्लेषांच्या तुषारस्नानीं
 भिउन पिसोळीं थव्याथव्यांनीं

रत्नकळा उधळित माध्यान्हीं
न्हाणोत इंद्रवर्णांत वना
काळोखाचीं पीत आंसवें
पालवींत उमलतां काजवे
करुं दे मज हितगूज त्यांसवें
निरखीत जळांतिल विधुवदना


थांब जरा आषाढघना कविता 12वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
थांब जरा आषाढघना

थांब जरा आषाढघना रसग्रहण . खालील ओळींचे रसग्रहण करा .


रे थांब जरा आषाढघना
बधू दे दिठि भरुन तुझी करुणा 
कोमल पाचूंची ही शेतें 
प्रवाळमातीमधलीं औतें 
इंद्रनीळ वेळची बेटे

या तुझ्याच पदविन्यासखुणा
रोमांचित ही गंध - केतकी
फुटे फुली ही सीनचंपकी 
लाजुन या जाईच्या लेकी 
तुज चोरुन बचती पुन्हा पुन

आशयसौंदर्य : 
कवी बा . भ . बोरकर यांच्या ' रे थांब जरा आषाढघना या निसर्ग कवितेतील या उपरोक्त ओळी आहेत . आषाढ महिन्यात धुवाधार पाऊस पडतो आणि सृष्टीसौंदर्य फुलून येते . या नयनरम्य दृश्याचे वर्णन करताना कवी आषाढमेघाला थोडेसे थांबून हा सौंदर्यसोहळा पाहण्याची विनवणी करीत आहेत . 

आकाशात आषाढमेघ दाटून आले आहेत . त्या आषाढमेघाला उद्देशून कवी म्हणतात हे आषाढमेघा , जरासा थांब आणि तुझ्या कृपेने नटलेले निसर्गसौंदर्य मला तुझ्यासोबत डोळे भरून पाहू दे . कोमल नाजूक पाचूंच्या रंगाची ही हिरवीगार शेते . 
पोवळ्याच्या लाल रंगाच्या मातीत चालणारे नांगर , ही इंद्रनील रत्नांच्या प्रभेसारखी बांबूची बेटे या सर्व तुझ्याच पाऊलखुणा आहेत . तुझ्या आगमनाने रोमांचित झालेली सुवासिक केतकी , नुकतीच उमललेली सोनचाफ्याची कळी आणि जाईच्या लाजऱ्या मुली तुला पुन्हा पुन्हा चोरून बघत आहेत . अशी ही तू निर्माण केलेली किमया पाहा .

भाषा वैशिष्ट्ये 
उपरोक्त पंक्तीमध्ये कवींनी संस्कृतप्रचुर नादमय शब्दरचना केली आहे . आषाढाच्या आगमनाने भवतालची नटलेली सृष्टी नादमय शब्दकळेत रंगवलेली आहे . विशेष म्हणजे ' आषाढघन , केतकी , सोनचाफ्याची कळी . जाईची फुले ' यावर मानवी भावनांचे आरोपण करून कवींनी 

करणाला भिडणारे सौंदर्य प्रत्ययकारी रितीने मांडले आहे . निसर्ग आणि मानव यांतील सजीव अतूट नाते लालित्यपूर्ण शब्दांत चित्रित केले आहे . ' लाजणाऱ्या जाई नि रोमांचित होणारी केतकी यातला हृदय भावनावेग रसिकांच्या मनाला भिडतो . नादानुकूल गेय शब्दकळेमुळे या ओळी ओठांवर रेंगाळतात .

थांब जरा आषाढघना कविता 12वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
थांब जरा आषाढघना

बा. भ. बोरकर (१९१० ते १९८४) :

श्रेष्ठ कवी, कादंबरीकार, ललित लेखक, कथाकार. ‘पद्मश्री’ या सन्मानाने भारत सरकारकडून गौरवान्वित. कवितेचे संस्कार  लहानपणापासूनच. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे मध्यवर्ती विषय आहेत. बोरकरांच्या कविता निसर्गप्रतिमांनी संपन्न आहेत.  तीव्र संवेदनशीलता हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व नादमयता हा त्यांच्या काव्याचा विशेष आहे. १९६० साली त्यांच्या तोपर्यंतच्या सर्व कवितांचा संग्रह ‘बोरकरांची कविता’ या नावाने प्रकाशित झाला. 

त्यांचे ‘गितार’, ‘चैत्रपुनव’, ‘चांदणवेल’, ‘कांचनसंध्या’, ‘अनुरागिणी’,  ‘चिन्मयी’ हे काव्यसंग्रह, ‘कागदी होड्या’, ‘घुमटावरले पारवे’, ‘चांदण्याचे कवडसे’, ‘पावलापुरता प्रकाश’ हे लेखसंग्रह, तसेच  ‘मावळता चंद्र’, ‘अंधारातली वाट’, ‘भावीण’, ‘प्रियदर्शिनी’, ‘समुद्रकाठची रात्र’ इत्यादी ललित साहित्याची पुस्तके प्रसिद्ध आहेत. 
त्यांच्या ‘सासाय’ या कोंकणी कवितासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

निसर्गसौंदर्याने ओथंबलेल्या ‘रे थांब जरा आषाढघना’ या कवितेत काव्यही तितकेच ओतप्रोत भरलेले आहे. आषाढमासातील  पावसाने निसर्गाला चहूबाजूने हिरवाईच्या नाना छटांनी नटवलेले आहे. हे निसर्गसौंदर्य अनुभवायचे असेल तर आषाढमेघाने क्षणभर  थांबावे आणि निसर्गात त्यानेच घडवलेली रंगीबेरंगी जादुई किमया पाहण्याची संधी आपणाला द्यावी असे कवीला वाटते. 

आषाढमेघ  थांबला तर लालसर मातीतील हिरवीगार शेते, शेतात चाललेली औते, वेळूंची बेटे, फुललेला केवडा, सोनचाफा, लाजरी जाई हे  निसर्गसौंदर्य मनसोक्त पाहता येईल. रत्नजडीत पंखांच्या फुलपाखरांचे थवे, पाण्यात सळसळणाऱ्या मासोळ्या आणि रात्रीच्या मिट्ट  काळोखात चमकणारी काजव्यांची प्रकाशफुले यांच्याशी सुखसंवाद साधता येईल असे कवीला वाटते.

निसर्गाच्या विविध घटकांमधून डोकावणाऱ्या मानवी भावभावनांमुळे कवितेतील वातावरण अधिक सजीव आणि चैतन्यमय झाले  आहे. अभिव्यक्तीच्या आवश्यकतेनुसार कधी संस्कृत तर कधी ग्रामीण बोलीतील शब्दांची गोड रूपे वापरून कवीने या रचनेत निर्माण  केलेल्या माधुर्याचा आस्वाद घेताना आपण चकित होऊन जातो.

अनुक्रमणिका  / INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: वेगवशता Click Now
02: रोज मातीत Click Now
03: आयुष्य... आनंदाचा उत्सव Click Now
04: रे थांब जरा आषाढघना Click Now
05: वीरांना सलामी Click Now
* आत्मविश्वासासारखी शक्ती नाही Click Now
06: रंग माझा वेगळा Click Now
07: विंचू चावला Click Now
08: रेशीमबंध Click Now
09: समुद्र कोंडून पडलाय Click Now
10: दंतकथा Click Now
11: आरशातली स्त्री Click Now
12: रंगरेषा व्यंगरेषा Click Now
* जयपूर फूटचे जनक Click Now

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post