रंग माझा वेगळा कविता 12वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!
राहती माझ्यासवें हीं आसवें गीतांपरी;
हें कशाचें दु:ख ज्याला लागला माझा लळा!
कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!
सांगती ‘तात्पर्य’ माझें सारख्या खोट्या दिशा :
‘‘चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा!’’
माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!
(रंग माझा वेगळा)
![]() |
| रंग माझा वेगळा कविता |
रंग माझा वेगळा रसग्रहण . खालील ओळींचे रसग्रहण करा .
रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा
गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा !
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे ;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा !
राहती माझ्यासवें ही आसवें गीतांपरी ;
हे कशाचे दु : ख ज्याला लागला माझा लळा !
कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा !
समाजातील अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला मी कलंदर माणूस आहे . हे विचार रंग माझा वेगळा ' या गझलमध्ये सुरेश भट यांनी मांडले आहेत . आयुष्यात झालेली फसवणूक न जुमानता माणुसकीची बांधिलकी पत्करलेला मी एक सृजनात्मा आहे , असे कवींनी म्हणायचे आहे .
उपरोक्त ओळींमध्ये कवी असा भाव मांडतात की सान्या रंगात रंगून मी वेगळा आहे . गुंत्यात अडकून न पडता मी बंधनमुक्त आहे . माझे व्यक्तिमत्त्व अनोखे आहे . कशा कुठून सुखाच्या सावल्या आल्या , पण या सुखाच्याही झळा लागणारा मी संवेदनशील माणूस आहे . माझ्या सोबतीला माझे अश्रू आहेत म्हणून सामाजिक दुःखाची मला माया लागली . जगण्याचे भान मला कधीतरी आले ; पण आयुष्यात फसवणूक खूप झाली . विश्वासघात झाला ; पण मी प्रेरक व माणुसकीचे विचार घेऊन उगवणारा सूर्य आहे .
भाषिक वैशिष्ट्ये :
या कवितेत गझल हे मात्रावृत्त आहे . अंत्य यमकाचा रदिफ या रचनेत ठळकपणे वापरला आहे . ' मतला धरून यामध्ये सहा शेरांची ( रेखो ) मांडणी केली आहे . त्यामुळे आशय गोळीबंदपणे साकार होतो . ' सावल्याच्या झळा , दुःखाचा लळा , मध्यरात्रीचा सूर्य इत्यादी यातील प्रतिमा वेगळ्या व नवीन आहेत . ओजस्वी शब्दकळा व शब्दांची ठोस पक्कड यांमुळे ही गझल रसिकांना आवाहक वाटते .
- सुप्रसिद्ध कवी, पत्रकार, संपादक. काही काळ वृत्तपत्रात वार्ताहर व साप्ताहिक ‘बहुमत’चे संपादक. ‘रूपगंधा’, ‘रंग माझा
- वेगळा’, ‘एल्गार’, ‘झंझावात’ या संग्रहांनी त्यांच्या कवितांचे वेगळेपण आणि गझलकार म्हणून स्थान निश्चित केले. त्यांचे खरे सामर्थ्य
- त्यांच्या राजकीय-सामाजिक आशयाच्या कवितांतून जाणवते. माणसांचा दुटप्पी व्यवहार, स्वार्थ, ढोंगीपणा, लाचारी, समाजातील
- मूल्यहीनता, ‘मी’ ची समाजाने केलेली मानहानी यांविषयीचा प्रखर संताप ते व्यक्त करतात. प्रेमकवितेतील त्यांची मृदू व हळूवार
- शब्दकळाही कधीकधी तीक्ष्ण, धारदार व उपरोधिक बनते. ‘गझल’ या रचनाबंधाचा निष्ठापूर्वक स्वीकार व दृढनिश्चयी प्रसार हे सुरेश
- भट यांचे काव्यपरंपरेतील खरे योगदान. ‘गझल’ हा रचनाबंध लोकप्रिय करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
‘रंग माझा वेगळा’ या अत्यंत गाजलेल्या गझलेत आपणाला गझलकाराच्या अगदी वेगळ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख
होते. सगळ्या गुंत्यात गुंतूनही आपला पाय मोकळा ठेवणाऱ्या कलंदर व्यक्तिमत्त्वाला येणारे अनुभवही जगावेगळेच असतात. एरव्ही सर्वांना उन्हाच्या झळा लागतात; परंतु अशा जगावेगळ्या माणसाला सावलीच्याही झळा लागतात. दु:खाचा अनुभव तर नेहमीचाच असतो
परंतु कधी काळी मिळणारे सुखही अशाप्रकारे मिळते, की त्याने आनंद वाटण्याऐवजी दु:खच वाटते. त्यामुळे गझलकाराला वाटत राहते, की जगण्यास सुरुवात करतानाच आयुष्याने आपला विश्वासघात केला आहे; परंतु अशाही परिस्थितीत दु:खांचा हसतमुखाने स्वीकार करत गेल्यामुळे दु:खांनाही माझा लळा लागला असा गझलकाराचा अनुभव आहे. त्याने स्वत:ला ‘माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य’ म्हटले आहे. ज्यांचे आयुष्य नैराश्य, अंधकाराने व्यापलेले आहे, त्यांच्यासाठी पेटून उठणारा मी सूर्य आहे असे तो जेव्हा नमूद करतो
तेव्हा त्याची प्रखर सामाजिक बांधिलकी दिसून येते. ‘सावल्यांच्या झळा’, ‘दु:खाचा लळा’, ‘मध्यरात्री हिंडणारा सूर्य’ यांसारख्या परस्परविरोधी भावच्छटांमुळे अर्थाच्या दृष्टीने गझल वेगळ्या उंचीवर पोहोचते. अगदी योग्य ठिकाणी येणारे यमक, अनुप्रास यामुळे गझलेला अप्रतिम गेयता लाभली आह
Class 12th, Marathi, कविता 6–रंग माझा वेगळा/Rang Maza Vegla(कृती व रसग्रहण)
अनुक्रमणिका / INDIEX
| पाठ कविता | स्वाध्याय LINK |
|---|---|
| 01: वेगवशता | Click Now |
| 02: रोज मातीत | Click Now |
| 03: आयुष्य... आनंदाचा उत्सव | Click Now |
| 04: रे थांब जरा आषाढघना | Click Now |
| 05: वीरांना सलामी | Click Now |
| * आत्मविश्वासासारखी शक्ती नाही | Click Now |
| 06: रंग माझा वेगळा | Click Now |
| 07: विंचू चावला | Click Now |
| 08: रेशीमबंध | Click Now |
| 09: समुद्र कोंडून पडलाय | Click Now |
| 10: दंतकथा | Click Now |
| 11: आरशातली स्त्री | Click Now |
| 12: रंगरेषा व्यंगरेषा | Click Now |
| * जयपूर फूटचे जनक | Click Now |
![रंग माझा वेगळा कविता 12वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ] रंग माझा वेगळा कविता 12वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgNIxo99A9depQIKcUV9hKgCdTezt3pimvVWmIKbz1g_p9GUsPweZ1iaJd4EeGaHSgATDfv2UQEYToGYbrUa8xOwridFLQT_iZ0Y4nDwbdcSK721cOmVUulYeHDfHQEi1x-NsQ587nu2zpi/s16000-rw/%25E0%25A4%25B0%25E0%25A4%2582%25E0%25A4%2597+%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25BE%25E0%25A4%259D%25E0%25A4%25BE+%25E0%25A4%25B5%25E0%25A5%2587%25E0%25A4%2597%25E0%25A4%25B3%25E0%25A4%25BE+%25E0%25A4%2595%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A4%25E0%25A4%25BE+12%25E0%25A4%25B5%25E0%25A5%2580+%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A0%25E0%25A5%2580+%255B+%25E0%25A4%2595%25E0%25A5%2583%25E0%25A4%25A4%25E0%25A5%2580+%25E0%25A4%25B8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A7%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AF+%25E0%25A4%25B5+%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25B8%25E0%25A4%2597%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25B9%25E0%25A4%25A3.jpg)
![रंग माझा वेगळा कविता 12वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ] रंग माझा वेगळा कविता 12वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjK7kOqUcnauldJf4FdlMDjiTufpr9u2Uz7DYCcexD0VfDDYyrq5dCxR1kl8XesnoaanSPhem7-NrRzHBuk8JWJVUhlPPUVZjQyZa4BeDEaJqfY0DOcHffubO5f0bSYzN7StQaBMIhVV3T4/s16000-rw/%25E0%25A4%25B0%25E0%25A4%2582%25E0%25A4%2597+%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25BE%25E0%25A4%259D%25E0%25A4%25BE+%25E0%25A4%25B5%25E0%25A5%2587%25E0%25A4%2597%25E0%25A4%25B3%25E0%25A4%25BE+%25E0%25A4%2595%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A4%25E0%25A4%25BE+12%25E0%25A4%25B5%25E0%25A5%2580+%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A0%25E0%25A5%2580+%255B+%25E0%25A4%2595%25E0%25A5%2583%25E0%25A4%25A4%25E0%25A5%2580+%25E0%25A4%25B8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A7%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AF+%25E0%25A4%25B5+%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25B8%25E0%25A4%2597%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25B9%25E0%25A4%25A3+%255D.jpg)