वाक्यसंश्लेषण ( वाक्यांचे प्रकार ) मराठी व्याकरण
वाक्यसंश्लेषण ( वाक्यांचे प्रकार ) मराठी व्याकरण
वाक्य म्हणजे काय ?
• अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य म्हणतात .
वाक्याचे दोन भाग असतात :
( १ ) उद्देश्य व
( २ ) विधेय .
( १ ) उद्देश्य → ज्याच्याविषयी सांगायचे त्याला उद्देश्य म्हणतात .
( २ ) विधेय जे सांगायचे त्याला विधेय म्हणतात . उदाहरणार्थ , मुले खेळतात .
उद्देश्य विधेय आता पुढील वाक्य वाचा :
आमच्या शाळेतील मुले रोज मैदानात खेळतात .
उद्देश्य विधेय उद्देश्याविषयी अधिक माहिती → आमच्या शाळेतील विधेयाविषयी अधिक माहिती → रोज मैदानात
उद्देश्याविषयी अधिक माहितीला उद्देश्यविस्तार म्हणतात विधेयाविषयी अधिक माहितीला → विधेयविस्तार म्हणतात . म्हणून , आमच्या शाळेतील मुले रोज मैदानात खेळतात . उद्देश्य विधेय उद्देश्यविस्तार विधेयविस्तार
• एका वाक्यात किती विधाने आहेत ,
यावरून वाक्याचे पुढील प्रकार पडतात :
( १ ) केवल वाक्य
( २ ) मिश्र वाक्य
( ३ ) संयुक्त वाक्य .
( १ ) केवल वाक्य : वाक्यसंश्लेषण ( वाक्यांचे प्रकार )
जेव्हा वाक्यात एकच विधान असते , म्हणजे एक उद्देश्य व एक विधेय असते , तेव्हा त्याला केवल वाक्य म्हणतात
उदा . , मी चांगला अभ्यास केल्यामुळे पास झालो .
केवल वाक्याची वैशिष्ट्ये :
( १ ) एकच उद्देश्य व एकच विधेय असते .
( २ ) कमीत कमी शब्दांचे वाक्य असते .
( ३ ) केवल वाक्ये ही विधानार्थी / प्रश्नार्थी / आज्ञार्थी / विध्यर्थी / होकारार्थी व नकारार्थी असू शकतात .
( ४ ) केवल वाक्यात कोणतेही उभयान्वयी अव्यय नसते
( २ ) मिश्र वाक्य : वाक्यसंश्लेषण ( वाक्यांचे प्रकार )
जेव्हा दोन वाक्ये एकमेकांवर अवलंबून असतात व ती ' जर - तर ,
जेव्हा - तेव्हा ' इत्यादी उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात , तेव्हा त्याला मिश्र वाक्य म्हणतात .
( यात एक वाक्य प्रधान असते व अवलंबून असलेले वाक्य गौण असते . )
( प्रधान म्हणजे मुख्य किंवा महत्त्वाचे व गौण म्हणजे कमी महत्त्वाचे . )
उदा . , जर मी अभ्यास केला , तर मी पास होईन .
मिश्र वाक्याची वैशिष्ट्ये :
( १ ) एक प्रधान वाक्य व एक किंवा अनेक गौण वाक्ये .
( २ ) दोन्ही वाक्ये गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात .
( ३ ) जोडलेले वाक्य किंवा वाक्ये ही अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात .
प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये : आणि , व , किंवा , अथवा , वा , शिवाय , पण , परंतु , परी , बाकी , सबब , यास्तव इत्यादी .
मिश्र व संयुक्त वाक्यांत काही उभयान्वयी अव्यये समान असली तरी जोडली जाणारी वाक्ये आणि अव्ययांचे वाक्यांतील अर्थ लक्षात घेऊन वाक्य मिश्र किंवा संयुक्त हे ठरवावे लागते .
लक्षात ठेवा :
( १ ) मी चांगला अभ्यास केल्यामुळे पास झालो . → केवल वाक्य
( २ ) जर मी अभ्यास केला , तर मी पास होईन . → मिश्र वाक्य
( ३ ) मी चांगला अभ्यास केला आणि पास झालो . → संयुक्त वाक्य
केवल वाक्ये तयार करा :
1 आजी गुळगुळीत रस्त्यावरून चालत होती . तिचा पाय घसरला . ती पडली .
( २ ) माझ्या शाळेने मला बक्षीस म्हणून बंद डबा दिला . त्यात आकर्षक स्मृतिचिन्ह होते .
( ३ ) राजू वारंवार कॉफी पितो . त्याच्या आईला ते आवडत नाही .
( ४ ) रवींद्रनाथ टागोर हे थोर कवी होते . रवींद्रनाथ टागोर यांनी ' गीतांजली ' हे काव्य लिहिले .
उत्तरे :
( १ ) आजी गुळगुळीत रस्त्यावरून चालताना पाय घसरून पडली .
( २ ) माझ्या शाळेने आकर्षक स्मृतिचिन्ह असलेला बंद डबा मला बक्षीस म्हणून दिला .
( ३ ) राजूचे वारंवार कॉफी पिणे त्याच्या आईला आवडत नाही .
( ४ ) थोर कवी रवींद्रनाथ टागोर यांनी ' गीतांजली ' हे काव्य लिहिले .
२. मिश्र वाक्ये तयार करा :
( १ ) आई म्हणाली . मोड आलेल्या धान्यात खूप प्रथिने असतात .
( २ ) शरयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली . तिने खूप सराव केला .
३) आमचा उत्साह व आमचे स्मरण वाढावे . आम्ही शीर्षासन करतो .
( ४ ) मला रेल्वेचे निश्चित आरक्षण मिळायला हवे . मी दिल्लीला : जाईन .
( १ ) आई म्हणाली , की मोड आलेल्या धान्यात खूप प्रथिने असतात .
( २ ) शरयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली , कारण तिने खूप सराव केला .
( ३ ) आमचा उत्साह व आमचे स्मरण वाढावे आम्ही शीर्षासन करतो .
( ४ ) मला रेल्वेचे निश्चित आरक्षण मिळाले , की मी दिल्लीला जाईन . संयुक्त
३. संयुक्त वाक्ये तयार करा
( १ ) नाटकाची तिसरी घंटा वाजली . नाटकाला सुरुवात झाली .
( २ ) कृतिपत्रिका सोपी असते . कृतिपत्रिका अवघड असते . ती सोडवावी लागते .
( ३ ) आपला मुद्दा पटवून दयावा . वाद घालू नये .
( ४ ) वाटेत धो - धो पाऊस लागला . मला यायला उशीर झाला .
( १ ) नाटकाची तिसरी घंटा वाजली आणि नाटकाला सुरुवात झाली .
( २ ) कृतिपत्रिका सोपी असो किंवा अवघड ती सोडवावीच लागते .
( ३ ) आपला मुद्दा पटवून दयावा ; पण वाद घालू नये .
( ४ ) वाटेत धो - धो पाऊस लागला म्हणून मला यायला उशीर झाला . भोळावा
वाक्य व त्याचे प्रकार (Sentence And Its Types)
Tags:
मराठी व्याकरण