शिक्षक दिन वर मराठी निबंध - Essay On Teacher's Day In Marathi

शिक्षक दिन वर मराठी निबंध - Essay On Teacher's Day In Marathi


शिक्षक दिन वर मराठी निबंध - Essay On Teacher's Day In Marathi


दरवर्षी ५ सप्टेंबरला भारतात शिक्षकदिन साजरा केला जातो . भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती कै . डॉ . राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस . डॉ . राधाकृष्णन हे थोर विद्वान व आदर्श असे शिक्षक होते , म्हणून ५ सप्टेंबर हा शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो . दरवर्षी आमच्या शाळेत शिक्षकदिनाला शाळेची सर्व जबाबदारी आम्ही विदयार्थी घेतो . 

वरच्या इयत्तामधील मुले खालच्या इयत्तांच्या वर्गात जाऊन अध्यापनाचे काम करतात . वर्गातील सर्व मुलांना शांत ठेवून कोणत्याही विषयातील एखादा भाग त्यांना समजावून देणे हे किती अवघड काम आहे , हे आम्हांला स्वानुभवाने त्या वेळी उमगते . विदयार्थ्यांपैकीच कोणीतरी मुख्याध्यापक , पर्यवेक्षक , शिपाई यांची भूमिका पार पाडतात . ते आपापली कामे गंभीरपणे व मोठ्या रुबाबात करीत असतात . शाळेतील इतर विदयार्थ्यांपेक्षा आपण वेगळे दिसावे , असाच पोशाख त्या वेळी केलेला असतो . शिपाई बनलेल्या विदयार्थ्यांना शाळेची घंटा वाजवण्याचे तर अप्रूप वाटते . 

अध्यापनाचे काम करताना नकळत आपल्या आवडत्या शिक्षकांचे अनुकरण केले जाते . शिक्षकांनाही ते पाहताना मजा वाटते . मग हे विद्यार्थि - शिक्षकांच्या शाळेतील वर्ग नेहमीपेक्षा लवकर सुटतात आणि आम्ही सर्व विदयार्थी व शिक्षक शाळेच्या सभागृहात जमतो . तेथे आजचे विद्यार्थि - शिक्षक आपला शिकवतानाचा अनुभव सांगतात . त्यानंतर शिक्षकाची भूमिका उत्तमरीत्या पार पाडलेल्या विदयार्थ्यांचा सत्कार होतो . तसेच , आमच्या शिक्षकांचा सत्कार केला जातो . त्यांच्यातून आदर्श शिक्षकाची निवड केली जाते व त्यांचाही विशेष गौरव केला जातो .

 दरवर्षी ५ सप्टेंबरला राष्ट्रपतींकडून आदर्श शिक्षकांची नावे जाहीर होतात व त्यांचा सत्कार होतो . असाच सत्कार राज्याराज्यांतून व नगरानगरांतून केला जातो . शिक्षक देशासाठी , राज्यासाठी , गावासाठी जे महान कार्य करतात , त्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे . सर्वजण मनोमन ' गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ' असे म्हणत या सोहळ्यात सहभागी होतात . आपल्याकडे फार पूर्वीपासून गुरुपौर्णिमेला गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे . ५ सप्टेंबरला आपण हीच प्राचीन परंपरा पुढे नेत असतो .

शिक्षक दिन वर मराठी निबंध - Essay On Teacher's Day In Marathi

शिक्षक दिन वर मराठी निबंध - Essay On Teacher's Day In Marathi

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post