श्री दत्त महाराज - दत्त बावनी दत्त स्तुती

Datta Bavani | दत्त बावनी - श्री दत्त महाराज


दर गुरुवारी, एकदा असे ५२ गुरुवार जर दत्त बावनी श्रद्धेने म्हटली तर सर्व
रोगांचा नाश होतो.


जय योगीश्वर दत्त दयाळ, तुज एक जगमां प्रतिपाळ
अत्र्यनसूया करी निमित्त, प्रगट्यो जगकारण निश्चित
ब्रह्मा-हरि-हरनो अवतार, शरणागतनो तारणहार
अंतर्यामी सत् चित् सुख, बहार सद्गुरू द्विभुज सुमुख...४

झोळी अन्नपूर्णा कर मांड, शांती कमण्डल कर सोहाय
क्यांय चतुर्भुज षड्भुज सार, अनंतबाहू तू निर्धार
आव्यो शरणे बाळ अजाण, उठ दिगंबर चाल्या प्राण
सूणी अर्जुन केरो साद, रीझ्यो पूर्वे तू साक्षात् ....८

दीधी ऋद्धी सिद्धी अपार, अंते मुक्ती महापद सार
कीधो आजे केम विलंब, तुज विण मुजने ना आलंब
विष्णुशर्म द्विज तायो एम्, जम्यो श्राद्धमां देखी प्रेम
जंभदैत्यथी त्र्यास्या देव, कीधी म्हेर तें त्यां ततखेव...१२

विस्तारी माया दितिसुत, इन्द्रकरे हणाव्यो तूर्त
एवी लीला कई कई शर्व, कीधी वर्णवे को ते सर्व
दोड्यो आयु सुतने काम, कीधो एने ते निष्काम
बोध्या यदुने परशुराम, साध्यदेव प्रल्हाद अकाम...१६

एवी तारी कृपा अगाध, केम सुणे ना मारो साद
दोड अंत ना देख अनन्त, मा कर अधवच शिशुनो अंत
जोई द्विजस्त्री केरो स्नेह, थयो पुत्र तू निःसंदेह
स्मर्तृगामी कलितार कृपाळ, तायो धोबी छेद गमार....२०

पेटपीडथी तान्यो विप्र, ब्राह्मण शेठ उगायो क्षिप्र
करे केम ना मारी व्हार, जो आणीगम एकज वार
शुष्क काष्ठने आण्यां पत्र, थयो केम उदासीन अत्र?
जर्जर वंध्या केरां स्वप्न, कर्यां सफळ तें सुतनां कृत्स्न...२४

करी दूर ब्राह्मणनो कोढ, कीधा पूरण एना कोड
वंध्या भेस दूझवी देव, हर्षु दारिद्रय तें ततखेव
झालर खाई रीझ्यो एम्, दीधो सुवर्णघट सप्रेम
ब्राह्मणस्त्रीनो मृत भरथार, कीधो सजीवन तें निर्धार....२८

पिशाच पीडा कीधी दूर, विप्रपुत्र उठाड्यो शूर
हरी विप्रमद अंत्यज हाथ, रक्ष्यो भक्त त्रिविक्रम तात
निमेषमात्रे तंतुक एक, प्होचाडयो श्रीशैले देख
एकीसाथे आठ स्वरूप, धरी देव बहुरूप अरूप...३२

दत्त बावनी Datta Bavani  दत्त बावनी - श्री दत्त महाराज

संतोष्या निज भक्त सुजात, आपी परचाओ साक्षात्
यवनराजनी टाळी पीड, जातपातनी तने न चीड
रामकृष्णरूपे तें एम, कीधी लीलाओं कई तेम
तार्यां पत्थर गणिका व्याध, पशु पंखी पण तुजने साध...३६

अधम ओधारण तारूं नाम, गातां सरे न शांशां काम
आधी व्याधी उपाधी सर्व, टळे स्मरणमात्रथी शर्व
मूठ चोट ना लागे जाण, पामे नर स्मरणे निर्वाण
डाकण शाकण भैंसासुर, भूत पिशाचो जंद असुर...४०

नासे मूठी दइने तूर्त, दत्तधून सांभाळता मूर्त
करी धुप गाओ जे एम्, दत्तबावनी आ सप्रेम
सुधरे तेना बन्ने लोक, रहे न तेने क्यांये शोक
दासी सिद्धि तेनी थाय, दुःख दारिध्र तेनां जाय....४४

बावन गुरुवारे नित नेम, कर पाठ बावन सप्रेम
यथावकाशे नित्य नियम, तेने कदि न दंडे यम
अनेक रूपे एज अभंग, भजतां नडे न माया रंग
सहस्र नामे नामी एक, दत्त दिगंबर असंग छेक...४८

वंदु तुजने वारंवार, वेदश्वास तारा निर्धार
शाके वर्णवतां ज्यां शेष, कोण रांक हं बहकृत वेश
अनुभव तृप्तिनो उद्गार, सूणी हसे ते खाशे मार
तपसी तत्त्वमसि ए देव, बोलो जय जय श्री गुरुदेव...५२
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।


दत्त स्तुती - श्री दत्त महाराज


संकटाने विषण्णता आल्यावर रोज झोपताना दत्त स्तुती एकदा अशी
१२ दिवस म्हणावी. भक्तांचे दुःख जाते.

दत्त बावनी Datta Bavani | दत्त बावनी - श्री दत्त महाराज



यती रूप दत्तात्रया दंडधारी । पदी पादुका शोभती सौख्यकारी ।।
दयासिंधू ज्याची पदे दुःखहारी । तुम्हावीण दत्ता मला कोण तारी ।।१।।

पदे पुष्करा लाजवितो जयाची । मुखाच्या प्रमें चंद्र मोहूनी याची ।।
घडो वास येथे सदा निर्विकारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।२।।

सुनीट असती पोटऱ्या गुल्फ जानू । कटीं मौंजी कौपीन ते काय बायूँ ।।
गळां मालिका ब्रह्मसूत्रासि धारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।३।।

गळां वासुकीभूषणें रूंडमाळा । टिळा कस्तुरी केशरी गंध भाळी।
जयाची प्रभा कोटीसूर्यासी हारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।४।।

जटाभार माथां प्रभा कुंडलांची । त्रयास्ये भुजा शास्त्र सायूध साची ।
त्रिशूळ माळादिक छाटीधारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।५।।

दत्त स्तुती - श्री दत्त महाराज


कली पातला पातका वाढवाया । तयाने जनां मोहिलें गांढ वाया।
जगी अवतरे दुःखहरा असुरारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।६।।

अनसूया सत्व हरावयासी । त्रिमूर्ती जातां करि बाळ त्यांसी ।।
निजे पालखी सर्वदा सौख्यकारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।७।।

प्रसिद्ध असती क्षेत्र तीर्थे तयांचा । कली पातल्या जाहला लोप साचा ।।
करी तत्प्रसिद्धी मिषे ब्रह्मचारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।८।।

मुखें वेद नीचाचिया बोलविले । श्रीशैल्या क्षणे तंतुकालागि नेलें।
सुदेही करी विप्रकुष्ठा निवारीं । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।९।।

दरिद्रे बहू कष्टला विप्र त्यासी । क्षणे द्रव्य देऊनि संतोषवीसी ।।
दिला पुत्र वंध्या असुनी वृद्ध नारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।१०।।

दत्त स्तुती - श्री दत्त महाराज


मनी इच्छि विप्रकै व्हाया अन्नदान । असें जाणुनी कौतुका दावी पूर्ण ।।
करी तृप्त लेशान्निं जो वर्ण चारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।११।।

विलोकूनिया शूद्रभक्ती मनीं ती । कृपे दीधले पीक अत्यंत शेती ।।
करी काशीयात्रा कुमारा अधारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।१२।।

नृपस्थानी रंकासही स्थापियेलें । मदे व्यापिलें विप्र निर्गवे केले
कृपादृष्टीने स्फोटकातें निवारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।१३।।

द्विजाच्या घरी घेवडा वेल ज्याने । मुळापासुनी तोडिला तो तयानें ।।
दिली संतती संपदा दुःखहारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।१४।।

शुष्कासुनी काष्ठही वृक्ष केला । गतप्राण तो पुत्र सजीव केला
औदुंबरी आवडे वास भारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥१५॥

त्रिलोकीं अशी कीर्ती केली अगण्य । अगम्यागमा ख्यातीही ज्याची धन्य ।।
स्मरे भक्तिनें तद्भवदुःखहारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।१६।।

अनंतावधी जाहले अवतार । परी श्रीगुरूदत्त सर्वांत थोर ।।
त्वरें कामना कामिकां पूर्णकारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।१७।।

त तीर्थ दानें जपादी करिती । स्वहितार्थ ते दैवताला स्तवीती ।।
परी केलिं कर्मे वृथा होती सारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।१८।।

सदा आससी दत्त सर्व कामा । त्वरे भेटसी टाकुनी सर्व कामा ।।
मना माझिया आवरी दैन्यहारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।१९।।

मनी आवडी गायनाची प्रभूला । करी सुस्वरें नित्य जो गायनाला ।।
तयाच्या त्वरे संकटाते निवारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।२०।।
दत्त स्तुती - श्री दत्त महाराज


असे क्षेत्र काशी शिवाची पुरी ते । प्रभाती करीं स्नान गंगातीरी ते ।।
करी कर्विरी अहिं भिक्षार्थ फेरी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।२१।।

निशी जाय निद्रार्थ मातापुरासी । सर्वे कामधेनू वसे तेजराशी ।।
तसे श्वानरूपी सवें वेद चारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।२२।।

जनां मुक्तीचा मार्ग दावावयासी । कळाया स्वरूपप्रचिती तयांसी ।।
त्रिलोकी करी जो निमिषार्थी फेरी। तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥२३॥

असें रूप ठावे तुझें असतांना। वृथा हिंडलो दैवतें तीर्थ नाना ।
परि शेवटी पायी आलो भवारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।२४।।

जधी जन्मलों नेणुं दुःखासुखाला । अयुर्दाय अज्ञानी तो व्यर्थ गेला॥
कळू लागतां खेळलो खेळ भारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।२५।।

तृतीयांश आयुष्य ऐसेंची गेले । परी नाही त्वन्नाम मी आठवीलें ।।
अतां यौवन प्राप्त झाले अपारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।२६।।

परद्रव्य कांता पराची पाहातां । स्मरादी रिपू ओढिती मानसाऽतां ।।
कसा ध्यावू तूतें मधूकैटभारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।२७।।

पुढे वृद्धता प्राप्त होईल वाटे । तिच्या यातना देखतां चित्त फाटे ।।
कधी भेटसी केवि हो चक्रधारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।२८।।

अयुष्यार्ध निद्रार्णवामाजि गेलें । पणा तीन शेषांत ते जाण केले ।।
तयांनीं मना गोविलें दुःख भारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।२९।।

अशा घोर मायासमुद्रा पाहातां । भिवोनी पदीं पातलो तुमच्याऽतां ।।
तरी क्लेश चिंतादि दुःखासि हारीं । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।३०।।



त्यजा मत्त पाखंड ते सज्जना हो । धरा मानसीं भक्ती निष्ठा दृढा हो ।।
भवांबूधीच्या नेइ तो पैलपारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।३१।।

स्वतः घेतला दाखला सद्गुरूचा । तसा घेती ते आणि घेतील साचा ।।
मनःकामना होतसे पूर्ण सारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।३२।।

करी पाठ जो का स्तुती हो त्रिकाळा । तयाच्या प्रतापे पडे भीती काळा ।।
गुरू सर्व दारिद्म दुःखां निवारी । तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ।।३३।।


Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post