बहु असोत सुंदर संपन्न कीं महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।धृ.।।
गगनभेदि गिरिविण अणु नच जिथें उणें
आकांक्षांपुढति जिथें गगन ठेंगणें
अटकेवरि जेथील तुरंगिं जल पिणें
तेथ अडे काय जलाशयनदांविणें?
पौरुषासि अटक गमे जेथ दु:सहा ।।१।।
प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरें
सद्भावांचींच भव्य दिव्य आगरें
रत्नांवा मौक्तिकांहि मूल्य मुळिं नुरे
रमणीची कूस जिथें नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचें शीलहि उजळवि गृहा गृहा ।।२।।
नग्न खड्ग करिं, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेंही शौर्य मावळे
दौडत चहुंकडुनि जवें स्वार जेथले
भासति शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा ।।३।।
विक्रम वैराग्य एक जागिं नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मयावहा ।।४।।
गीत मराठ्यांचे श्रवणीं मुखीं असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि देत अंतरी ठसो
वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्ममर्म मनिं वसो
देह पडो तत्कारणिं ही असे स्पृहा ।।५।।
बहु असोत सुंदर काव्यानंद - 12वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
समीक्षक, विनोदी लेखक, कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार. महाविद्यालयात शिकत असतानाच ते समीक्षेकडे वळले. विविध वाङ्मयप्रकारांचे लेखन करत असताना त्यांचे समीक्षणात्मक लेखन सुरूच होते.कोल्हटकर यांची प्रतिभा बहुमुखी होती. त्यांनी मराठी नाटकाला नवे, स्वतंत्र रंगरूप दिले व त्याबरोबरच रूढींच्या नावाखाली चालणाऱ्या हास्यास्पद गोष्टींविषयी विनोदी लेखही लिहिले. विनोदाचा शस्त्राप्रमाणे वापर व कालातीत असा शुद्ध विनोद ही त्यांच्या विनोदाची वैशिष्ट्ये. ‘दुटप्पी की दुहेरी’, ‘शामसुंदर’ या कादंबऱ्या, ‘गीतोपायन’ हा काव्यसंग्रह, आत्मवृत्त, काही कथा इत्यादी वाङ्मय निर्मिती.
बहु असोत सुंदर काव्यानंद |
‘बहु असोत सुंदर संपन्न कीं महा’ ही त्यांची काव्यरचना ‘महाराष्ट्र गीत’ म्हणून अतिशय लोकप्रिय आहे. द्वितीय महाराष्ट्र कविसंमेलन, पुणे तसेच बारावे महाराष्ट्र साहित्य संमेलन, पुणे यांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. कवीने या गीतात महाराष्ट्र भूमीच्या अनेकविध वैशिष्ट्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.
उत्तुंग पर्वतरांगांमध्येवसलेला, गगनाला गवसणी घालणाऱ्या आकांक्षा बाळगणारा महाराष्ट्र आम्हांला सर्वांत प्रिय आहे, असे गौरवपूर्ण उद्गार या गीतात काढले आहेत. अंत:करणाचे औदार्य, सद्गुणांची संपदा आणि नररत्नांची खाण असणारा महाराष्ट्र आम्हांला अभिमानास्पद आहे, हे कवीने अतिशय ओजस्वी वाणीत नमूद केले आहे.
पराक्रम, भक्ती आणि वैराग्य या गोष्टी एकाच ठिकाणी आढळणारा प्रदेश ही महाराष्ट्राची वेगळी ओळख या गीतातून करून दिली आहे. अशा प्रिय महाराष्ट्रात मराठी भाषेला लोकव्यवहारात गौरवाचे स्थान प्राप्त व्हावे; तसेच
महाराष्ट्राच्या थोरवीचे मर्म सर्वांच्या मनात ठसावे अशी अपेक्षा कवीने व्यक्त केली आहे.
बहु असोत सुंदर काव्यानंद - 12वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
अनुक्रमणिका / INDIEX
पाठ कविता | स्वाध्याय LINK |
---|---|
01: वेगवशता | Click Now |
02: रोज मातीत | Click Now |
03: आयुष्य... आनंदाचा उत्सव | Click Now |
04: रे थांब जरा आषाढघना | Click Now |
05: वीरांना सलामी | Click Now |
* आत्मविश्वासासारखी शक्ती नाही | Click Now |
06: रंग माझा वेगळा | Click Now |
07: विंचू चावला | Click Now |
08: रेशीमबंध | Click Now |
09: समुद्र कोंडून पडलाय | Click Now |
10: दंतकथा | Click Now |
11: आरशातली स्त्री | Click Now |
12: रंगरेषा व्यंगरेषा | Click Now |
* जयपूर फूटचे जनक | Click Now |