श्री दत्त महाराज - दत्तात्रेय स्तोत्रे प्रार्थना

 श्री दत्त महाराज ॥ दत्तात्रेय स्तोत्रे॥ 


* इंदुकोटी - श्री दत्त महाराज


संसारातील चिंता कमी करून आरोग्य देणारे स्तोत्र
।। गुरूचरित्रकार सरस्वती गंगाधरकृत दत्तात्रेय स्तोत्र ।।

इंदुकोटी तेजकिरण सिंधु भक्तवत्सलम् ।
नंदनात्रिसुनु दत्त इंदिराक्ष श्री गुरुम् ।
गंधमाल्य अक्षतादी वृंददेववंदितम् ।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमाम् ।।१।।

मायापाश अंधःकार छायादूर भास्करं ।
आयताक्ष पाहि श्रीयावल्लभेशनायक
सेव्य भक्तवृंद वरद भूयो भूयो नमाम्यहम् ।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमाम् ।।२।।

चित्तजादी वर्ग षट्क मत्तवारणां कुशम्
तत्त्वसार शोभितात्म दत्त श्रिया वल्लभम्
उत्तमावतार भूतकर्तु भक्तवत्सलम् ।
वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहिमाम् ।।३।

व्योम आप वायु तेज भूमी कर्तुमीश्वरम् ।
कामक्रोध मोहरहित सोमसूर्य लोचनम् ।
कामितात दातृ भक्त कामधेनु श्रीगुरुम् ।
वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहिमाम् ।।४।।

पुंडरिक आयताक्ष कुंडलेंदू तेजसम् ।
चंडदुरित खंडनार्थ दंडधारी श्रीगुरूम ।
मंडलिक मौलिमार्तंड भासिताननम् ।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमाम् ।।५।।

वेदशास्त्र स्तुत्य पाद आदिमूर्ती श्रीगुरूम ।
नादबिंदू कलातीत कल्पपाद सेव्ययम् ।
सेव्यभक्त वृंदवरद भूयो भूयो नमाम्यहम् ।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमाम् ।।६।।

अष्टयोग तत्त्वनिष्ठ तुष्ट ज्ञानवारिधिम् ।
कृष्णावेणितीर वास पंचनदी संगमम् ।
कष्टदैन्य दूरभक्त तुष्टकाम्य दायकम् ।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमाम् ।।७।।

नारसिंह सरस्वतीश नामाष्टक मौक्तिकम् ।
हारकृत्य शारदेन गंगाधराख्यात्मजं ।
धारणीक देवदीक्ष गुरुमूर्ती तोषितम् ।
परमात्मानंदश्रिया पुत्रपौत्र दायकम् ।।८।।

नारसिंह सरस्वतीश अष्टकंच यः पठेत ।
घोरसंसार सिंधुतारणाख्य साधनम् ।
सारज्ञान दीर्घआयुरारोग्यादी संपदम् ।
चारूवर्ग काम्यलाभ नित्यमेव यः पठेत ।।९।।

* अपराधक्षमापनस्तोत्र - ( श्री दत्त महाराज )

श्री दत्त महाराज - दत्तात्रेय स्तोत्रे प्रार्थना


आपल्या हातून मोठा अपराध घडला असता
त्याच्या क्षमासाठी रोज १ प्रमाणे १२ पाठ करावेत.
रसज्ञा वशा तारकं स्वादु लभ्यं गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त ।
क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त ।।१।।

वियोन्यन्तरे दैवदााद्विभो प्राग् गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त ।
क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त ।।२।।
मया मातृर्गर्भस्थितिप्राप्तकष्टाद् गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त ।
क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त ।।३।।

मया जातमात्रेण संमोहितेन गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त ।
क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त ।।४।।
मया क्रीडासक्तचित्तेन बाल्ये गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त ।
क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त ।।५।।

मया यौवनेऽज्ञानते भोगतोषान् गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त ।
क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त ।।६।।
मया स्थाविरेऽनिघ्न सर्वेन्द्रियेण गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त ।।
क्षमस्वापराध क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त ।।७।।

हृषीकेश में वाङ्मनः कायजातं हरे ज्ञानतोऽ ज्ञानतो विश्वसाक्षिन् ।।
क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त ।।८।।
स्मृतो ध्यात आवाहितोऽस्यर्चितो वा न गीतः स्तुतो वंदितो वा न जप्तः ।
क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त ।।९।।

दयाब्धिर्भवाट्टङ्न सागाश्च मादृगभवत्याप्तमन्तोर्भवात्मे शरण्यः ।
यथालम्बनं भूी भूनिः सृताङ्ग्रेरिती प्रार्थितं दत्तशिष्येण सारम् ।।१०।।
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ।

दत्तप्रीतीकारक स्तोत्र ।।

* घोरसंकटनिवारणकारक  - ( श्री दत्त महाराज )


श्रीमत् प.पू. वासुदेवानंद सरस्वतीविरचित हे स्तोत्र घोर संकटात सापडलेल्या भक्तांना संकटातून वाचविते. याचे सकाळी किंवा संध्याकाळी रोज देवापुढे निरांजन व उदबत्ती लावून रोज १ पाठ याप्रमाणे १२ पाठ करावेत. उदबत्तीचा अंगारा स्वत:ला व घरातील सर्वांना लावून इतर अंगारा घरभर फुकावा. संकट जास्त तीव्र असेल तर याचे १०८ पाठ करावेत.

श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव । श्रीदत्ताऽस्मान् पाहि देवाधिदेव ।।
भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते। घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।।१।।
त्वं नो माता त्वं पिताऽऽप्तोऽधिपस्त्वम् । त्राता योगक्षेमकृत्सदुरूस्त्वम् ।।
त्वं सर्वस्वं नोऽप्रभो विश्वमूर्ते। घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।।२।।

पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं । भीती क्लेशं त्वं हराऽशुत्वदन्यम् ।।
त्रातारं नो वीक्ष ईशास्तजूते। घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।।३।।
नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता । त्वत्तो देव त्वं शरण्योऽकहर्ता ।।
कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।।४।।

धर्मे प्रीतिं सन्मती देवभक्ती । सत्सङ्गाप्ति देही भुक्तिं च मुक्तिम्
भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।।५।।
श्लोक पञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनम् ।।
प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् ।।६।।

।। इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्द
सरस्वतीविरचितं अघोरकष्टोद्धरण स्तोत्रं सम्पूर्णम् ।।
हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असून त्यात प्रचंड ऊर्जा सामावलेली आहे. रामरक्षेप्रमाणे या
हा करणारा आहे.

* श्री दत्त प्रार्थना स्तोत्र  - ( श्री दत्त महाराज )


सर्व दोष नाहीसे करून चित्ताला आनंद देणारे स्तोत्र
श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः

समस्त दोष शोषणं स्वभक्तचित्त तोषणं
निजाश्रीत प्रपोषणं यतीश्वराग्रय भूषणम् ।।
त्रयीशिरो भूषणं प्रदर्शितार्थ दूषणं ।
भजे ऽ त्रिजं गतेषणं विभुं विभूती भूषणम् ।।१।।  

समस्त दोष नाहीसे करणारा, आपल्या भक्तांच्या चित्ताला आनंद देणारा,
आपल्या आश्रिताचे उत्तम पालन करणारा, वेदवाक्ये हीच ज्याची भूषणे आहेत व
पुरुषार्थाची अनित्वादिदूषणे दाखविणारा, ज्ञान-वैराग्य-धर्म-योगेश्री व पूर्ण शक्ती या
ऐश्वर्याने नटलेल्या श्री दत्त परमात्म्याचे मी भजन करीत आहे.
समस्त लोक कारणं समस्त जीव धारणं ।
समस्त दृष्टमारणं कुबुद्धी शक्ती जारणम ।
भजदथया द्रि दारणं भजत्कुकर्म वारणं ।
हरि स्वभावतारणं नमामी साधु चारणम् ।।२।।

सर्व लोकांना उत्पादक, सर्व जिवांचा पालक, सर्व दृष्टांचा संहारक, दुष्ट बुद्धी
शक्तीचा नाशक, भजकांचे भय हारक, पर्वत फोडणारा, भक्तांची दृष्ट कर्मे निवारणारा व
त्यांना तारणारा, सदाचार संपन्न श्रीहरीस मी नमस्कार करतो.
नमाम्यहं मुदास्पदं निवारिताखिला पदं ।
समस्त दुःखवतापदं मुनीन्द्रीवन्द्य ते पद्म ।।
यदंचित्ता तटा मदं विहाय नित्य संमंदं ।
प्रयान्ति नैव ते भिदं मुहूर्म जन्नि चाविदम् ।।३।।

पूर्णानंद निवास, सर्वांची आपत्ती दूर करणारा, सर्वांची दुःखे संपविणारा, अशा
मुनी श्रेष्ठांनाही वंदनिय अशा दत्ता, तुझ्या चरणी मी नमस्कार करतो. मनात ज्या
ईश्वराला धारण करणारे साधू पुरुष स्वतःचा अहं सोडून नित्य आनंद स्थितीला पोचतात
व कोणतीही विषयता व अज्ञान यांना स्वीकारीत नाहीत.
प्रसीद सर्व चेतने प्रसीद बुद्धीचेतने ।
स्वभक्त हृन्निकेतने सदाम्ब दुःख शातने ।
त्मवेव मे प्रसूर्मता, त्वमेव मे प्रभोपिता ।
त्वमेव मे ऽ खिलेहितार्थ दोऽखिलाकतोऽ विता ||४||

हे बुद्धीप्रेरक, सर्व प्रकाशक, स्वभक्तांच्या हृदयात राहणाऱ्या व त्यांची दुःखे
निवारण करणाऱ्या माते, तूं माझ्यावर प्रसन्न हो, हे प्रभो तूच माझी माता पिता आहेस सर्व
इष्ट पुरुषार्थ देणारा व सर्व दुःखातून रक्षण करणाराही तूच आहेस.

* शत्रुनाशकर श्री दत्तात्रेयस्तोत्र  - ( श्री दत्त महाराज )


देवर्षी नारद विरचित हे स्तोत्र शत्रूचा नाश करणारे, काम-क्रोधलोभ-मोह-मत्सर आदी शत्रूचे नाशक असून भक्ताला स्थूलाकडून सूक्ष्माकडे
नेणारे आहे. हे स्तोत्र सकाळी स्नान करून देवापुढे निरांजन, उदबत्ती लावून याचे
दररोज १ असे १२ पाठ करावेत. उदबत्तीचा अंगारा स्वतःला व घरातील इतर
कुटुंबीयांना लावावा. याच्या नित्य पठणाने भक्ताला ज्ञान-विज्ञान प्राप्त होऊन
श्री दत्तात्रेयांची कृपा होते.

श्री दत्त हे कृपावंत, स्मर्तगामी असे दैवत आहे. श्री दत्तात्रेय ज्याच्या
त्याच्या भक्तीप्रमाणे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. दत्तात्रेयांचे गुणगान
करणारी जी अनेक स्तोत्रे आहेत त्यापैकी नारद पुराणातील महर्षि नारदांनी
सांगितलेले “श्री दत्तात्रेय स्तोत्र" हे अत्यंत प्रभावी व सर्वश्रेष्ठ आहे. ते त्याच्या
अर्थासहित खालीलप्रमाणे

श्री गणेशाय नमः ।। श्रीगुरवे नमः ।।
जटाधरं पांडुरंग शूलहस्तं कृपानिधिम् ।।
सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे ।।१।।

ज्याने अंगावर जटा धारण केल्या असून ज्याची अंगकांती पिवळी असून
ज्याच्या हातात त्रिशूल आहे व तो कृपानिधी आहे. अशा कृपेचा सागर व सर्व रोगहारक
दत्तात्रेय देवाची मी भक्ती करतो.
अस्य श्रीदत्तात्रेयस्तोत्रमंत्रस्य ।। भगवान्नारद ऋषिः ।। अनुष्टुभ छंदः ।।
श्रीदत्तः परमात्मा देवता || श्रीदत्तप्रीत्यर्थे जपे विनियोगः ।।
या दत्तात्रेय मंत्राचा कर्ता भगवान नारद असून यातील श्लोक अनुष्टुभ छंदात आहेत. या
श्लोकाची देवता दत्तात्रेय असून, त्यांनी आपल्यावर प्रसन्न व्हावे यासाठीच या पाठात
विनियोग करण्यात आला आहे
जगदुत्पत्तिकर्त्रे च स्थितिसंहार हेतवे ।।
भवपाशविमुक्ताय दत्तात्रेय नमोऽस्तु ते ।।२।।

जगाचा उत्पत्तीकर्ता व त्याच्या नाशाला कारणीभूत व पालनकर्ता, भवबंध नाहीसा
करणाऱ्या दत्तात्रेयाला माझा नमस्कार असो
जराजन्मविनाशाय देहशुद्धिकराय च ।।
दिगंबर दयामूर्ते दत्तात्रेय नमोऽस्तु ते ।।३।।

म्हातारपण- जन्म यांचा नाश करणाऱ्या, देहास शुद्ध करणाऱ्या स्वतःला दिशाचेच वस्त्र
असून दयेची मूर्ती असणाऱ्या दत्तात्रेयाला माझा नमस्कार असो.
कर्पूरकांतिदेहाय ब्रह्ममूर्तिधराय च ।।
वेदशास्त्रपरिज्ञाय दत्तात्रेय नमोऽस्तु ते ।।४।।
कापराप्रमाणे कांतीमान देह धारण करणाऱ्या ब्रह्माच्या मूर्तीस धारण करणाऱ्या व वेदांचे
व शास्त्रांचे पूर्ण ज्ञान ठेवणाऱ्या दत्तात्रेयाला माझा नमस्कार असो.
ह्रस्वदीर्घकृशस्थूल-नामगोत्र-विवर्जित ।।
पंचभूतैकदीप्ताय दत्तात्रेय नमोऽस्तु ते ।।५।।

कधी ठेगू, कधी इंच कधी लठ्ठ तर कधी बारीक शरीर धारण करणाऱ्या नामगोत्राने
विसर्जित, केवळ पंचभुतांना दीप्तीमान करणाऱ्या दत्तात्रेयाला माझा नमस्कार असो.
यज्ञभोक्त्रे च यज्ञाय यज्ञरूपधराय च ।।
यज्ञप्रियाय सिद्धाय दत्तात्रेय नमोऽस्तु ते ॥६॥
यज्ञाची आवड असणाऱ्या व स्वतः यज्ञाचे रूप धारण करणाऱ्या यज्ञाने प्रसन्न होणाऱ्या
दत्तात्रेयाला माझा नमस्कार असो
आदौ ब्रह्मा विष्णुरत्ने देवः सदाशिवः ।।
मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तु ते ।।७।।

ज्याच्या रूपात प्रथम ब्रह्मा, मध्ये विष्णु व शेवटी शंकर रूप धारण करून तीनही
स्वरूपास एकत्र धारण करणाऱ्या दत्तात्रेयाला माझा नमस्कार असो
भोगालयाय भोगाय योगयोग्याय धारिणे ।।
जितेंद्रिय जितज्ञाय दत्तात्रेय नमोऽस्तु ते ।।८।।
सर्व भोगांचे वस्तीस्थान, भोग योग्य असा लाभ ज्याच्यापासून आहे, ज्याने इंद्रिये
जिंकली असून ज्ञानाला सुद्धा ज्याने जिंकले आहे अशा दत्तात्रेयाला नमस्कार असो
दिगंबराय दिव्याय दिव्यरूपधराय च ।।
सदोदित परब्रह्म दत्तात्रेय नमोऽस्तु ते ।।९।।

दिशारूपी वस्त्र ज्याने परिधान केले आहे, दिव्य रूप धारण करणाऱ्या, सदैव ब्रह्मस्वरूप
अशा तेजस्वी दत्तात्रेयाला नमस्कार असो.
जंबुद्वीपे महाक्षेत्रे मातापुरनिवासिने ।।
जयमान, सतां देव, दत्तात्रेय नमोऽस्तु ते ।।१०।।
जंबुद्वीपातील महान पवित्र मातापूर या ठिकाणी राहणाऱ्या व संतांमध्ये ज्यांचे जयगान
करावे अशा दत्तात्रेयांना नमस्कार असो.
भिक्षाटनं गृहे ग्रामे पात्रं हेममयं करे ।
नानास्वादमयी भिक्षा दत्तात्रेय नमोऽस्तु ते ।।११।।

सुवर्णाचे पात्र हातात घेऊन विविध चव असलेली भिक्षा घेण्यासाठी गावोगावी व
घरोघरी जाणाऱ्या दत्तात्रेयाला नमस्कार असो.
ब्रह्मज्ञानमयी मुद्रा वस्त्रमाकाशभूतले ।।
प्रज्ञानघनबोधाय दत्तात्रेय नमोऽस्तु ते ।।१२।।
ब्रह्मज्ञानयुक्त ज्ञान मुद्रेस धारण करणाऱ्या, आकाश व पृथ्वीलाच वस्त्ररूपाने धारण
करणाऱ्या श्रेष्ठतम ज्ञानयुक्त बोधमय विग्रह असणाऱ्या दत्तात्रेयाला नमस्कार असो.
अवधूत सदानंद परब्रह्मस्वरूपिणे ।।
विदेहदेहरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तु ते ।।१३।।

अवधूत वेशात सदा ब्रह्मानंदी मग्न राहणाऱ्या, परब्रह्म परमात्मा स्वरूप देह असूनही
देहातील जीवमुक्त अवस्थेत स्थित राहणाऱ्या दत्तात्रेयांना मी वंदन करतो.
सत्य रूप सदाचार सत्यधर्मपरायण
सत्याश्रय परोक्षाय दत्तात्रेय नमोऽस्तु ते ।।१४।।
साक्षात सत्याचे रूप, सदाचारी सत्य हाच ज्याचा धर्म आहे त्या सत्याच्या आश्रयाने
राहणाऱ्या दत्तात्रेयाला नमस्कार असो.
शूलहस्त गदापाणे वनमालासुकंधर ।।
यज्ञसूत्रधर ब्रह्मन् दत्तात्रेय नमोऽस्तु ते ।।१५।।

हातात शूल व गदा धारण केलेल्या वनमालेने सुशोभित खांद्याच्या, यज्ञोपवित धारण
केलेल्या ब्रह्मस्वरूप दत्तात्रेयाला नमस्कार असो.
क्षराक्षरस्वरूपाय परात्परतराय च ।।
दत्तमूर्तिपरस्तोत्र दत्तात्रेय नमोऽस्तु ते ।।१६।।
क्षर (नश्वर विश्व) आणि अक्षर (अविनाशी आत्मा) रूपाने (असणारे आणि नसणारे
अशी दोन्ही रूपे ज्याची आहेत) सर्वत्र व्याप्त, स्तोत्र पाठ केल्यावर शीघ्र मुक्ती देणाऱ्या
दत्तात्रेयाला नमस्कार असो.
दत्तविद्याढ्य लक्ष्मीश दत्तस्वात्मस्वरूपिणे ।।
गुणानिर्गुणरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तु ते ।।१७।।

सर्व विद्या प्रदान करणाऱ्या, लक्ष्मीचेही स्वामी असणाऱ्या, प्रसन्न होऊन आत्मस्वरूपच
प्रदान करणाऱ्या त्रिगुणातीत व त्रिगुणात्मक निर्गुण अवस्थेत राहणाऱ्या दत्तात्रेयाला माझा
नमस्कार असो.
शत्रूनाशकरं स्तोत्रं ज्ञान-विज्ञानदायकम् ।।
सर्वपापं शमं याति दत्तात्रेय नमोऽस्तुते।।१८।।
हे स्तोत्र शत्रूला नष्ट करणारे, शास्त्र ज्ञान व अनुभूती जन्म अध्यात्म ज्ञान दोहोंना प्रदान
करणारे आहे. या स्तोत्राचा पाठ केल्याने सर्व पापे तत्काळ नष्ट होतात. अशा स्तोत्राचे
आराध्य असलेल्या दत्तात्रेयाला माझा नमस्कार असो.
इंद स्तोत्रं महदिव्यं दत्तप्रत्यक्षकारकम् ।।
दत्तात्रेयप्रसादाच्च नारदेन प्रकीर्तितम् ।।१९।।

हे दिव्य स्तोत्र अत्यंत प्रभावी असून याच्या पाठाने दत्तात्रेयांचे साक्षात दर्शन घडते. दत्त
प्रभूच्या अनुग्रहानेच शक्ति संपन्न होऊन नारद मुनींनी या स्तोत्राची रचना केली. हे याचे
वैशिष्ट्य आहे.
।। इति श्रीनारदपुराणे श्रीनारदविरचितं दत्तात्रेयस्तोत्रं संपूर्णम् ।।

* सर्व रोग शमनार्थ स्तोत्र  - ( श्री दत्त महाराज )


श्रीमत् प.पू. श्री वासुदेवानंद सरस्वतींनी भक्तांसाठी भूत-प्रेतपिशाच्च, दारिद्य, ग्रहपीडा सर्व रोगनिवारक तसेच विषाद-बाधा-संकटेजारणमारण- मंत्र प्रयोग इत्यादींना दूर करून शांती प्राप्त करून देण्यासाठी या
स्तोत्राची रचना केली.
येता-जाता- सोवळ्यात- ओवळ्यात केव्हाही हे स्तोत्र म्हणता येते.
रोज सायंकाळी देवापुढे निरांजन उदबत्ती लावून याचे १२ पाठ करावेत. भूतप्रेतपिशाचाद्या
उदबत्तीचा अंगारा स्वतःला व घरातील सर्वांना लावावा.

दूरादेव पलायन्ते दत्तात्रेयं नमामि तम् ।।१।।
नश्यन्त्यन्येऽपि रोगाश्च दत्तात्रेयं नमामी तम् ।।३।।
यस्य स्मरणमात्रतः ।।
यन्नामस्मरणादैन्यं पापं तापश्च नश्यति ।।
भीतिग्रहार्तिदुःस्वप्नं दत्तात्रेयं नमामि तम् ।।२।।

दद्रुस्फोटककुष्ठादि महामारी विषूचिका ।।
सङ्गजा देशकालोत्था अपि साङ्क्रमिका गदाः ।।
शाम्यन्ति यत्स्मरणतो दत्तात्रेयं नमामी तम् ।।४।।
सर्पवृश्चिकदष्टानां विषार्तानां शरीरिणाम् ।।
यन्नाम शान्तिदंशीघ्रं दत्तात्रेयं नमामी तम् ।।५।।

त्रिविधोत्पातशमनं विविधारिष्टनाशनम् ।।
यन्नाम क्रूरभीतिघ्नं दत्तात्रेयं नमामि तम् ।।६।।
वैर्यादिकृतमन्त्रादिप्रयोगा यस्य कीर्तनात् ।।
नश्यन्ति देवबाधाश्च दत्तात्रेयं नमामी तम् ।।७।।

यच्छिष्यस्मरणात्सद्यो गतनष्टादी लभ्यते ।।
य ईशः सर्वतस्त्राता दत्तात्रेयं नमामी तम् ।।८।।
जयलाभयशः कामदातुर्दत्तस्य यः स्तवं ।।
भोगमोक्षप्रदस्येमं पठेद्दत्तप्रियो भवेत् ।।९।।

।। इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य
श्रीवासुदेवानन्द सरस्वतीविरचितं श्रीदत्तात्रेयस्तोत्रं संपूर्णम् ।।

* सिद्धमंगल स्तोत्र  - ( श्री दत्त महाराज )

सर्व संकटे दर करणारे स्तोत्र
श्रीमदनंत श्रीविभिषित अप्पल लक्ष्मीनरसिंह राजा ।
जयविजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्रीविजयी भव ।।
श्रीविद्याधरी राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा।
जयविजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्रीविजयी भव ।।
माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा।
जयविजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्रीविजयी भव ।।
सत्यऋषीश्वर दुहितानंदन बापनार्यनुत श्रीचरणा।
जयविजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्रीविजयी भव ।।
सविकाठकचयन पुण्यफल भारद्वाज ऋषी गोत्र संभवा ।
जयविजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्रीविजयी भव ।।
दो चौपती देव लक्ष्मी धनस्ख्या बोधित श्रीचरणा।
जयविजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्रीविजयी भव ।।
पुण्यरूपिणी राजमांब सुत गर्भ पुण्यफल संजाता।
जयविजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्रीविजयी भव ।।
सुमतीनंदन नरहरिनंदन दत्तदेवप्रभू श्रीपादा।
जयविजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्रीविजयी भव ।।
पीठिकापूर नित्यविहारा मधुमती दत्ता मंगलरूपा ।
जयविजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्रीविजयी भव ।।
(श्रीपाद श्रीवल्लभांचे हे सिद्धमंगल स्तोत्र दररोज भक्तिभावाने पठण
करणाऱ्याची सर्व संकटे दूर होऊन त्यांचे शुभमंगल होते. सर्व मनोकामना पूर्ण
होते.)

* चित्त स्थैर्यासाठी श्रीदत्तस्तोत्र  - ( श्री दत्त महाराज )


श्रीमत् प.पू. श्रीवासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबे महाराज यांनी भक्तांच्या
चित्ताला चंचलतेपासून स्थिरत्व यावे यासाठी लिहिले. चित्त अस्थिर असता
याचा रोज १ याप्रमाणे संध्याकाळी पाठ करावा. एकूण १२ पाठ करावेत.

अनसूयात्रिसंभूत दत्तात्रेय महामते।।
सर्वदेवाधिदेव त्वं मम चित्तं स्थिरीकुरू ।।१।।
शरणागतदीनार्ततारकाऽखिलकारक।
सर्वचालक देव त्वं मम चित्तं स्थिरीकुरू ।।२।।

सर्वमंगलमांगल्य सर्वाधिव्याधिभेषज् ।
सर्वसंकटहारिन् त्वं मम चित्तं स्थिरीकुरू ।।३।।
स्मर्तृगामी स्वभक्तांना कामदो रिपुनाशनः ।
भुक्तिमुक्तिप्रद : स त्वं मम चित्तं स्थिरीकुरू ।।४।।

 सर्वपापक्षयकरस्तापदैन्यनिवारणः ।।
योऽभीष्टदः प्रभुः स त्वं मम चित्तं स्थिरीकुरू ।।५।।
य एतत्प्रयतः श्लोकपंचकं प्रपठेत्सुधीः ।
स्थिरचित्तः स भगवत्कृपापात्रं भविष्यति ।।६।।

॥ इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद
सरस्वतीविरचितं श्रीदत्तात्रेयस्तोत्रं संपूर्णम् ।।

* धनधान्य सुखसंपदा देणारे श्री गुरुदेवदत्तस्तोत्र  - ( श्री दत्त महाराज )

श्रीमत् श्री पद्मनाभाचार्य स्वामीरचित व त्या संप्रदायात नित्य पाठात असलेले हे
स्तोत्र, भक्तांना धन धान्य व सुख संपदा मिळवून देणारे एक प्रभावी स्तोत्र
आहे. श्रीमत् सद्गुरू समर्थ श्रीपद्मनाभाचार्यस्वामीमहाराजकृत हे स्तोत्र
श्रीपद्मनाभस्वामी संप्रदायातील नित्य पाठातील आहे. याचा नित्य पाठ सकाळ
किंवा संध्याकाळी निरांजन, उदबत्ती देवापुढे लावून करावा. पाठानंतर अंगारा
स्वतःला व घरातील सर्वांना लावावा.

सदा प्रार्थितों स्वामी तुझ्या पदासी । नमोनी तुला वर्णितों आदरेंसी;
धरोनी करीं तारी या बाळकासी । नमस्कार माझा श्रीदत्तात्रयासी ।।१।।
मतिहीन मी दीन आहे खरा हो । परी बाळ तुजा मी माया करा हो
जसें पोटीचें लेकरू माय पोसी । नमस्कार माझा श्रीदत्तात्रयासी ।।२।।

लडिवाळ मी बाळ अज्ञान तुझें । तुझ्या कृपेनें दुःख जळेल माजें
अन्य उपाय नाहीं की निश्चयेसी । नमस्कार माझा श्रीदत्तात्रयासी ।।३।।
गणगोत बंधू पिता तूची देवा । इष्ट मित्र काही नसे अन्य हेवा
तुजवीण त्राता नसे या जिवासी । नमस्कार माझा श्रीदत्तात्रयासी ।।४।।

गुरूची लीला जो करी नित्यपाठ । स्तुती भक्तिभावें करी एकनिष्ठ
तया पुत्रप्राप्ती महाज्ञानराशी । नमस्कार माझा श्रीदत्तात्रयासी ।।५।।
जो औदुंबरी वाडिमाजी त्रिकाळ । बसूनी त्रिलोकी क्रमी सर्व काळ
तया गुरूनाथा वर्णवेना मुखेसीं । नमस्कार माझा श्रीदत्तात्रयासी ।।६।।

निजभक्तांसी दे जो राज्यासनाला । स्मरताच पळवी रोगादिकाला,
उपवेद श्वाने नमिती पदासी । नमस्कार माझा श्रीदत्तात्रयासी ।।७।
माता अनसूया पिता अत्रिनाथ । अतितीव्र गुरू हा स्वामी समर्थ;
पापताप दुःखें स्मरणेची नासी । नमस्कार माझा श्रीदत्तात्रयासी ।।८।।

म्हणे पद्मनाभ स्मरा नेम साचा । धरोनी मनी निश्चय अष्टकांचा;
धनधान्य वृद्धी सुखसंपदेसी । पावाल नमिता गुरूपादुकांसी ।।९।।

*श्री दत्तरक्षा स्तोत्र  - ( श्री दत्त महाराज )


डोक्यापासून पायापर्यंत बाहेरील व आतील अवयवांचे रक्षण व तसेच भूतप्रेत-अग्नी-जल आर्दीपासून रक्षण करणारे दत्त स्तोत्र
श्रीदत्तरक्षास्तोत्रस्य ऋषिरव्यक्त इरितः ।
छान्दोऽनुष्टुप तथैवास्य देवता दत्तयोगिराट्...।।१।।
बीजमेकाक्षरं द्रां ह्रीं शक्तीः कलीं कीलकं महत ।
धर्मार्थकाममोक्षेभ्यो विनियोगस्तु पुण्यद....।।२।।

: अथ ध्यानम् :
मालाकमंडलुरधः करपद्मयुग्मे
मध्यस्थपाणियुगले डमरुत्रिशूले, ।
यस्य स्त ऊर्ध्वकरयोः शुभशंखचक्रे
वन्दे विधीशहरिरूपममुं हि दत्तम्......।।३।।

ध्यात्वा ह्येवं सात्त्विकैश्च भावैर्नत्वा पुनः पुनः ।
मानसपूजया प्रीत्या गुरूदेवं भजाम्यहम्....।।४।।
पृथ्वीतत्त्वात्मकं गन्धं लं बीजेनार्पयाम्यहम् ।
व्योमात्मकानि पुष्पाणि हं बीजेन यथामति...।।५।।

धूपं यं वायुबीजेन दीपं रं तेजसा तथा ।
वं बीजेनामृतात्मा च नैवेद्यार्थेऽर्पितो मया ....।।६।।
नत्याद्यन्योपचाराश्च सं बीजेनार्पिताश्च ते,
सर्वार्पणबलिं दत्वा दास्ये देहं तुं मर्दये....।।७।।

दत्तात्रेय : शिरो रक्षेद् भालमत्रिसुतर्षभः
नासिकां योगिराड्रक्षेद्रक्षेन्नेत्रे ह्यनन्तद्दक्...||८||
सर्वभक्षी मुखं रक्षेदोष्ठौ रक्षेज्जनार्दन :
शारदात्मा च जिह्वां मे रक्षेदन्तान्दयानिधिः....।।९।।

केशान् वनस्पतीनाथः कौँ वाताश्ववाहनः
रक्षेद्धनुं शूलपाणी रक्षेत्कण्ठ कलानिधिः... .||१०||
नखान्नानारूपधारी वामनात्मा तथा पदे.....||१४||
स्कन्धौ खं ब्रह्मरूपात्मा मणिबन्धी कृपाम्बुधिः ।
सोमभ्राता तथा वक्षः कर्मसाक्षी यकृत पुनः।
हस्तौ हारी ह्यंगुलीश्च रक्षेदारण्यवासक.............॥११॥

कुर्याद्धदयरक्षा मे हृदयस्थो हरिः सदा......।।१२।।
विश्वम्भरो विश्वरूपो जठरं च सनातनः।
रक्षेत्कटी कामरूपो जंघे दीर्धकार : पुमान् ..... ।।१३।।
जानुन्यत्रितनूत्पन्नो गुल्फो च धनकान्तिधृक् ।
रक्षेद् गुह्यं यमः साक्षाल्लिंग प्राजापतिः स्वयम् ।
कर्मेन्द्रियाण्यकर्मा च ज्ञानी ज्ञानेन्द्रियाण्यग ॥१५॥

रक्षेन्मज्जां महामायो मेदं त्रैलोक्यमोहनः ।
मांस मेधानिधी रक्षेद्रक्तं लोहितलोचन
अस्थीन्यानंदमूर्तिश्च त्वचं तारुण्यमूर्तिमान् ।
चिरंजीवी च वीर्य मे लाला लावण्यसागर : ......||१७।।
सहस्रारे वसन्रक्षेच्चक्राणि षड्भुजो महान् ।
आपादशीर्षम?तो नाड्यादिन्नररूपधृक्.. .।।१८।।

नटराजो नृसिंहश्च रक्षेत्कामादितः सदा ।
आधिव्याध्याध्युपाधिभ्यो वासुदेवो यतीट् तथा....।।१९।।
भूतप्रेतादितो रक्षेच्छ्रीपादवल्लभः कृती।
कालकालो दुहेभ्यो जन्ममृत्योः सदा हरः.......।।२०।।

प्राच्यां च पवनाहारी प्रतीच्या पावकोपमः ।
उत्तरस्यां व्योमकेशो दक्षिणस्यां च दैत्यहा.....||२१||
कामचारश्चोपदिक्षु ह्यूर्ध्वमव्यक्त आतिथिः ।
अधः सच्चित्सुखात्मा च शेषछत्र : स्थले स्थले.....।।२२।।

मृत्युंजयः सर्वतश्च मृत्योर्मृत्युश्च मध्यतः ।
जनेजा त्यनवच्छिनः सहवासी वने तथा.....।।२३।।
जलशायी जले रक्षेत् स्थाणुरूपः स्थले पुनः ।
अग्नितश्च ह्यनन्तात्मा रक्षेच्छस्त्रास्त्रतो बली.....।।२४।।

रक्षेद् दुष्टादितो दाता खेचरेभ्यः खलात्नकः ।
व्यालादिभ्यो जगन्नाथो भूचरेभ्यो भयान्तक....।।२५।।
जले जलचरादिभ्यो रक्षेत्पन्नगभूषणः ।
संकटे विषमे रक्षेत्सर्वतश्च जटाधरः..........।।२६।।

जागरे स्मर्तृगामी च स्वप्ने सूत्रात्मकस्तथा ।
मुर्छादौ च ह्यमेयात्मा निद्रायामनधाप्रियः......।।२७।।
रक्षेद्रोगे ह्यरोगश्च भोगे भोगेप्रदः सदा।
शर्मदश्च तथा स्वास्थ्ये ब्रह्मात्मा केवलश्च यः.....।।२८।।

दुर्भिक्षे ह्यन्नपूर्णेशः सुभिक्षे सकलार्तिहा ।
सूतके तु शरणयश्च मंगले मोददायक.....।।२९।।
सिद्धराजः सदा रक्षेत्सर्वथा सर्वतः पुमान् ।
विस्मृत्य सर्वदोषान्मां यथा माता स्तनन्धयम्.....।।३०।।

भोगापवर्गदं स्तोत्रं दत्तरक्षाभिदं त्विदम् ।
त्रिकाले ह्येककाले वा पठन्नो भयमाप्नुयात्.....।।३१।।
औदुम्बरतले नित्यं प्रातःकाले पठेन्नरः ।
सायं गृहांगणे चैव ह्यथवा शयनस्थले..........।।३२।।

मध्याह्ने देवतागारे शुचिभूर्तश्च सर्वतः।
पठन्तं भवतो रक्षेदत्रिवरप्रद : सदा........।।३३।।
श्री दत्त दत्त कुलतारक दत्त दत्त
श्री दत्त दत्त रिपुमारक दत्त दत्त
श्री दत्त दत्त भयहारक दत्त दत्त
श्री दत्त दत्त मुददायक दत्त दत्त..........।।३४।।

दत्त दत्त स्मरन्मेऽयं देहः पततु निर्जने,
चरन्तु पक्षिणः सर्वे मिष्टान्नं देहजं मम......||३५।।
यत्रैव यत्रैव मनो मदियं तत्रैव तत्रैव तव स्वरूपम्
यत्रैव यत्रैव शिरो मदियं तत्रैव तत्रैव पदं गुरो ते.......||३६।।
।। अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त।।

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post